मंगळवार, ९ जून, २०२०

अंबड शहरातील राशन दुकानदाराचा मनमानी कारभार ; गोरगरिबांचे होताहेत हाल

ज्यांच्याकडे राशन कार्ड त्यानांच स्वस्त धान्य !


अंबड शहरातील राशन दुकानदाराचा मनमानी कारभार ; गोरगरिबांचे होताहेत हाल


जालना,प्रतिनिधी :- ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही व राशन कार्ड आँनलाईन नाही  त्यांना राशन दुकानदार राशन देत नसल्याने लॉक डाऊन मध्ये गोरगरीब कुटुंबांची उपासमार होत आहे. प्रशासनाकडून राशन दुकादारां च्या मनमानीला चाप लागेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून गरीबांना हाताला काम नाही.काम नाही तर पैसा नाही. यामुळे मोलमजुरी करणाऱ्या शेकडो गरीब लोकावर उपासमारीची वेळ आली आहे.या काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ मिळाल्याने मोठा आधार मिळाला आहे. त्याचबरोबर मे महिन्यात डाळीचे वाटप करण्यात आले. मात्र असे असलेल तरी अंबड परिसरातील अनेक गावात राशन कार्ड नसल्याने धान्यापासून वंचित असलेले दिसून येत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाने संकट ओढवले आहे. ज्यांचे राशन कार्डमध्ये नाव नाही त्यांना राशन दुकानदार राशन देत नाहीत.राशन दुकादारांचा मनमानी कारभार सुरू आहे.

  शासनाच्या वतीने प्राधान्य कुटुंब तसेच शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत तांदूळ व डाळी चे मोफत वाटप करण्यात येत आहेत .त्यात अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वाटप सुद्धा करण्यात आले आहे .त्यानंतर आता ह्या मे महिन्यात अंत्पोदय व प्राधान्य गटातील कार्ड धारकांना प्रति कार्ड एक किलो मोफत डाळीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार अंबड शहरात काही राशन दुकानदार गहू किंवा तांदूळ कमी देत आहेत.  रेशन कार्ड नसलेले व रेशन कार्ड ऑनलाइन असलेल्या नागरिकांना धान्य मिळत नसल्याचे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रेशन कार्ड नसलेले व रेशन कार्ड ऑनलाईन असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ न मिळाल्याने धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.  ज्यांना राशन कार्ड नाही त्यांना देऊन  व रेशन कार्ड ऑनलाइन केलेले नाही त्यांचे रेशन कार्ड ऑनलाइन करून रखडलेले प्रश्न दूर करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, याबाबत येथील स्वस्त धान्य दुकानदार श्री. बिडकर यांना विचारले असता ते म्हणाले,ज्याचे  राशन कार्ड आँनलाईन आहे त्यांना राशन देणार आहे.ज्यांच्याकडे  राशन कार्ड नाही ते ऑनलाईन पण नाही  त्यांना राशन देता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...