मंगळवार, ९ जून, २०२०

दर वाढ झालेल्या बी बियाणांच्या किमती शासनाने कमी कराव्यात-महात्मा ब्रिगेड सतीश राऊत याची मागणी.




परतूर /प्रतिनिधी:- मागील वर्षी  परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. या मुळे सोयाबीन बियाणाची प्रत खालवली आहे. याची झळ आता आगामी खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना  सोसावी लागत आहे. सोयाबीन चे बियाणे कि्वंटल मागे एक हजार रूपये पेक्षा अधिक महागले आहे. प्रामुख्याने महाबीजच्या बियाणाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा  सुर उमटत आहे. सोयाबीन बियाणाची 30 किलोची बॕग मागील हंगामात 1890रुपये पर्यत विकली जात होती. परंतु  यंदा तीच बॕग 360 रू. ने महाग झालेली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांना  परवडणारी नाही.
अशा परिस्थितीमध्ये शासनाने ही दरवाढ कमी करावी किंवा बी बियाण्यांच्या बाबतीत शासनाने शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा करावी कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॕकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे सुध्दा नुकसान झालेले आहे.
सध्या मागील काही महिन्यांपासून  लॉक डाऊन मुळे शेतकरीवर्ग सुद्धा  हवालदिल झालेला आहे.  शेतकऱ्यांच्या शेतीमाला वर सुध्दा लॉकडाउनचा परिणाम झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये  शेतकऱ्यांना अधिक महाग किंवा अधिक  चढ्या भावाने  बी बियाणे  विकत घेणे परवडण्यासारखे नाही. म्हणून  शासनास  निवेदन आहे की आपण याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांसाठी  उपाययोजना कराव्यात. अशी मागणी महात्मा ब्रिगेडचे परतुर तालुका अध्यक्ष सतिश राऊत यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...