गुरुवार, २ एप्रिल, २०२०

वंचित बहुजन आघाडीचा वतीने कोरोना पार्श्र्वभूमीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार-दिपक डोके
रेल्वे स्टेशन परिसरातील गरजुंना उल्पआहार व अन्नदान  वाटप
जालना(प्रतिनिधी) :-सध्या कोरोना
विषाणुच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या संचारबंदीमुळे गोर गरीब जनतेचे हाल होत असुन मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे.बहुजन वंचित आघाडी या गोर गरिबांच्या मदतीसाठी पुढे आली असुन पक्षाचे नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय मदत कार्याचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील गरजुंना उल्पआहार वाटप करण्यात आले आहे.
 कोरोना व्हायरस मुळे अखंड देश चिंतेत आहे प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी जिल्हाबंदी,संचारबंदी लागू केल्यामुळे बांधकाम मजूर
भुमिहिन शेतमजुर तसेच एका वेळेच्या भाकरीवर
जगणाऱ्या लोकांचे जीवन कठीण बनले आहे.या गोर गरीब नागरिकांची रोजंदारी बंद झाल्याने रोजी रोटीचा प्रश्न भेडसावत आहे अशा या नागरिकांची बंद काळात  योग्य ती सोय व्हावी  यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शक्य होईल त्या प्रमाणात मदत कार्यात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मदत करण्याचा उपक्रम हाती घेत रेल्वे स्टेशन परिसरातील गरजुंना उल्पआहार वाटप करण्यात आला आहे.यामुळे संचारबंदी काळात नागरिकांना मोठी मदत झाली.शासनाने घेतलेल्या खबरदारीच्या निर्णयाप्रमाणे व सर्व सुचनांचे पालन करत वंचित बहुजन आघाडीची टिम हे मदतकार्य करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दिपक डोके, अशोक खरात, अकबर इनामदार, विष्णु खरात, दिपक घोरपडे, अँड.कैलास रत्नपारखे, सचिन कांबळे, विनोद दांडगे, कैलास रत्नपारखे, रमाबाई होर्शिळ, मैनाबाई खंडागळे, बाळासाहेब रत्नपारखे, राहुल भालेराव, दिपक रत्नपारखे, अर्जुन जाधव, संतोष आढाव, अनिल झोटे, गौतम वाघमारे, किशोर जाधव,खाजा खान,लखन चित्तेकर, राहुल रत्नपारखे,शिध्दु कनकुटे, विकास लहाने, संतोष मगर, अरविंद होर्शिळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मदत कार्य करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...