गुरुवार, ४ जून, २०२०

*आनंदाची बातमी...... कोरोनाला आपण हरवणारच राजेश टोम्पे ची गुड न्यूज*

मुंबई | दि. १ मे ते १ जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून दि. १ जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा (४.७४ टक्के) देखील कमी झालेला आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात आहेत. बुधवारी महाराष्ट्राची कोरोनाबाधितांची संख्या 70 हजारांच्या पुढे पोहचली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण देखील वाढत असलं तरी शासन आणि प्रशासनाच्या उपाययोजांना यश मिळत असल्याचं दिसत आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याला मोठ्या गुड न्यूज दिल्या आहेत.

राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढून 43.35 % एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. प्रत्येक दिवशी जवळपास 700 ते 800 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहे. आतापर्यंत जवळपास 32329 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत

राज्यात आज ९९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...