मंगळवार, ९ जून, २०२०



मोसंबी व लिंबाच्या झाडावर किड्यांचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत


घनसावंगी प्रतिनिधी/असलम कुरेशी :- घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात मोसंबी व लिंबाच्या झाडावर सोमवारच्या रात्री पासून विचित्र किडे दिसत असून हे किडे संपूर्ण झाडाचा पाला खात आहेत. त्यामुळे मोसंबी व लिंबाची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

यासंदर्भात अशोक ढोबळे यांनी सांगितले की त्यांचा शेतात मोसंबीची 500 झाडे आहेत. मोसंबीचे उत्पादन वाढावे म्हणून त्यांनी या पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. सध्या या झाडांना मोसंबी लागत आहे. परंतु या झाडावर विचित्र प्रकारच्या किड्यांनी हल्ला केल्यामुळे ही झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल देशमुख यांनी सांगितले की हे किडे रात्री अंधार पडल्यावर झाडावर हल्ला चढवतात आणि संपूर्ण झाडाचा पाला खात असल्याने अख्खे झाड नष्ट होत आहे. सोमवारच्या रात्री या किड्यांनी अशोक ढोबळे यांच्या 50 ते 60 झाडांचा पाला खाऊन नष्ट केले आहे. तसेच अमोल देशमुख यांच्या शेतातील जवळपास 200 झाडांचा पाला खाल्ला. आधीच शेतकरी लाॅकडाऊन, अवकाळी पाऊस व गारपिटीचा सामना करून हैरान झालेला असताना या किड्यांनी शेतक-यांची झोप उडवली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता असल्याने कृषि विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे. मोसंबीच्या झाडांचे नुकसान होत असल्याने रांजणी परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...