गुरुवार, २ एप्रिल, २०२०

गरीब मजुरांवर रसायन फवारणीचा बरेलीतील प्रकार मानवतेला कलंक फासणारा असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

 मुंबई प्रतिनिधी- कोरोना व्हायरस च्या भीतीने
लोकडाऊन च्या काळात  शेकडो मैलांची पायपीट करून आपल्या गावी परतलेल्या गरीब दलित मजुरांवर जंतुनाशक रसायन फवारणी करण्याचा मानवतेला कलंक फासणारा प्रकार उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडला आहे. या प्रकाराचा तीव्र निषेध करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्या प्रशासनाच्या  अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.
पोलीस प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगले काम करीत आहेत. त्यांची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. मात्र काही ठिकाणी पोलीस चुकीचे वागत असल्याची उदाहरणे येत आहेत. उत्तर प्रदेशात बरेली येथील  मजुरांवर केमिकल फवारणी चा अमानुष प्रकार त्यातील एक प्रकार आहे. केंद्र सरकार गरीब मजुरांच्या पाठीशी असून त्यांना आहे तिथे अन्नधान्य भोजन मोफत देण्याची व्यवस्था करीत आहे.प्रशासनाने मजुरांना सहानुभूतीने वागणूक देण्याची गरज आहे. कोरोना भीतीने माणुसकी विसरू नका; हात मिळवू नका मात्र साथ कुणाची सोडू नका असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...