सिंधीकाळेगाव :-जालना तालुक्यातील सेलगांव येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शेलगावचे सरपंच श्री धोंडीराम फकिरा पवार यांनी शेलगाव येथील सर्व गरजू नागरिकांना 50 कुंटल अन्नधान्याचे वाटप केले गरजुवताना कही तरी मदत करावा म्हनुण गहु वाटप केले ह्या वेळी उपस्थित योगेश जाधव राहुल पवार रोहित पवार सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
बुधवार, २२ एप्रिल, २०२०
सिंधीकाळेगाव :-जालना तालुक्यातील सेलगांव येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शेलगावचे सरपंच श्री धोंडीराम फकिरा पवार यांनी शेलगाव येथील सर्व गरजू नागरिकांना 50 कुंटल अन्नधान्याचे वाटप केले गरजुवताना कही तरी मदत करावा म्हनुण गहु वाटप केले ह्या वेळी उपस्थित योगेश जाधव राहुल पवार रोहित पवार सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
संचारबंदी काळात अवैध मद्य विक्रीवर प्रशासनाची ‘टाच’
बुलढाणा जिल्ह्यात 77 गुन्हे; 57 आरोपींना अटक
9 लाख 71 हजार 521 रूपयांचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा जिल्ह्यात 77 गुन्हे; 57 आरोपींना अटक
9 लाख 71 हजार 521 रूपयांचा मुद्देमाल जप्त
बुलडाणा, प्रतिनिधी : कोरोना विषाणू संक्रमणाच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद
करण्यात आलेल्या आहेत. तसेच बारसुद्धा बंद आहेत. मात्र जिल्ह्यात अवैधरित्या मद्य विक्री, मद्य निर्मिती होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागास मिळाली. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक आदींवर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदी काळात अशा्रपकारचे 77 गुन्हे दाखल करण्यात आली असून 57 आरोपींना अटक करण्यात आली आहे.लॉकडाऊन कालावधी लागू झाल्यापासून 21 एप्रिल 2020 पर्यंत जिल्ह्यात अवैध मद्याबाबत 77 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये हातभट्टी दारू 508 लीटर, मोहा सडवा रसायन 10309 लीटर, मोहाफुले 20 किलो, विदेशी मद्य 27.45 लीटर, बिअर 202.8 लीटर, देशी मद्य 105.22 लीटर, एक चारचाकी वाहन व 10 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली ओहत. अशाप्रकारे एकूण 9 लाख 71 हजार 521 रूपयांचा दारूबंदी गुन्ह्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्ह्यातील भिलवाडा, देऊळघाट शिवार, डोंगरखंडाळा शिवार, सुंदरखेड, डोंगरशेवली, अंबाशी, शिरपूर शिवार, अमडापूर, पेठ शिवार, मेहकर फाटा, खरमोळा, लाडनापूर शिवार, खिरोडा व नागापूर शिवार, किन्ही महादेव गाव व शिवार, पारखेड, शेलूडी शिवार, खामगांव, चांदई शिवार, कोलारा, शेळगांव आटोळ शिवार, सावरखेड नजीक शिवार, पळसखेड दौलत शिवार, देऊळगांव घुबे शिवार, गायखेड व हरणखेड शिवार, कुऱ्हा गोतमारा शिवार, शेलापूर, बोराखेडी शिवार, धाड – करडी शिवार, रणथम शिवार, देवधाबा शिवार या जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे.ही कारवाई जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे यांच्या सुचनेनुसार अधिक्षक बी.व्ही पटारे यांचे कालावधीत करण्यात आलेली आहे. या कारवाईत निरीक्षक जी. आर गावंडे, डि. आर शेवाळे, भरारी पथकाचे एस. डी चव्हाण, ए. आर आडळकर, दुय्यम निरीक्षक र.ना गावंडे, एन. के मावळे, वा. रा बरडे आणि यांचे पथकातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, असे अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी कळविले आहे.
सैलानी येथील मनोरुग्ण व नातेवाईक यांची जेवण व राशनची व्यवस्था करा
आमदार श्वेताताई महाले यांची पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे साहेब यांच्याकडे मागणी
बुलडाणा,प्रतिनिधी:- सैलानी ता.जि. बुलडाणा हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असून हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्माचे भाविक दर्शनासाठी येत असतात. येथे मोठ्या प्रमाणावर मनोरुग्ण बरे होतात अशी मान्यता असल्याने तिथे मनोरुग्ण येण्याचे खूप मोठे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविक येणे बंद झाल्याने मनोरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची उपासमार होत असल्याने त्यांच्या राशन व जेवण्याची व्यवस्था करण्याची मागणी आ. सौ. श्वेताताई महाले यांनी पालकमंत्री मा .ना. राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्याकडे एका लेखी निवेदनाव्दारे केली आहे .दि 21/4/2020 रोजी आजही लॉक डाऊन असतांना ही सैलानी येथे शेकडो मनोरुग्ण व त्यांचे नातेवाईक आहे. सगळी कडे तीर्थक्षेत्रे बंद असल्याने भविकांचे येणे जाणे बंद आहे . तिथे मागून खाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांचे पोट ही मिळेल त्याच्यावर असल्याने त्यांची उपासमार होत आहे . तेथील मनोरुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खाण्यासाठी काहीही नसल्याने त्यांचे हाल होत आहे . त्यांच्याजवळ राशन कार्ड नाही. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. मनोरुग्ण साखळयांमध्ये बांधलेले असल्याने ते खाण्यापिण्यासाठी भटकंती सुद्धा करू शकत नाही . जे मनोरुग्ण मोकळे आहेत त्यांना कुणी जवळ येऊ देत नाही .
त्यामुळे तिथे राहत असलेले मनोरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांची राशनची व जेवण्याची व्यवस्था करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आ. सौ. श्वेताताई महाले यांनी केली आहे .
बुलडाणा,प्रतिनिधी:- सैलानी ता.जि. बुलडाणा हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असून हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्माचे भाविक दर्शनासाठी येत असतात. येथे मोठ्या प्रमाणावर मनोरुग्ण बरे होतात अशी मान्यता असल्याने तिथे मनोरुग्ण येण्याचे खूप मोठे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविक येणे बंद झाल्याने मनोरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची उपासमार होत असल्याने त्यांच्या राशन व जेवण्याची व्यवस्था करण्याची मागणी आ. सौ. श्वेताताई महाले यांनी पालकमंत्री मा .ना. राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्याकडे एका लेखी निवेदनाव्दारे केली आहे .दि 21/4/2020 रोजी आजही लॉक डाऊन असतांना ही सैलानी येथे शेकडो मनोरुग्ण व त्यांचे नातेवाईक आहे. सगळी कडे तीर्थक्षेत्रे बंद असल्याने भविकांचे येणे जाणे बंद आहे . तिथे मागून खाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांचे पोट ही मिळेल त्याच्यावर असल्याने त्यांची उपासमार होत आहे . तेथील मनोरुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खाण्यासाठी काहीही नसल्याने त्यांचे हाल होत आहे . त्यांच्याजवळ राशन कार्ड नाही. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. मनोरुग्ण साखळयांमध्ये बांधलेले असल्याने ते खाण्यापिण्यासाठी भटकंती सुद्धा करू शकत नाही . जे मनोरुग्ण मोकळे आहेत त्यांना कुणी जवळ येऊ देत नाही .
त्यामुळे तिथे राहत असलेले मनोरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांची राशनची व जेवण्याची व्यवस्था करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आ. सौ. श्वेताताई महाले यांनी केली आहे .
धक्कादायक नांदेड पिर बुऱ्हाणनगर येथे
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
नांदेड (भगवान कांबळे):-नांदेड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन च्या काळात प्रशासनाने प्रचंड काळजी घेतली होती.जिल्ह्यात काल कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने नांदेड जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती होती. बुधवारी मात्र नांदेड शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या रुग्णाचे वय 64 असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्यांदा लॉकडाऊन घोषित केल्यापासून जिल्हा प्रशासन
आणि पोलिसांनी जिल्ह्यातील परिस्थितीही आखून दिलेल्या नियमांप्रमाणे काटेकोर पद्धतीने हाताळली होती त्यामुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता.आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 683 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 222 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 89 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 70 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 613 अशी संख्या आहे.दि. २१ एप्रिल रोजी तपासणीसाठी 66 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 449 नमुने तपासणी झाले आहेत. यापैकी 378 नमुने निगेटीव्ह आले असून 66 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी होते. नांदेड जिल्ह्यात काल पर्यंत कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने दिलासादायक परिस्थिती होती. काल पाठवलेले 66 संशयिताचे तपासणी अहवालातील उर्वरित 9 लोकांपैकी 8 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजते तसेच 1 संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजते. बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 77 हजार 676 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले होते.मंगळवारी रात्री नांदेड जिल्ह्यातून 9 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो राहात असलेला संपूर्ण परिसर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2
या वेळेतच सुरु ठेवावीत.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी
जालना,प्रतिनिधी:- जालना शहरासह जिल्ह्यातील सर्व दुधविक्री, फळे व भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, पेट्रोलपंप, घरगुती गॅस व औषधी दुकाने सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेतच सुरु ठेवावीत. या व्यतिरिक्त ईतर सर्व दुकाने
जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 302 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-49,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-15, पोलीस प्रशिक्षण केंद्र-98, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 304 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 59 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 302 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 766 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 38 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 449 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 20 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 544 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 515, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 91, एकुण प्रलंबित नमुने-22 तर एकुण 411 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 89, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 265 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 27, सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती -302, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-09, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 38, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. मंगळवार, २१ एप्रिल, २०२०
किनवटमध्ये डीसीएचसी, सीसीसी या दोन रुग्णालय व तपासणी केंद्राची स्थापना
तपासणीसाठीचा घश्याच्या स्त्रवाचा नमुना घेता येणार
नांदेड(भगवान कांबळे):- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पन्नास बेडचे डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) व शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यात आले असून कोरोना सदृश्यलक्षणे आढळलेल्या रुग्णास येथे प्रविष्ठ करून त्यांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या व घश्याच्या स्त्राव घेऊन चाचणीसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.जगभर वेगाने पसरणाऱ्या कोरोना (कोव्हीड- 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी. याचाच एक भाग म्हणून कोरोना नियंत्रणासाठी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात प्रशासनाच्यावतीने तयारी करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे सर्व वैद्यकीय साधनसामुग्री वऔषधांसह सुसज्ज पन्नास बेडचे डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर ( डीसीएचसी ) उभारण्यात आले आहे. तहसिलदार नरेंद्र देशमुख हे या केंद्राचे नोडल ऑफिसर अत्यावश्यक सेवा म्हणून काम पाहणार असून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे वैद्यकीय अधिकारी, नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी या केंद्रासाठी 24 तास सेवा बजावणार आहेत. एखाद्या नागरिकास ताप, सर्दी, खोकला किंवा श्वासोच्छवासास अडथळा येणे, दम लागणे अशी लक्षणे आढळल्यास त्यांना कोरोनासदृश्य रुग्ण म्हणून येथे भरती करून घेण्यात येणार आहे. त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करून चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे.किनवट येथील नवीन तहसिल इमारतीत शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यात आले आहे. गटविकास अधिकारी सुभाष धनवे हे या केंद्राचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार असून तालुका आरोग्य अधिकारी, मेडिकल नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा डॉक्टर व ईतर कर्मचारी या केंद्रासाठी 24 तास सेवा बजावणार आहेत. या केंद्रात कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेली व्यक्ती किंवा परदेशातून तथा रेड झोन असलेल्या परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीस कोणतीही कोरोनासदृश्य लक्षणे नसतील तरीही त्यांना या केंद्रात भरती करण्यात येणार आहे. चौदा दिवस ते येथेच कोरोंटाईन असतील. या कालावधीत दैनंदिन तपासणीअंती काही लक्षणे आढळल्यास त्यांना डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर (डीसीएचसी) मध्ये भरती करण्यात येईल. तेंव्हा नागरिकांनी सतर्क राहून अशा व्यक्तिंना घरातच दडून न राहता सदरील केंद्रांत भरती करण्यास प्रवृत्त करावे. आपण जरी ग्रीन झोनमध्ये असलो तरी 'लॉकडाऊन' च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे तांदूळ वाटप
धर्माबाद (भगवान कांबळे ):- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील सर्व माध्यमांच्या शाळा (ता. १५) मार्चपासून बंद करण्यात आल्या आहेत.
मागील पंचवीस दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी सुरक्षितपणे आपापल्या घरी वावरत आहेत.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करून गुजराण करतात. मागील पंचवीस दिवसांपासून सर्व व्यवसायिक शेतीची कामे बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतून मध्यान्ह भोजन दिल्या जात असे. त्यामुळे मुलांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था शाळेमध्येच होत असल्याने पालकांनाही आधार मिळत असतो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 23 मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहारात खंड पडला आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ वितरित करण्याचे शिक्षण संचालक यांनी 15 एप्रिल रोजी एक पत्र काढून आदेशीत केले होते. त्यानुसार धर्माबादच्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वितरित करण्यात आले. सर्व विद्यार्थी व पालकांना सुरुवातीस सामाजिक योग्य अंतर ठेवण्याचे व तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधूनच उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती. त्याचे सर्वांनी तंतोतंत पालन केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण पांचाळ, पत्रकार तथा समितीचे शिक्षणतज्ञ भगवान कांबळे, नगर सेवक शाळेचे स्वीकृत सदस्य रमेश पाटील बाळापूरकर, सदस्य गंगाप्रसाद रापतवार, सय्यद अहमद अब्दुल, महेंद्र तामटे, सौ. लक्ष्मीबाई आंबेवार, सौ. अजमेर सय्यद कलीम, निर्वाण वाघमारे यांच्यासह मुख्याध्यापक एम. एन. कागेरू, नासा येवतीकर, माधव हिमगिरे, ए. एस. सय्यद या शिक्षकांची उपस्थिती होती.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर. महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...
-
मादळमोहीच्या अंखड हरीनामस सप्ताहाचीउत्साहत सांगता संपन्न. मादळमोही | प्रतीनिधी . दि.11..संत सम्राट जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्या...
-
औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव. गणेश आठवले | औरंगाबाद आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने औरंगाबादच...
-
मादळमोहित सार्वजनिक रक्तदान शिबीरास उत्षपुर्त प्रतीसाद.45 युवकांचे दानत्व मादळमोहि (हँलो रिपोर्टर .न्युज )दि.24. :- महाराष्ट्रात ...







