गुरुवार, ४ जून, २०२०

प्रकाश आंबेडकर यांचा अकोला दौरा, अनेक विषयांवरीती केल्या बैठका,कोरोनाग्रस्तना सेवा देण्याच्या सूचना

अकोला,ब्युरोचीफ :-  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. डॉक्टरांची कमतरता असल्याने खाजगी डॉक्टरांची सेवा घेण्याबाबतचा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला. तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

        अकोला शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून हा भाग रेड झोन मध्ये आला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने डॉक्टरांची कमी जाणवत आहे. त्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेतली. या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, अनेक खासगी डॉक्टरांनी आमच्याशी संपर्क करून आम्ही सर्विस देण्यास तयार आहोत तर अशा डॉक्टरांची सर्विस पालिकेने घ्यावी. ज्यांचे नर्सिंग होम आहेत आणि ते द्यायला तयार असतील तर ते घ्यावे. त्याचबरोबर आता परीक्षा नसल्याने अनेक विद्यार्थी जिल्हयात परत येतील. त्यांची उतरण्याची आणि तपासण्याची सोय एकाच ठिकाणी करण्यात यावी, तसेच कोरोना व्हायरसचे जे रुग्ण आहेत,त्यांच्यात तीन विभाग करण्यात यावेत, ज्यांची तपासणी झाली असे, ज्यांना लागण झाली आणि अतिगंभीर असणारे, शिवाय ज्यांना कोरोनटाईन करायचे आहे त्यांना त्यांच्या घरामध्ये कोरोनटाईन करून, त्यांची चौकशी करावी, ज्यांना श्वसनाचा त्रास नाही त्यांच्यावर घरीच उपचार करावे, जेणेकरून रुग्णालय प्रशासनावर ताण येणार नाही. या सर्व विषयांवर चर्चा झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
     या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ घावकर, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच वंचितचे प्रवक्ते डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, प्रदेश महिला महासचिव अरुंधती सिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखेडे उपस्थित होते. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...