बुधवार, १ एप्रिल, २०२०


हातावरील पोट असलेल्यांना गरिबांना शासनाच्या वतीने दहा हजार रुपये आर्थिक मदत द्या- सौ.शालिनी शर्मा
अन्याय प्रतिकारक दलाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.
जालना प्रतिनिधी :- कोरोना साथी मुळे 
देशभरात जनता कर्फ्यु लागु
 रिक्शाड्रायव्हर पासुन ते रोज काम केल्याशिवाय त्यांच्या घरात चुली सुध्दा पेटत नाही खास करुन झोपडपट्टीतील लोकांची तर फार दयनीय अवस्था झालेली आहे, बाहेर जावे तर कोरोना साथी मुळे मृत्यु व घरी रहावे तर परीवाराची होत असलेली उपासमार पाहुन ह्यांना आत्महत्या करावीशी वाटत आहे.करीता सर्वांना त्वरीत संसारोपयोगी सर्व धान्य देउन जो पर्यंत कोरोना साथीचे निवारण होत नाही तोपर्यंत प्रत्येकी कुटूंब प्रमुख च्या नावाने १००००/रु.अनुदान देण्यात यावे.आज देशभरात कोरोनासाथी मुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून जनता कर्फ्यु लागु आहे ह्या कारणे जे गोरगरीब हातांवर रोज काम करुन पोट भरत आहे अश्या परीवारावर फार बिकट वूळ आलेली आहे.तसेच जनता कर्फ्यु यशस्वी होणे कामी प्रधाणमंत्री गरीब योजनेत बदल झाल्यास शक्य होईल.नुसते गहु, तांदुळ,गो,तेल,व दाळी देऊन शक्य होणार नाही.कारण दर्या परीवारात १० ते १५ आहेत त्यांना सरासरी किमान १०,०००/ ते १५,०००/रु.खर्च येतो .तसेच घरात बारीक ते बारीक गोष्टी (गरजा)असतात.सरकार ने फक्त उज्वला गैसचाच उल्लेख केला आहे.पण उज्वला गैस किती लाभार्थ्यांकडे आहे.माझ्या मते याप्रसंगी ज्यांचेकडे जे गैस कनेक्शन आहे ते मिळायला हवे.ज्या परीवारात १५ व्यक्ती आहे अश्या परीवारात आठ दिवसांत २० किलो गहू व १० किलो तांदूळ लागते,तर बाकीचे वस्तु (सामान)किती लागते याचा अंदाज लावण्यात यावा.व या सोबत मिठ ,मिर्ची,हळद,मसाले,साबणी,सह दाळी, कडधान्य आलेच,व दुध,साखर,पत्ती,जर हे सगळे साहित्य (सामान) गरजुंपर्यंत तात्काळ पोहचले तर ही गरीब जनता बाहेर पडणार नाही.जर हे शक्य होत नसेल तर महाराष्ट्रातील सर्व गरीब जनतेच्या कुटूंब प्रमुखांच्या नावे त्यांच्या खात्यात कोरोना वायरसचे निवारण होत नाही तोपर्यंत प्रती महिना १००००/रु, अनुदान देण्याची व्यवस्था करावी ज्यामुळे गरीब जनतेच्या डोक्याला आलेला आर्थिक टेंशन दुर झाल्यास हे लोक कामांकरिता चोरुन इकडे तिकडे जाणार नाही व जनता कर्फ्यु यशस्वी होईल.करीता हे.साहेबांनी त्वरीत धान्यपुरवठा करून प्रत्येक कुटूंब प्रमुखांच्या नावे बैंक अकॉउंटला १००००/रु.टाकावे. अशी मागणी अन्यायप्रतिकारक दलाच्या मराठवाडा सरचिटणीस सौ.शालिनी शर्मा यांच्यावतीने करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...