बुधवार, ४ मार्च, २०२०




अंबड तालुक्यातील गोंदी पोलीसांची कारवाई
वाळूची अवैधवाहतूक करणारी वाहने पकडली

अंबड / प्रतिनिधी :-  अंबड तालुक्यातील जोगलादेवी येथील गोदावरी नदीपात्र व पाथरवाला शिवारातील अवैध वाळुची चोरी करत असतांना कार्यवाही करून एक हायवा व दोन ट्रॅक्टर असा ४० लाखाचा मुददेमाल गोंदी पोलिसांनी जप्त केला.३ मार्च रोजी ४ .३० वाजेचे सुमारास गोंदी पोलिस पेट्रोलिंग करीत असतांना स .पो .नि .खोपडे गोदीवरी नदी पात्रातुन एक हायवा ट्रक वाळु भरुन जोगलादेवी गावातुन जात
असल्याचे दिसले .स .पो .नि.खोपडे हे तात्काळ दोन पंच येथे घेऊन गेले. सकाळीं ०५ वाजेच्या सुमारस हायवा ट्रक मध्ये अवैधरीत्या गोदावरी नदीपात्रातील गौण खनिज वाळू उपसा करून ती चोरटी वाहतूक करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असतांना दिसले . याप्रकरणी हायवा ट्रक जप्त करून गुन्हा दाखल केला. पुढील तपास कामी पुढील तपास कामी पो नाईक वाघमारे यांच्याकडे देण्यात आला. तसेच पाथरवाला शिवारातील दोन ट्रॅक्टर अवैधरित्या गोदावरी पात्रातील वाळू उपसा करून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना सकाळी ०६.३० सुमारास दोन ट्रॅक्टर दिसले. ट्रॅक्टरवर देखील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य व उपविभागीय अधिकारी सी.डी शेवगण उपविभाग अंबड मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाही गोंदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलींद खोपडे,सहाय्यक फौजदार दिवटे,गोपनीय शाखेचे महेश तोटे,गणेश लकश,अशोक भांगळ, आविनाश पगारे,आदी नी केली आहे.


आधार प्रमाणीकरणाचे काम करण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्यांनी पैसे देवू नये
जालना / प्रतिनिधी :-  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केलेली आहे. सदर योजनेतंर्गत आधार प्रमाणिकरणाचे  काम आपले सरकार सेवा केंद्र चालकामार्फत,स्वस्त राशन दुकान चालकांमार्फत सुरु करण्यात आले असून  जालना जिल्हयातील 1,30,158 शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द झाली  आहे. तसेच शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण करण्याचे काम सुरु झालेले आहे. या प्रकरणी शासन धोरणाच्या अनुषंगाने कार्यवाही न करता शेतक-यांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने जिल्हाधिकारी जालना  यांनी दिनांक 3 मार्च 2020  रोजीच्या पत्रान्वये जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना व जिल्हा समन्वयक, E-Governance Services India Ltd.Jalna यांना सर्व आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त राशन दुकान चालकांना सूचना देऊन कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाही याबाबत खबरदारी घेणे बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व  आपले सरकार सेवा केंद्र व स्वस्त राशन दुकान चालकांना आवाहन ही करण्यात आले आहे. तरी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत आधार प्रमाणिकरणासाठी कोणत्याही लाभार्थ्याकडुन पैसे घेऊ नये अथवा मागणी करु नये, तसेच संबधीत लाभार्थी यांनी कोणत्याही आपले सरकार केंद्र व स्वस्त राशन दुकान चालकांना पैसे देवु नये.अशा प्रकारचा गैरप्रकार आढळुन आल्यास संबंधीत तहसिलदार, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास निदर्शनास आणुन दयावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, जालना यांनी केले आहे.

मंगळवार, ३ मार्च, २०२०

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व, एक प्रामाणिक भीमयोद्धा, आंबेडकरी चळवळीचे नेते. तसेच स्वाभिमानी मुप्टाचे मराठवाडा अध्यक्ष व औरंगाबाद पालक शिक्षक संघांचे अध्यक्ष, डॉ अनिल पांडे 50वा वाढदिवस स्वाभिमानी मुप्टा प्राध्यापक व शिक्षक संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला.
प्रा. संजय काळे | औरंगाबाद 
 डॉ अनिल पांडे आणि डॉ आरती पांडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पार पडला. डॉ शंकर अंभोरे, डॉ किशोर साळवे, विलास पांडे,देवानंद वानखेडे या मान्यवरांनी डॉ अनिल पांडे यांना वाढदिवसाच्या व भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ माणेराव, सुधीर शेषवरे, एम एस ओव्हळ, सुबोध साळवे, एस बी जाधव, प्रदीप आमले,संजय काळे, डॉ मिलिंद तायडे, डॉ राहुल तायडे, डॉ लिहिणार, खरात सर, पवार सर, प्रा रविराज चव्हाण आणि इतर शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर...
नरडाणा:-धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीतर्फे आयोजित शिवजन्मोत्सवानिमित्ताने देण्यात येणार
यंदाचा राज्यस्तरीय जाणता राजा शिक्षक रत्न पुरस्कार-२०२० व राजमाता माँसाहेब जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कार-२०२० पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
*राज्यस्तरीय जाणता राजा शिक्षक रत्न पुरस्कार-२०२०*

सुनिल अमृत गोपाल (शिरपूर),नरेंद्र गुलाबराव बाविस्कर(तामसवाडी ता.पारोळा),ध्रुवास ममराज राठोड (चाळीसगाव),दिपक रोहिदास पाटील (जिराळी -इंधवे ता.पारोळा),सदाशिव सोमा महाजन(दोंडाईचा),संदीप हिरामण पाटील (तामसवाडी ता.पारोळा),प्रशांत दत्तात्रय कोतकर(पिंपळनेर),देविदास शिवराज हिरे(भाटगाव ता.चांदवड),श्रीराम साहेबराव महाजन(चेंबूर,मुंबई)संजयकुमार उमेशचंद्र महाजन(शिंदखेडा),
अनिल अरुण काळे (नरडाणा ता.शिंदखेडा),रविंद्र रामदास सोनगीरे(शिरपूर),चेतन रामदास जाधव (मोहाडी उपनगर,धुळे),मनोहर धनगर चौधरी (चारणपाडा ता.शिरपूर),दिलीप नामदेव पाटील (विखरण ता.शिरपूर),बाबुराव गुंडाजी गायकवाड (बजाजनगर,औरंगाबाद),राकेश हिराजी पगारे(सामोडे ता.साक्री )चंद्रकांत बापू नेरकर(मोरदडगांव ता.धुळे),विशाल रमेश राठोड (रावेर जि.जळगाव)विनोद अशोकराव सोनवणे(मोंढाळे पिंप्री ता.पारोळा)प्रा.चंद्रकांत सदाशिव सोनार (शिरपूर)राजेंद्र धनालाल गुरव(दोंडाईचा)संजय सोमगीर गोसावी, योगेश देविदास जोशी (विरदेल ता.शिंदखेडा),सुनिल न्हानु दाभाडे(जळगाव) सुरेश बाबुराव सोनवणे (बोरविहीर ता.धुळे) प्रा.समीर विष्णू घोडेस्वार,प्रा.चंद्रकांत शिवाजी कोळी, प्रा.अनिल रविंद्र गजरे(जामनेर पुरा,जि.जळगाव)विजय रामचंद्र सैतवाल(मालदाभाडी ता.जामनेर),अशोक दिगंबर जाधव (कारवा.जि.चंद्रपूर),अनिल भगवान माळी(दत्ताणे ता.शिंदखेडा)अनिल विज्ञान महिरराव (नवपाडा(मुखेड)ता.शिरपूर)
राज्यस्तरीय राजमाता माँसाहेब जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कार-२०२०
सुनिता आधार पाटील (बोरविहीर ता.धुळे)डॉ. सुरेखा शिवाजी बोरसे (कावपिंप्री ता.अमळनेर),जयश्री महेंद्र जाधव (दहिद बु.|| जि.बुलढाणा),माधुरी विजय देवरे (नाशिक),सुनिता विश्वनाथ हंडोरे (नाशिक)
यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.तसेच कार्यक्रमाचे दिनांक:- १९ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १२:०० वाजता.कार्यक्रमाचे ठिकाण :- प्रा.आर.ओ.निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज,गोंदूर-मोराणे बायपास रोड,गोंदूर,धुळे येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत. असे आवाहन धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहुल एच.पाटील,उपाध्यक्ष योगेश वाघ,सचिव शशिकांत पाटील,सहसचिव मोहन सुळ,वासुदेव शेलकर,विशाल निकम, संभाजी बोरसे,राहुल पवार यांनी केले आहे.
लेडी सिंघम पल्लवी जाधव मॅडम यांनी सामाजिक उपक्रम घेऊन साजरा केला स्वतःचा वाढदिवस
जालना प्रतिनिधी/:- लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना दामीनी पथकाच्या प्रमुख पल्लवी जाधव मॕडम यांनी आपला
वाढदिवस शहरातील गांधीनगर स्थित शिक्षा संस्कार केंद्र येथे साजरा केला.आपण कोणत्याही कार्यक्षेत्रात कितीही मोठ्या पदावर का असेना, सामाजिक बांधीलकी आणि गरजूंना मदत करण्याची ओढ आपल्याला असली पाहिजे. जेणे करून वाढदिवसाचे निमित्त असो किंवा अन्य काही आनंदाचे क्षण, त्याचे रूपांतर आपण ईतरांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यास सक्षम ठरत असू तर ते एक महान सामाजिक कार्य सर्वांनी केले पाहिजे. असा संदेशच जणू त्यांच्या वाढदिवसानिमित्त लेडी सिंघम यांनी आपल्या कृतीतून दिला. यावेळी पल्लवी जाधव मॕडम च्या वतीने शिक्षा संस्कार केंद्र च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. येथे गरिब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून मुलींना स्वरक्षणाच्या मार्गदर्शना सोबत कायद्याविषयक माहिती दिली.परिक्षेसंबंधी प्रोत्साहन देऊन सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सर्व विद्यार्थ्यांनी मॕडमचे आभार व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.

 राशन धान्य गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱा ट्रक पोलिसांनी पकडला.
                      भोकरदन पोलिसांनी कारवाई
भोकरदन प्रतिनिधी : रेशनचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असतांना तो ट्रकसह पोलिसांनी पकडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.या संदर्भात पोलिस सुत्रांनी दिलेली माहीती अशी की, दि.1.मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ट्रक
(क्र.एम.एच.15.सी.के.23.89)मधून राशनचा गहू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरुन पोलिस कर्मचारी विजय जाधव, गणेश निकम, संदीप उगले, संजय क्षीरसागर यांनी सापळा लावून सिल्लोड रोडवर ट्रकला थांबविले. या दरम्यान ट्रकचालकाने ट्रक थांबवून तेथून पोबारा केला.दरम्यान सदरील ट्रकमध्ये रेशनचा गहू असल्याची माहीती समोर आली. या ट्रकमध्ये प्रत्येकी 50 किलोचे 355 पोते आढळून आले.दरम्यान पोलिसांनी एकुण बारा लाखाच्या वर ट्रकसह मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.

सोमवार, २ मार्च, २०२०

उज्जैनपूरी येथे रोकडोबा महाराज यात्रेनिमित्त श्याम महाराज मुळे यांचे दरवर्षीप्रमाणे श्रीमंत भागवत कथेचे आयोजन.
 जालना / प्रतिनिधी :-  जिल्ह्यातील बदनापुर उज्जैनपुरी येथे दरवर्षी  प्रमाणे श्री रोकडोबा महाराज यात्रे निमित्त 21 मार्च ते 27 मार्च पर्यंत शाम महाराज मुळे याचे हे पहिल्या 9 वर्षांपासुन उज्जैनपुरी
गावकऱ्यांकडून एक रुपयाची देणगी न घेता ब्राह्मणाना सायंकाळी 7 दिवस भोजन देऊन श्रीमद् भागवत कथा केली या  गावची कथा सांगायची ठरली तर फार मोठी आहेत रोकडोबा  महाराज कुठलाही नवस आसु तो  पूर्ण होतो या गावातून जिल्‍हाधिकारी पासून तर शिपायापर्यंत शासकीय पदापर्यंत पोहोचले छोट्या कार्यकरत्या पासून तर राष्ट्रीय महामंत्र पर्यंत पोहोचले विद्यार्थ्यांना शिक्षक डाॅक्टर ,ईजिनियर, या गावातूनच दिले थोडक्यात सांगायचे ठरले तर कुठलाही भाविक गाव सोडून गेला तर परत यात्रेनिमित्त गावात येतो औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी पिराजी सोरमारे जाफराबाद चे पीएसआय घुगे साहेब काँग्रेसचे कल्याण दळे अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश मुळे भाकवतकार शाम शाम महाराज मुळे  पंचायत समिती चे सभापती बिटी शिंदे  प्राध्यपक  राम भाले सर या  गावातून मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले या गावात अठरापगड जाती धर्माचे गाव  आहे सात दिवस कोणी मासारी खाणार नाही देणगी  सांगायचं ठरलं तर एक माणसाला शंभर रुपये रात्री जन्माला कधी आला तर शंभर रुपये येऊन देतो  घरात दहा माणसाकडे असेल तर हजार रुपये होते देणगीसाठी गावकरी घरा पर्यत जाणार नाही स्वतःहून मंदिरापर्यंत पोहोचते सात दिवस श्रीमद् भागवत कथा किर्तन भजन विविध कार्यक्रम पार पडतात 27 मार्च रोजी सकाळी सात वाजता दिंडी निघते रोकडोबा महाराज मंदिर महादेव मंदिर मारुती मंदिर रोकडोबा महाराज  प्रर्तत निघते सकाळी  आठ वाजता वाणी समाज ब्राह्मण समाज यांना शिदा दिल्यात  जातो दहा वाजता श्रीमद् भागवत कथा सुरुवात होते एक वाजता समाप्त होते बारा वाजता प्रदिप महाराज मुळे बबन महाराज मुळे अशोक पाटणकर दिलीप महाराज मुळे याच्या  हे रोकडोबा  महाराजांना नेवध्या  दिल्या जातो   दोन वाजता सर्व गावकरी मंडळ कडून जिल्हा परिषद शाळेवर महाप्रसादाचे  आयोजन केले जाते चार वाजता ब्राह्मण समाजाचा नवस निघतो   रात्री आठ वाजता प्रदिप महाराज  मुळे बबन महाराज मुळे डिलीप मुळे लक्ष्मण मुळे सुरेश मुळे कैलास मुळे विलास मुळे  ब्राह्मण याना ब्राह्मण म्हणुन  हार घालुन ब्राह्मणा रोकडोबा महाराजांच्या वाजीत गाजीत    मंदिरापर्यंत गेले होते तिथून पुढे नाटक सुरु होते सकाळी पाच वाजता आई भवानी  सोग निघते रोकडोबा महाराज मंदिर  घुगे गल्ली पंचायत समिती मारुती मंदिर ब्राह्मण गल्ली वाणी गल्ली रोकडोबा महाराजाला परत आई भवानीचे सोंग  निल्या जाते  तिथून जत्रेला सुरवात होते पुढे घेतला सुरुवात होते

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...