गुरुवार, २ एप्रिल, २०२०

भुकेने व्याकुळ नागरिकांच्या मदतीला न्यायदेवता ही सरसावली
                           बीड हॅलो रिपोर्टर चा दणका
बीड हॅलो रिपोर्टर च्या बातमीची न्यायमूर्ती ने घेतली दखल.

नांदेड (भगवान कांबळे ):-  कोरोना सारख्या
महामारीत संपूर्ण भारतभर लॉक डाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या व मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबाची हेळसांड होत होती त्यावेळी हॅलो रिपोर्टर मध्ये दि.31 मार्च  2020 रोजी भोकरमध्ये १५० मजुरांची लॉकडाऊनमुळे फरफट;पोटापाण्याचा प्रश्न बनतोय गंभीर हि बातमी प्रकाशित करण्यात आली होती. व त्या बातमी ची दखल घेऊन भोकर येथील न्यायदेवतानी  गरजू लोकांच्या मदतीला उतरलेली दिसून आली.
  बूधवार दिनांक 1एप्रिल   रोजी भोकर शहरात बाहेरील जिल्ह्यातून येऊन उपजीविका करणारे व मोलमजुरी करणारे असंख्य नागरिक तंबू ठोकून असल्याचे व त्याची उपासमार होत असल्याचे दिसून आल्यावरून भोकर येथील जिल्हा न्यायाधीश

श्री मुजीब शेख यांनी अशा 35 ते 40 गरजू कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना एक आठवडा पुरेल एवढे तांदूळ, गहू, तेल, साखर, तुरदाळ, चहापत्ती, बिस्कीटचे पुडे, अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून मानवतेचा संदेश दिला आहे. भोकर शहरातील बटाळा रोड,उमरीरोड,किनवट रोड, नांदेड रोडवरील मोलमजुरी करून नागरिक असल्याची कुणकुण न्यायाधीश महोदयांना लागताच त्यांनी तात्काळ आपला ताफा घेऊन प्रत्यक्ष तंबू ठोकून असलेल्या मजूरा पर्यंत जाऊन त्यांना मदत दिल्याने मजुरी करून जीवन जगणाऱ्या नागरिकांचे डोळे पाणावले होते, प्रत्यक्षात न्यायदेवता आमच्या घरी येऊन आम्हाला न्याय दिल्याची भावना अनेक नागरिकांनी हॅलो रिपोर्टर शी बोलताना व्यक्त केल्या. यावेळी न्यायाधीश श्री मुजीब शेख यांच्यासोबत  न्यायाधीश श्री पांडे सर, तहसीलदार मुंढेसर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजभारे मॅडम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...