गुरुवार, २ एप्रिल, २०२०

या देशातील आम्ही पूर्वीचे राज्यकर्ती जमात 
                    मास राजाभाई सूर्यवंशी
                   🙏M🙏A🙏S🙏S
आमच्या कुळातील राज्यांनी या देशावर राज्य केलं आणि अनेक राजवाडे उभे केले ह्या देशाच्या आठ संस्थानांमध्ये मातंग कुळाचे राज्य होते आणि कालांतराने ही राज्यकर्ती जमात देशोधडीला लागले आहे  आज तुम्ही राजवाड्यात तर राज्य करू शकत नाही परंतु मातंग समाजाच्या हिताचे काम करून मातंग समाजाच्या मांगवाड्यात मांग वाड्यातील मांगाच्या हृदयावर राज्य नक्कीच करू शकता
राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये येल्या  मांग सर्जा मांग व अनेक मांग  जातीतील शूरवीर योद्धे गड किल्ल्याचे संरक्षण करायचे
तुम्ही आजच्या युगामध्ये कमीतकमी मागांचे व मांगवाड्याचे तर संरक्षण करा
देश (संस्थान) स्वातंत्र्य व  रक्षणासाठी अनेक देशभक्त घडवले क्रांतिकारक निर्माण करून पारतंत्रा तुन स्वातंत्र्य मिळऊन दिले   व महिलाना तसेच दलितांना शिक्षण  मिळऊन देण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वरक्षण व शिक्षणाची चळवळ चालवली ते आपले क्रांतिपिता वीर लहुजी साळवे
 किमान त्यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून तरी समाज हिताचे काम केले पाहिजे मला माहिती आहे आताच्या युगात  तुम्ही इतर जातिधर्मातील क्रांतिकारक घडवू शकत नाही शैक्षणिक क्रांती घडऊ शकत नाही
 परंतु मातंग जातीतील अनेक युवकानं मध्ये शिक्षणाची आवड निर्माण करू शकता  मातंग युवक वीर योद्धा जातीसाठी माती खाणारे तुम्ही निर्माण करू शकता या जातीय गुलामीतून मुक्त करू शकता या  जाती  जाती च्या उतरंडीतून होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोध बंड करण्याची उर्मी समाजातील युवकांन मध्ये तुम्ही  निर्माण करून आज ही या देशा मध्ये आपले  स्वतःचे अस्थित्व आहे हे प्रस्थापित व्यवस्थेला दाखऊ शकता
वीर फकिराने इंग्रजांचा खजिना लुटून या देशातील सर्व वंचित घटकांच्या पोटाची खळगी भरली
 अमिरो को लुटताय और गरिबोको बाटताय  आमचा हा फकिरा अर्थातच इंग्लिश भाषेतील  रोबिंहूड ज्याने मरणाऱ्या माणसांना जगवलं शब्दाला जगला व वचनावर मेला
 तुम्ही ही इथल्या काळ्या  इंग्रजांचा अर्थात शासनाचा  सरकाराचा जो काही आपल्या हक्काचा खजाना ठेवला आहे तो लुटून मांग समाजाच्या पदरात टाका त्यांच्या पोटा ची खळगी भरा
 साहित्यसम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांनी या भारत देशातील नव्हे तर ह्या विश्वातील शेतकरी कष्टकरी कामगार व वंचित उपेक्षित घटकाचे जगणे कसे असते त्यांच्या व्यथा जगाच्या पटलावर मांडले.. या सर्व उपेक्षित घटकाचे प्रतिनिधीत्व एका पदतीने आपल्या साहित्याचा रूपाने केले आहे.
माझ्या समाज बांधवानो तुम्ही या देशातील सर्व उपेक्षित घटकांना नक्कीच न्याय देऊ शकता परंतु सध्या घडीला तुम्ही या शासन दरबारी मांग  मातंग समाजाचा व्यथा जरी मांडले तरी, मांग जातीतील लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि तुम्हाला देखील एक मानसिक समाधान मिळेल की किमान मी माझ्या  समजा साठी काय तरी केल..... 
वरील सर्वच महापुरुष हे समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी व देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपलं जीवन  चंदना सारखे झिजवले आणि आपल्याला हा जगण्याचा सुगंधित मार्ग दिला*
 माझे सर्व मातंग समाजातील बांधवांना भगिनींना विनंती आहे की आपण किमान (मांग) मातंग जातीसाठी तरी काम केलं पाहिजे*
मास राजाभाई सूर्यवंशी
🙏M🙏A🙏S🙏S

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...