गुरुवार, ७ मे, २०२०


अंजानी आई फाऊंडेशनच्या वतीने व IRS Shri Garkal sir (JNV), Assistant Commissioner GST Aurangabad यांचे माध्यमातुन  औरंगाबाद येथील भिमनगर एरीयामध्ये  रेशन कीट वाटप.


औरंगाबाद प्रतिनिधी :- कोरोनावायरस संसर्ग ने देशभर हाहाकार माजवला असुन  लाॅकडाउन मुळे गोर गरीबांचे हाल होत आहेत. औरंगाबाद शहरा मध्ये दुस-या राज्यातुन, जिल्हयातुन  मोल मजुरी साठी व शिक्षणा साठी विद्यार्थी औरंगाबाद शहरा मध्ये येतात. अचानक लाॅकडाउन  मुळे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. औरंगाबाद शहरातील सर्वात जास्त  कोरोनाबाधित रुग्ण असणारा एरीया  भिमनगर सील करण्यात आला. अंजानीआई फाउंडेशन च्या औरंगाबाद टिम ला वसमत वरुन फोन आला काही  विद्यार्थी सर्वात जास्त कोरोना बाधित संख्या असणारा भिमनगर या ठिकानी विद्यार्थी अडचणीत आहेत. कोणतीही  संस्था भीती मुळे कोरोणा बाधित क्षेत्रात  धान्य देत नाही या भागात  धान्याची मदत करता येइल का अशी मागणी अंजानी आई फाउंडेशन ला करण्यात आली. कर्तव्यावर असणारे अंजानी आई फाउंडेशन चे PSI बी.एच.किरवले  यानी श्रीमती जयश्री गवई मॅडम (IRS) Deputy Commissioner, GST, Aurangabd, श्री गरकल सर
(IRS) Assistant Commissioner, GST, Aurangabad,श्री धिरज कांबळे सर (IRS)  Assistant Commissioner, GST, Aurangabd यांच्या माध्यमातुन तात्काळ 40 धान्यकिट भिमनगर औरंगाबाद  या ठिकाणी गरजुंना दिले. सामाजिक जबाबदारी स्वीकारुन  कोरोनाबाधित वार्डात स्वत: जाऊन मदत करण्यात आली.
एकीकडे पोलीस अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालुन  कर्तव्य बजावत आहेत तसेच अंजानी आई फाउंडेशन जालना गरीब , गरजु कुटूंबांना धान्य, फुड पॅकैट  देउन भुक भागवित आहे, सामाजिक कर्तव्य निभावत आहे.अशी माहीती फाउंडेशन च्या विधा जाधव, ज्ञानज्योत संस्था च्या अध्यक्षा ज्योती आडेकर यांनी दिली


जिंकणार आहोत आम्ही कोरोनाविरुद्धचे युद्ध; कारण आमच्या सोबत आहे भगवान बुद्ध
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निवासस्थानी शांततेचे दिवे लावून बुद्ध पौर्णिमा साजरी

 

मुंबई,प्रतिनिधी :- नक्षलवाद; दहशतवाद आतंकवाद माओवाद या सर्वांवर भगवान बुद्धांचा शांततेचा अहिंसेचा विचार हाच उपाय आहे. जगात आता कोरोना हजारो लोकांचे जीव घेत आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या शांततेच्या विचारानेच मात करता येईल.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. आम्ही जिंकणार आहोत कोरोना विरुद्ध चे युद्ध कारण आमच्या सोबत आहे भगवान गौतम बुद्ध अशी यावेळी शीघ्र कविता ना रामदास आठवले यांनी सादर केली. भगवान गौतम बुद्धांची  2564 वी जयंती ना रामदास आठवले यांच्या संविधान निवासस्थानी आज साजरी झाली. बुद्ध मूर्तीला पुष्प वाहून; त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन तसेच सायंकाळी शांततेचे प्रतिकात्मक दिवे मेणबत्ती लावून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. 
यावेळी केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या पत्नी  सौ सीमाताई आठवले पुत्र जित आठवले तसेच कुटुंबीय आणि धुमधडाकाफेम अभिनेत्री सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे;  रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाश महातेकर;राष्ट्रीय उपाध्यक्ष  काकासाहेब खंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
 भगवान बुद्धांनी शांती; अहिंसा बहुजन हिताय बहुजन सुखाय चा माणसाला माणसाशी जोडणारा जगात पहिला लोकशाहीचा विज्ञानाचा विचार मांडणारा बौद्ध धम्म जगाला दिला. शांततेतून संयम आणि एकाग्रता येते.शांत विचारामुळे लॉक डाऊन चे नियम संयमाने पाळून आपण कोरोनाला हरवू शकतो. त्यामुळे शांततेचे विचाराचे प्रतीक म्हणून शांततेचे दिवे ; मेणबत्ती लावून आज बुद्ध पौर्णिमा आम्ही साजरी केली असे ना रामदास आठवले म्हणाले.कोरोना ला हरविण्यासाठी घरीच राहा; बाहेर गर्दी करू नका असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे. कोरोनाचे संकट जगातून नष्ट होवो अशी अपेक्षा व्यक्त करीत ना रामदास आठवले यांनी बुद्ध जयंती च्या शुभेच्छा दिल्या  आहेत. 
                 

बुधवार, ६ मे, २०२०

युवक राष्ट्रवादीने दिला गरजुना मदतीचा आधार
संकटकालीन धावून येण्यासाठी राष्ट्रवादी सदैव तत्पर - शरद टोपे




जालना / प्रतिनिधी :- कोरोना आजारामुळे लॉकडाऊन वाढले असून गोर - गरीबाचे आणि हातावर पोट असलेल्यांचे हाल होत आहेत . त्यांची दखल घेऊन जालना युवक राष्ट्रवादीच्या वतीने गरजवंत नागरीकांना संसारउपयोगी साहित्य वाटप करण्यात आले आहे . यावेळी युवक राष्ट्रवादीचे शरद टोपे दिपक भुरेवाल , बबलू चौधरी , नंदकिशोर जांगडे , सौ . रसनाताई देहडकर , डॉ . हंडे ताई मेघराज चौधरी , शेख सलीम , अनवर मिा महेंद्र हुळे , महेश कुलकर्णी , संतोष शिखोटे आदींची उपस्थिती होती . संकटकालीन धावुन येण्यासाठी राष्ट्रवादी सदैव तत्पर सामान्य जनतेच्या पाठीमागे खंबीर पणे उभी राहते . असे शरद टोपे यांनी यावेळी सांगितले . आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली अणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे यांच्या नेतृत्वाखाली युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या पुढाकाराने शहरातील विविध भागातील गरजवंतांना २५० कुटुंबीयांना संसारउपयोगी साहित्य वाटप करण्यात आले आहे . कोरोना या विषाणू ला हरवण्यासाठी जनतेने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे , असेही यावेळी शरद टोपे म्हणाले . राजेंद्र जाधव यांनी केलेल्या या कार्याचे नंदकिशोर जागडे यांनी कौतुक केले आहे . केलेल्या या उपक्रमाचे आमचे कर्तव्य म्हणून राबवत असल्याचे राजेंद्र जाधव यांनी सांगितले . पुढे बोलताना ते म्हणाले की , येणारा काळ हा संकटाचाच आहे . लॉकडाऊन हे वाढण्याची भीती आहे . अशा वेळी हातावर पोट भरणाऱ्यांचा प्रश्न बिकट बनण्याची शक्यता आहे . मात्र राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आपला मदतीचा यज्ञ हा अविरत सुरू ठेवणार असून गरजवताना कधीही मदतीसाठी हात देईल त्यांच्या मदती साठी आम्ही कायम उभे राहणार असल्याची ग्वाही राजेंद्र जाधव यांनी दिली .


परराज्यातील लोकांचा जाण्याचा प्रवास खर्च जालना
जिल्हा काँग्रेस कमिटी करणार - जिल्हाध्यक्ष देशमुख


जालना (प्रतिनिधी) :- देशातील विविध राज्याचे नागरीक व मजुर आणि कामगार प्रप्रांतात कोरोना संसर्गजन्य आजारामुळे उद्धभवलेल्या लॉकडाऊमुळे अडकुन पडले आहेत. त्यांच्या मुळ गावी (परराज्यात) जाण्यासाठी त्यांच्याजवळ अदलापैसा नाही अश्या परप्रांतीयांना काँग्रेसपक्षाने मदतीचा हात पुढे केला आहे. जालना जिल्ह्यातील अश्या लोकांचा जाण्याचा प्रवास खर्च जालना जिल्हा काँग्रेस कमिटी करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सांगीतले आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी पक्षाचे नेते खा. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देशातील विविध राज्यातील मजूर, कामगार कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आपल्या राज्यात जावू शकत नाही त्यांची अत्यंत हलाकीची परिस्थिती बनली आहे. हजारो कामगार पायी निघाले आहेत. देशातील या लाखो लोकांची गंभीर व नाजूक परिस्थिती समोर आल्यामुळे काँग्रेसपक्षाने या लाखो लोकांना त्यांच्या राज्यात पोहचत करण्यासाठी त्यांचा प्रवास खर्च उचल्ला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसनेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे चर्चा करून जालना जिल्ह्यात अडकलेले प्रप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पोहचत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद यांच्यावर जवाबदारी सोपवली आहे. सबंधीतांनी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे या साठी माणगांव प्रेस क्लबचे तहसिलदारांना लेखी निवेदन


बोरघर  / माणगांव (प्रतिनिधी)  :- लोकशाहीचा चौथा स्तंभ आज वैश्विक कोरोना संकटात सापडला असून तो कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदीत स्वतः च्या जीवाची पर्वा न करता, कोरोना मुक्तीच्या राष्ट्रीय लढ्यात जीवाची बाजी लावून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता काम करतोय. कोरोना संकटात सापडलेल्या जनतेचे वास्तव स्थिती, शासनाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी समाजप्रबोधनपर माहिती आपल्या लेखणी द्वारे जनते पर्यंत पोहचविणे, गोरगरीब, दीन दूबळ्यांची आर्थिक परिस्थिती जगासमोर आणण्यासाठी, भूकेलेल्यांना अन्न, मदत मिळवून देण्यासाठी पत्रकार अहोरात्र आवाज उठवित आहेत. अनेकांना त्यांनी केलेल्या सत्कर्मांचे आपल्या लेखणीद्वारे कौतुक करुन प्रोत्साहीत केले.परंतु स्वतःसाठी मात्र कसलीच अपेक्षा केली नाही. एवढे सर्व करूनही आज लोकशाहीचा चौथा स्तंभ सर्व प्रकारच्या सरकारी सुविधांपासून वंचित आहे. शासन आणि जनता या मधील दुवा असलेल्या पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे या करीता रायगड प्रेस क्लब संलग्न माणगांव प्रेस क्लबच्या सर्व पत्रकार सदस्यांनी या संदर्भात एकमुखाने निर्णय घेतला असून राज्याचे मा. मुख्यमंत्री यांना माणगांव तहसिलदार श्रीमती प्रियंका आयरे यांच्या मार्फत लेखी निवेदन सादर केले आहे. 
       राज्याचे माननीय संवेदनशील  मुख्यमंत्री श्री. उद्धव जी ठाकरे साहेब आणि संबंधित प्रशासकिय अधिकारी यांनी पत्रकारांची ही रास्त मागणी लक्षात घेऊन त्या अनुषंगाने अंमलबजावणी करावी. तसेच पत्रकारांना सुद्धा इतरांप्रमाणे तातडीने मदत देण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी. यासाठीच पत्रकारांना कमितकमी विमा संरक्षण तरी मिळावे या मागणीचा विचार व्हावा. म्हणुन आज दि. ६ मे रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनंती वजा मागणीचे निवेदन माणगांव तालुका प्रेसक्लब च्या वतिने तहसिलदारांना सादर केले आहे. कोव्हिड १९ संदर्भात तातडीच्या सभेसाठी तहसिलदार बाहेर गेल्या असल्या कारणे माणगांव नायब तहसिलदार बि. वाय. भाबड यांच्याकडे सदर निवेदन देण्यात आले.
       या प्रसंगी माणगांव तालुका प्रेसक्लबचे पत्रकार अध्यक्ष उत्तम तांबे, माजी अध्यक्ष गौतम जाधव, जेष्ठ सल्लागार रविंद्र कुवेसकर या तिघांनी प्रातिनिधीक स्वरूपात माणगांव प्रेसक्लबच्या सर्व पत्रकार सदस्यांच्या वतिने निवेदन दिले आहे. 


मंगळवार, ५ मे, २०२०

मुंबई आणि पुणे मंडळात बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक

राज्यात एकाच दिवशी ३५० कोरोना बाधीतांना घरी सोडले

आरोग्ययंत्रणेच्या प्रयत्नांना यश; नातेवाईकांना दिलासा



मुंबई,प्रतिनिधी: कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवईकांनाही दिलासा आणि धीर मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात २२८ रुग्ण काल घरी गेले. त्यापाठोपाठ पुणे मंडळात ११० रुग्णांना पाठविण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कालपर्यंत राज्यात एकूण २४६५ कोरोना बाधीत रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याने बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्यानेही चाचण्या मोठ्याप्रमाणावर होऊन रुग्णांचे निदान वेळेत होत आहे.
राज्यात ९ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर २३ मार्चला पहिल्यांदा पुणे येथील रुग्णांना घरी सोडण्यात आले त्यानंतर दररोज राज्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. काल सोमवारी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना घरी सोडले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. त्यामध्ये मुंबई महापालिका क्षेत्रातील १६५, ठाणे ३, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १४, कल्याण डोंबिवली मनपा ७, वसई-विरार मनपा २३, रायगड ३ तर पनवेल मनपा येथील २ असे मुंबई मंडळात एकूण २२८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे मनपा ७२, पिंपरी-चिंचवड मनपा १४, सोलापूर मनपा २२ तर सातारा येथील २ असे पुणे मंडळात एकूण ११० रुग्णांना घरी सोडले. अमरावती मनपा १, बुलढाणा येथे १ तर नागपूर मनपा क्षेत्रात १० रुग्णांना घरी सोडण्यात आले.
सध्या राज्यात एकूण प्रयोगशाळा असून त्यापैकी २५ शासकीय आणि २० खासगी प्रयोगशळा आहेत. दररोज त्यांच्या माध्यमातून सात हजारपेक्षा जास्त चाचण्यांची क्षमता आहे. कालपर्यंत राज्यात पावणे दोन लाख नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार नमुने निगेटिव्ह आले आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 


आर्थिक आणिबाणी  लागू करताना सहा महिन्याचे नियोजन जाहीर करावे - वंचित बहुजन आघाडी.



पुणे,प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत कोरोनाचे संकट वाढल्याने राज्य सरकारने राज्यात आर्थिक आणिबाणी लागू केली असून आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा खात्यांना प्राधान्यक्रम दिला आहे. असे असले तरी या मध्ये पोलीस दलासोबतच अत्यावश्यक सेवेतील सर्व विभागांना प्राध्यान्य देणे गरजेचे असून प्रत्येक विभागाला ३३ टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे समर्पित होणा-या ६७ टक्के निधीचे पुढील सहा महिन्याचे नियोजन आणि संघटीत - असंघटीत कामगार, शेतकरी,शेतमजूर व बेरोजगार यांच्याबाबतीत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
     आरोग्य विभाग सोडल्यास कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय शक्य तिथे आर्थिक तडजोड, काटकसर करण्याच्या सूचना अर्थ विभागाने दिल्या आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका नव्या नोकरभरतीला बसणार आहे. फडणवीसांच्या काळात रखडलेली ७२ हजार जागांची नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र कोरोनामुळे  कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेश अर्थ विभागाने दिले आहेत. परंतु आरोग्य, पोलीस विभागातील भरती थांबविली जाऊ नये. तसेच विविध योजना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळे नवीन कामांचे प्रस्तावही सादर करता येणार नाही. प्रत्येक विभागाला ३३ टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्याने निधी दिला जाणार आहे. या विभागा बरोबरच अत्यावश्यक सेवेतील सर्व विभागांना देखील या मध्ये समाविष्ट करणे गरजेचे असल्याचे पातोडे यांनी सांगितले.           
              राज्यात पीपीई किट, एन ९५ मास्क व थ्री लेयर मास्क तसेच सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. शासकीय कर्मचा-याचे वेतन अद्यापही  थकीत असून जून मध्ये वेतन मिळेल की नाही याची शाश्वती नाही. आर्थिक वर्षात सर्व नव्या योजनांवर बंदी आणण्यात आली आहे.आरोग्य खाते सोडल्यास इतर  कुठल्याही खात्याला नवीन बांधकाम तसेच कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अनेक योजना पुढे ढकलण्या बरोबरच त्या योजना आपल्या स्तरावर स्थगित करणे तसेच या योजना रद्द करण्यासाठी ३१  मे पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. अशा प्रकारे राज्यावर आर्थिक आणिबाणी लावण्यात आली आहे. शासकीय तिजोरीची तूट भरणे आवश्यक आहे. मात्र समर्पित होणाऱ्या ६७ टक्के निधीचे नियोजन शासनाने सांगितलेले नाही. हा आकडा सरकारी महसुल वसुलीच्या किती तरी अधिक आहे. त्यामुळे त्याचे नियोजन तातडीने जाहीर होणे गरजेचे आहे. 
             शेतक-याची रब्बी पिके घरात पडून आहेत. त्याची खरेदी शासनाने करून घेतली पाहिजे. सोबतच शेतक-यांना खरीप पिकांच्या पेरणी आणि मशागती करीता बियाणे, खते तसेच दहा हजार रुपये रोख दिले पाहिजे. बाजार समित्यांच्या खरीप पिकातून हा खर्च वसूल करता येईल.रोजगार हमी योजनेची कामे बंद आहेत ते शारीरिक अंतर राखून तातडीने सुरु करण्यात यावी व शहरी भागात देखील १०० दिवस रोजगार देण्याची योजना राबविण्यात यावी, अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. जनतेवर नुसते निर्बंध लादण्यात येऊ नये तर त्या सोबत माणसे जगली पाहिजे याची उपाययोजना देखील करावी अशी अपेक्षा वंचितने व्यक्त केली आहे.  


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...