गुरुवार, ४ जून, २०२०

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला चार दिवसात डिस्चार्ज, घरी पाठविलेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह, जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणा - राजेंद्र पातोडे.


अकोला,ब्युरोचीफ :-  येथील २७ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला अवघ्या चार दिवसात चाचणी न करता घरी पाठविण्याचा प्रताप जिल्हा सामान्य रुग्णालय व महापालिका प्रशासनाने केला आहे. या तरुणांची पुन्हा टेस्ट केली असता तो पॉझिटिव्ह निघाल्याने त्याच्या कुटुंबियांवरती कोरोन्टाईन होण्याची वेळ आली आहे.  जिल्हा प्रशासन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच अकोल्यात कोरोनाचा हॉट स्पॉट तयार झाला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.अकोल्यातील देशमुख फाईल या ठिकाणी राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाची १९ मे रोजी स्वॅप टेस्ट करण्यात आली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेल्या या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. २१ मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात २५ मे रोजी 

त्याला डिस्चार्ज देऊन पीकेव्हीही येथील विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले. पीकेव्हीही येथील केंद्रात काहीही सुविधा नसून थातुरमातुर वैद्यकीय सेवा देत असल्याचे सदर तरुणाचे म्हणणे आहे. २५ मे  रोजी डिस्चार्ज देताना त्याच्या केस पेपरवर मात्र दाखल केल्याची तारीख १ मे तर डिस्चार्ज केल्याची तारीख १५ मे अशी टाकून बनावट केस पेपर तयार केल्याचा धोकादायक प्रकार समोर आला आहे. पॉझिटिव्ह असलेल्या तरुणाला २९ मे रोजी घरी पाठविण्यात आले. त्यावेळी त्याला त्रास कायम होता. त्याकडे दुर्लक्ष करून कोरोना रुग्णाची पुन्हा टेस्ट न करता त्याला घरी पाठविण्यात आले. अर्थात पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाला की नाही याची शास्त्रीय पद्धतीने खातरजमा न करता त्याला घरी पाठविण्यात आले. माञ त्रास कायम असल्याने हा तरुण २ जूनला पुन्हा शासकीय महाविद्यालयात परतला असता त्याचा अहवाल ४ जूनला पॉझिटिव्ह आला. या प्रकारामुळे त्याचे कुटुंबीय देखील संकटात सापडले आहे. अकोल्यात उघडकीस आलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. शासकीय महाविद्यालय, महापालिका व जिल्हा प्रशासन हे रुग्णाच्या जीवाशी खेळत असल्याचे या रुग्णांच्या प्रकरणावरून दिसून आले आहे. रुग्ण सापडलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर नागरिक बाधित होत आहेत. परिणामी अकोला कोरोनाचा हॉट स्पॉट बनला असून जिल्ह्यातील रुग्ण मृत्यू दर विदर्भात सर्वाधिक आहे.जिल्हा प्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मनपा मधील अधिकारीच गंभीर नसल्याने अकोला जिल्हा करीता तातडीने तीन स्वतंत्र आयएएस अधिकारी नेमण्यात यावेत. तसेच बाधीत तरुणाची फेरतपासणी न करता घरी पाठविल्या प्रकरणी दोषीं विरोधात तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्र्यकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...