बुधवार, १ एप्रिल, २०२०


हातावरील पोट असलेल्यांना गरिबांना शासनाच्या वतीने दहा हजार रुपये आर्थिक मदत द्या- सौ.शालिनी शर्मा
अन्याय प्रतिकारक दलाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.
जालना प्रतिनिधी :- कोरोना साथी मुळे 
देशभरात जनता कर्फ्यु लागु
 रिक्शाड्रायव्हर पासुन ते रोज काम केल्याशिवाय त्यांच्या घरात चुली सुध्दा पेटत नाही खास करुन झोपडपट्टीतील लोकांची तर फार दयनीय अवस्था झालेली आहे, बाहेर जावे तर कोरोना साथी मुळे मृत्यु व घरी रहावे तर परीवाराची होत असलेली उपासमार पाहुन ह्यांना आत्महत्या करावीशी वाटत आहे.करीता सर्वांना त्वरीत संसारोपयोगी सर्व धान्य देउन जो पर्यंत कोरोना साथीचे निवारण होत नाही तोपर्यंत प्रत्येकी कुटूंब प्रमुख च्या नावाने १००००/रु.अनुदान देण्यात यावे.आज देशभरात कोरोनासाथी मुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून जनता कर्फ्यु लागु आहे ह्या कारणे जे गोरगरीब हातांवर रोज काम करुन पोट भरत आहे अश्या परीवारावर फार बिकट वूळ आलेली आहे.तसेच जनता कर्फ्यु यशस्वी होणे कामी प्रधाणमंत्री गरीब योजनेत बदल झाल्यास शक्य होईल.नुसते गहु, तांदुळ,गो,तेल,व दाळी देऊन शक्य होणार नाही.कारण दर्या परीवारात १० ते १५ आहेत त्यांना सरासरी किमान १०,०००/ ते १५,०००/रु.खर्च येतो .तसेच घरात बारीक ते बारीक गोष्टी (गरजा)असतात.सरकार ने फक्त उज्वला गैसचाच उल्लेख केला आहे.पण उज्वला गैस किती लाभार्थ्यांकडे आहे.माझ्या मते याप्रसंगी ज्यांचेकडे जे गैस कनेक्शन आहे ते मिळायला हवे.ज्या परीवारात १५ व्यक्ती आहे अश्या परीवारात आठ दिवसांत २० किलो गहू व १० किलो तांदूळ लागते,तर बाकीचे वस्तु (सामान)किती लागते याचा अंदाज लावण्यात यावा.व या सोबत मिठ ,मिर्ची,हळद,मसाले,साबणी,सह दाळी, कडधान्य आलेच,व दुध,साखर,पत्ती,जर हे सगळे साहित्य (सामान) गरजुंपर्यंत तात्काळ पोहचले तर ही गरीब जनता बाहेर पडणार नाही.जर हे शक्य होत नसेल तर महाराष्ट्रातील सर्व गरीब जनतेच्या कुटूंब प्रमुखांच्या नावे त्यांच्या खात्यात कोरोना वायरसचे निवारण होत नाही तोपर्यंत प्रती महिना १००००/रु, अनुदान देण्याची व्यवस्था करावी ज्यामुळे गरीब जनतेच्या डोक्याला आलेला आर्थिक टेंशन दुर झाल्यास हे लोक कामांकरिता चोरुन इकडे तिकडे जाणार नाही व जनता कर्फ्यु यशस्वी होईल.करीता हे.साहेबांनी त्वरीत धान्यपुरवठा करून प्रत्येक कुटूंब प्रमुखांच्या नावे बैंक अकॉउंटला १००००/रु.टाकावे. अशी मागणी अन्यायप्रतिकारक दलाच्या मराठवाडा सरचिटणीस सौ.शालिनी शर्मा यांच्यावतीने करण्यात आली आहे.



*ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे देवगवात घाणीचे साम्राज्य*
*बदनापूर प्रतिनिधी:* ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे देवगवात घाणीचे साम्राज्य देवगाव गावामध्ये गेल्या सहा 
महिन्यांपासून गावातील पाण्याच्या टाकीच्या बाजूला खड्डे दूषित पाण्याने पाणी साचले आहे त्याठिकाणी गावातील पाईप लाईन फुटलीली आहे आणि तेच पाणी गावातील लोकांना प्यायला मिळते.व दूषित पाण्याने गावतील नागरिक आजारी पडत आहे.त्याचवेळेस कोरोना विषाणूची साथ चालू आहे .डेंग्यू ची आजार होण्याची शक्यता आहे.अशावेळेस नागरिकांची परेशाणी होत आहे.तरी ग्रामपंचायत  ने लवकरात लवकर पाइपलाइन दुरुस्त करावे अशी मागणी विनोद मगरे(भावी सरपंच)यांनी केली आहे.

              *बुलढाण्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्या 4 वर*

बुलडाणा प्रतिनिधी :- आज दि.01 एप्रिल
ह एक रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रेमचंद पंडित यांनी दिली. आज पॉझिटिव्ह आलेला केवळ 23 वर्षांचा तरुण आहे. अजून 8 चाचण्यांचे रिपोर्ट येण्याची बाकी आहेत, त्यातील 1 रिपोर्ट हाय रिस्क नमुन्यात ला येणे बाकी आहे. बुलडाणा शहरात कोरोना पॉझिटिव्ह संख्या आता 4 त्यातील एक जण आधीच मृत झालेला आहे.

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

कोरोना हॉस्पीटल तातडीने कार्यान्वित करावे
                       - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर

                जालना, प्रतिनिधी- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आज दि. 31 मार्च रोजी सामान्य रुग्णालय, परिसरात तयार होत असलेल्या कोरोना हॉस्पीटल तयारीची पाहणी करत कोरोना हॉस्पीटल तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देत कोरोना संदर्भातील प्रतिबंधात्मक उपयायोजनांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
याप्रसंगी  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे , मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर  राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदी उपस्थित होते.
    कोरोना विषाणुचा (कोव्हीड – 19) प्रादुर्भाव  रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागु करण्यात आलेला असुन दि.1 मार्च 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी व आवश्यकतेनुसार अलगीकरण किंवा विलगीकरण करणे अत्यावश्यक आहे.  जिल्ह्यातील नागरिकांनी  परदेशात प्रवास केल्याची माहिती प्रशासनास देऊन स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची तपासणी सामान्य रुगणालय, जालना येथे करुन घ्यावी. यासाठी जिल्हास्तरावर मुख्य  कार्यकारी अधिकारी यांना समन्वय अधिकारी  म्हणुन नेमणुक केली असून त्यांच्या अधिनस्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना त्यांचा सहाय्यक अधिकारी नेमणुक करण्यात आली आहे. मागील एक महिन्यात  आपण जर कोरोनाग्रस्त  अथवा इतर देशातुन, इतर राज्यातुन, इतर शहरातुन किंवा इतर जिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात आला असला तरी आपली माहिती  जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. 02482-223132  या क्रमांकावर कळवावे. जे नागरीक अशी माहिती लपवितील त्यांच्या विरुध्द साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
    जालना जिल्ह्यामध्ये दि. 31 मार्च, 2020  रोजी 2 रुग्ण नव्याने दाखल झाले आहे. एकुण 89 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी 87 रुग्णांचे स्कॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 83 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आले  आहेत. आजरोजी 11 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
     रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास  असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत 113 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी 111 व्यक्तींचे  घरीच अलगीकरण करण्याल आलेले आहे.  तसेच इतर शहरे व राज्यातुन आपलेल्या 11 हाजर 31 व्यक्तींची  तपासणी करुन त्यांचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवासितांची (Contact) संख्या 71 असुन  संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे 49, मुलींचे शासकीय वसतीगृह 6 व अंजता ब्लॉक पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 16जणांना दाखल करण्यात आलेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

सोमवार, ३० मार्च, २०२०

              श्रीहरी पाटील डोंगरे यांनी कोरोना बचाव साठी
              आपल्या कर्जत गावात केली औषध फवारणी.
 अंबड प्रतिनिधी: आज कर्जत येथे कोरोना
व्हायरस  गावात पसरू नये म्हणून गावातील कर्तव्यदक्ष सरपंच श्रीहरी पाटील डोंगरे यांनी स्वतःगावात सानिटायझर तसेच ब्लिचिंग पावडरची ट्रॅक्टरच्या ब्लोअरच्या साहाय्याने फवारणी केली.यावेळी शेतीनिष्ठ शेतकरी पांडुरंग तात्या डोंगरे तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश्वर मुंडे यांचे सहकार्य लाभले.कोरोना या संकटाला आपल्याला सर्वांना पळून लावायचे आहे त्यानिमित्ताने नागरिकांनी कुणीही घराबाहेर पडू नका.आत्याआवश्यकत वस्तूचे दुकानें वगळता इतर कोणतेही दुकानें उघडू नये,हात धुण्यासाठी डेटॉल ,सानिटायझर तसेच साबनाचा वापर करा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी श्रीहरी पाटील डोंगरे यांनी केली.

बदनापूर येथील हलदोला येथे ग्रामपंचयतीमार्फत केले धूर फवारणी
बदनापूर प्रतिनिधी:- बदनापूर येथील हलदोला 
येथे ग्रामपंचयती मार्फत केले धूर फवारणी जगभर कोरोना विषाणूने हाहाकर झाला आहे. भारत सरकारने लोकड्डाऊन केले आहे .कोरोना विषाणू रोखण्यासाठी हलदोला येथे ग्रामपंचायत ने ट्रॅक्टर द्वारे गावामधे धुर फवारणी केली.यावेळी गावतील प्रगतशील शेतकरी भारत मात्रे यांनी त्यांच्या ट्रॅक्टर ने फवारणी केली. व सरपंच उध्दव मात्रे यांनी सर्व जनतेला घरातच राहण्याचे आव्हान केले आहे .जनेकरून आपले गाव कोरोनामुक्त राहील.

    परराज्यातील नागरिकांच्या अडचणी तसेच अत्यावश्यक वस्तु संदर्भातील                      अडचणी सोडविण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.

जालना, प्रतिनिधी - लॉकडाऊन मुळे अडकलेले मजूर,
विस्थायपीत झालेले कामगार, परराज्याुतील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह अन्ने, पाणी, वैद्यकीय देखभाल आदी व्यावस्थाअ जिल्हाा प्रशासन करणार आहे. सर्व संबंधीतांना त्या च ठिकाणी थांबुन प्रवासाचा प्रयत्नय न करता तालुका अथवा जिल्हाे प्रशासनास या बाबत माहिती द्यावी. तसेच बाहेर राज्याितील नागरीकांना काही अडचण असल्या स जिल्हा प्रशानाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
राज्याातील नागरीकांना काही अडचण असल्याास संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन यामध्ये  टी.ई.कराड, कामगार अधिकारी, जालना मो. नं. ९४२३१४१४२३ , ७२१८१६१६२७ तसेच अन्न्धान्यन, रेशन, दैनंदीन उपजिवीका भागविण्यानसाठी अत्यामवश्ययक वस्तूअसंदर्भात अडचणी आल्यास श्रीमती.रिना बसय्ये, जिल्हात पुरवठा अधिकारी, जालना, मो.  ९८२३७५९९९७ व संतोष बनकर, सहायक जिल्हाी पुरवठा अधिकारी  जालना, मो.९६८९००११४९ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
  जालना जिल्या मध्येह दिनांक ३० मार्च, २०२० रोजी ०९ रुग्णच नव्या९ने दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ८७ रुग्ण  विलगीकरण कक्षात दाखल होते. त्या पैकी ८६ रुग्णांवचे स्वॅाब घेण्याबत आले असुन त्याणपैकी ७४ रुग्णांकचे अहवाल निगेटिव्ह९ प्राप्त झाले असुन त्या‍ रुग्णांझना डिस्चायर्ज देण्याुत आला आहे. आजरोजी ०९ रुग्णा विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांाची प्रकृती स्थिर आहे.
  रुग्णा्लयातून डिस्चा्र्ज झालेल्या  तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यतक्तीं्चे घरी अलगीकरण करण्यालत आलेले आहे. आजपर्यंत एकुण ११२ परदेश प्रवास केलेले व्य्क्तींसपैकी १११ व्य क्तीाचे घरीच अलगीकरण करण्या त आले आहे. एका व्यलक्ती्स विलगीकरण कक्षात दाखल करण्यागत आले आहे. तसेच इतर शहरे व राज्याकतून आलेल्याह ९ हजार ७०३ व्यतक्तींकचे तपासणी अंती घरीच अलगीकरण करण्या त आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...