शनिवार, १६ मे, २०२०

*अंबड तालुक्यातील मुडेगाव येथील गुटखा जप्त, पोलिसांनी केलेली कारवाई*


दि 16 मे रोजी पहाटे तीन वाजता धाड टाकून झाडाझडती असता 16 गोण्या गोवा गुटखा तर 16 गोण्या सुगंधी सुपारी

*अंबड/अरविंद शिरगोळे* : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मुडेगाव येथिल जाहीर उस्मान पटेल यांच्या घरात गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जहीर उस्मान पटेल याच्या घराची आज दि 16 मे रोजी पहाटे तीन वाजता धाड टाकून झाडाझडती घेतली असता 16 गोण्या गोवा गुटखा आणि 16 गोण्या सुगंधी सुपारी, असा छापील किमतीनुसार 1 लाख 28 हजार रुपयांचा अवैध व प्रतिबंधित गुटखा साठा आढळून आला आहे. आरोपी जहीर पटेल यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने हा माल फारूक नामक व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिली आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागामार्फत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू आहे.
पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ, पोलीस कर्मचारी विष्णू चव्हाण पाटील, संदीप पाटील, महिंद्र गायचे, शुभम तळेकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केले आहे. व शहरात खळबळ उडाली आहे

*पोलीस ठाण्याच्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी तडकाफडकी केल्या बदल्या*

अधिकार्‍यांमध्ये अधून-मधून खटके, एस.चैतन्य  तडकाफडकी ने केल्या बदल्या


*अंबड/प्रतिनिधी* : अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकार्‍यांना पोलीस निरीक्षक एस.चैतन्यांनी यांनी आज शुक्रवारी तडकाफडकी हलवले असून गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या जागी आता तालुका जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात चार महिन्यापूर्वी झालेले प्रभारी अधिकारी मिलिंद खोपडे आणि इतर दोन अधिकार्‍यांमध्ये अधून-मधून खटके उडत होते ही बाब पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी गंभीर दखल घेत येथील तीनही अधिकाऱ्यांची आज बदली केली आहे. गोंदी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. मिलिंद खोपडे यांची पोलीस नियंत्रण कक्ष पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांची चंदनझिरा आणि उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांची सदर बाजार पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तालुका जालना पोलीस ठाण्यातील स.पो.नि.रत्नदीप जोगदंड यांची गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच चंदंझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले आणि सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळसे यांची गोंदी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांमधील अंतर्गत यामुळे बेबनवामुळे पोलीस अधीक्षक एस.चैतन्य  तडकाफडकी बदल्या केल्याची चर्चा चालू आहे

*अंबड़ शहरात प्रिन्स लॉज जवळ  पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार जाँन पिल्ले 7 हजाराची घेतली लाच*

प्रतिबंधक विभाग जालना यांनी रंगेहाथ पकडल्याने अंबड शहरात खळबळ


*अंबड/प्रतिनिधी* :  अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जाँन पिल्ले यांना आज दि 13 मे रोजी प्रिन्स लाँजजवळ अंबड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांनी रंगेहाथ पकल्याने खळबळ माजली आहेयाबाबत हकिगत अशी की , यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की , त्यांचेवर व त्यांचे भाऊ ,पत्नी आणि मुलगी यांचेवर पोलीस ठाणे अंबड जि जालना येथे दाखल असलेल्या गुरन 173 / 2020 कलम 324 , 323 . 504 , 506 , 34 भादंविचे गुन्हयात अटक न करता मा कोर्टात हजर करुन तपासात मदत करण्यासाठी आलोसे श्री जॉन पिले पोहेकॉ / 1018 यांनी तक्रारदाराकडे 40 , 000 / – रूपये लाचेची मागणी केली . सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली . सदर तक्रारीची दिनांक 11 . 05 . 2020 रोजी पडताळणी केली असता तहजोडीअंती तक्रारदार यांचेकडे लोकसेवक श्री . जॉन पिल्ले पोहेकॉ / 1018 यानी 20 , 000 / – रुपयेची लाचेची मागणी करून लोकसेवक श्री . जॉन पिल्ले पोहेकॉ / 1018 यांनी दि . 13 . 05 . 2020 रोजी 20 , 000 / – रुपये रक्कमेपैकी पहीला हप्ता म्हणुन 7 , 000 / – रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष लाच स्वीकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पथकाने प्रिन्स लॉज जवळ अंबड जि जालना येथे रंगेहाथ पकडण्यात आले . लोकसेवक श्री . जॉन पांडीयन पिल्ले वय 51 वर्ष व्यवसाय नोकरी पोलीस हवालदार इ . ने 1018 नेमणुक पोलीस ठाणे अंबड , रा रामनगर कॉलनी , जालना यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबात पुढील कार्यवाही चालु आहे . सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.अरविंद चावरीया , अपर पोलीस अधिक्षक डॉ . अनिता जमादार , ला . प्र . विभाग औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक श्री . रविंद्र डी . निकाळजे ,पोलीस निरीक्षक एस . एस . शेख , पोलीस निरीक्षक श्री.संग्राम ताटे तसेच कर्मचारी श्री . मनोहर खंडागळे,श्री .ज्ञानदेव जुंबड , श्री.अनिल सानप , श्री .ज्ञानेश्वर म्हस्के,श्री .गणेश चेके,श्री.सचिन राऊत , श्री .शिवाजी जमधडे,व चालक श्री.प्रविण खंदारे , श्री.आरेफ शेख यांनी पार पाडली .

*जिल्ह्यातील सर्व होमगार्ड अधिकारी व कर्मचारी सैनिकावर उपासमारीची वेळ व त्यांच्यावर मानसिक छळ*


*अंबड़ /पतिनिधि* : covid-19 बंदोबस जिल्ह्यातील सर्व होमगार्ड अधिकारी व कर्मचारी करीत आहेत तर काहींना covid-19 बंदोबस्त होमगार्ड यांना मिळालेल्या नाही वेळोवेळी संगणक प्रणालीद्वारे यादीनुसार मुसाद मनोहर शहा व अधिकारी व कर्मचारी यांचे नावे जिल्हा कार्यालयात संपर्क करूनही त्यांचे योग्य समाधान केले नाही जी यादीत येत होती ति आता मिळत नाही मधील भेट योग्य समाधान केलेले नाही जी यादी राखण्यात येत आहे. त्यांचे नाव यादीत डबल येत नाही पो.स्टे. ड्युटी ऑफिस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होमगार्ड सैनिकाला बंदोबस्त करून दिलेला होता परंतु दोन महिन्याच्या कालावधीत त्यांचे नाव किंवा बंदोबस्त मिळालेला नाही पन्नास वर्षाच्या वरील कर्मचारी यांना बंदोबस्त मिळालेला आहे परंतु सध्या चालू बंदोबस्त मध्ये त्यांच यादीतील कर्मचारी यांचे नावे येत असून बाकी कर्मचारी हे वंचित आलेले आहे. तरी जिल्हासमादेशक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी योग्य दिशा घेऊन बंदोबस्त द्यावा जेणेकरून इतर कर्मचारी ची अवहेलना होणार नाही बंदोबस्त न मिळाल्याने होमगार्ड सैनिकाचा एक प्रकारचा मानसिक छळ केला जात आहे प्रत्येकाला समान बंदोबस मिळावा हे हेतूने आपण महासमादेशक साहेबांनी याचं परिपत्रक जाक्र/मस/कार्या 03/2017/544 दिनांक 18 फेब्रुवारी 2017 नुसार सर्वांना समान बंदोबस्त मेळावा परंतु तसे त्या आदेशाचे अनुपालन होत नाही करिता आमच्या अर्जाचा गंर्भियाने विचार करावा. जिल्ह्यातील सर्व होमगार्ड अधिकारी व कर्मचारी सैनिकाला सामान न्याय सामान बंदोबस्त देण्यात यावा कारण त्यांच्या मागे कुटुंबाचे उर्दनिर्वहा चे प्रश्न पडला आहे तसेच जालना जिल्ह्यात 786 होमगार्ड व महिला असून काहींना कुठेही कधीच बंदोबस्त मिळालेला नाही कारण काही निवृत्त/मयत झालेले व काहींना नोकरी लागल्या आहेत त्यांचे नाव कमी झालेले नाही त्यामुळे इतरांना कुठलाही बंदोबस्त मिळत नाही यांच्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे यांना मा.श्री. महासमादेशक साहेब, मा.जिल्हाधिकारी साहेब, मा.राज्यपाल. साहेब (मुंबई),  मा. मुख्यमंत्री साहेब (मुंबई), मा. पालक मंत्री साहेब  (जालाना), मा.गृहमंत्री राज्यमंत्री महाराष्ट्र (मुंबई), मा. विभागीय आयुक्त साहेब (जालना) यांनी रोजगार प्रदान करून न्याय देण्यात यावे

      तलवाडा येथील मुस्लिम समुदायच्या वतीने                          सार्वजनिकरित्या 150 कीटचे वाटप

तलवाडा प्रतिनिधि :-ईम्रान सौदागर 

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील दर शनिवारी भरना-या आठवडी बाजाराच्या हिसाबाने लाॅक डाऊनला जवळपास नऊ आठवड्याचा कालावधी ऊलटला आसतांना गोर गरीब हातावर कुटुंबाचा ऊदारनिर्वाह आसना-या कुटूंबाकडे या तलवाडा गावातील मताचा जोगावा मागना-या सर्वच गाव पुढा-यांनी दुर्लक्ष केलेले आसतांना रमजान महिन्याच्या पावन पवित्र दानत्व रितीरिवाजा नुसार पुण्याईच्या कामात सर्वांचा हातभार लागावा या निर्मळ हेतुने मुस्लिम समुदायातील काही तरुणांनी समाजातुनच वर्गणी करुण तब्बल 150 कीटचे नुस्ते मुस्लिम समुदायातच नव्हे तर अठराह पगड जाती धर्माच्या गरजुंना वाटप करुन राष्ट्रीय एकत्मतेचा संदेश दिला असुन आज मितीला कोन्ही रक्ताचे नाते किंवा राजकिय मंडळी पुढे येऊन जिवा भावाच्या सोबत्यांना आर्थिक सहकार्य करन्या एैवजी फक्त व्हाटस्प व फेसबुकच्या माध्यमाातुन घरात रहा काळजी घ्या एवडेच पण घरात रहा आणी काय खाॅ याचा विचार या निर्लज्जम सदासुखींना का येत नाही आसा प्रश्न या निम्मीताने निर्माण होत असुन सर्व धर्म समुदायातील ज्या 150 गरजुंना या किटच्या रुपाने आठवडा भरच्या किराणा सामानचा दिलासा मिळाला त्यांनी मुस्लिम समुदायच्या पुढाकार घेणा-या तरुणांन प्रती आभार व्येक्त करुन त्यांना धन्यवाद दिले आहे.विषेश म्हणजे रमजान महिन्याच्या महिमेची तलवाडा येथील सर्व परिचित आसलेले ह.भ.प. गणेश महाराज कचरे यांना ब-या पैकी जान आसल्याने त्यांच्या कल्पनेतुन मुस्लिमांच्या या तरुणांनी हा ऊपक्रम राबवला शहेंशाहभाई सौदागर, मुबीन खतीब,शेख आप्सर, खमरखाॅ पठान, इद्रीस कुरैशी, शेख नाजेर, बाळु शिनगारे, सुनील तुरुकमारे, नजीरभाई कुरैशी व त्यांच्या सर्व सहकार्यामुळे हा समविचारी कार्यक्रम पार पडला.

 कोरोना-19 आणि रमज़ान ईद च्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्याती मुस्लिम धर्मगुरु मुफ़्ती गय्यास जहागिरदार आणि त्यांचे सहकारी यांच्या कडून उत्कृष्ट उपकरण



गेवराई/प्रतिनिधी:- कोरोना-19 आणि रमज़ान ईद च्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्याती मुस्लिम धर्मगुरु मुफ़्ती गय्यास जहागिरदार आणि त्यांचे सहकारी यांच्या कडून उत्कृष्ट उपकरण घेण्यात आले शहरातील गरीब ,विधवा महिला, अनाथ लोकांची ईद गोड़ व्हावी ह्या साठी 1000(हजार) कुटुंबना राशन आणि ईदच्या शिरखुर्रमा साहित्य वाटप मुस्लिम समुदाय मध्ये एक प्रथा आहे मुस्लिम समुदायातील धन-धांडगे लोक ज्याच्या कड़े खरी कमाई मधून सगळा खर्च होऊन काही पैसे शिल्लक आहे अश्या लोकांना दर वर्षी शिल्लक रक्कम वर जकात(एक प्रकारचा कर) 100 रुपये ला 2.5% काढून ते समाजातील ग़रीब लोकांना द्यावा लागतो. आणि आपन स्वस्थ आणि निरोगी राहो आपल्या वर काही संकट येऊ नये म्हणून सदखा(दान काही रक्कम) दिला जातो.योग्य गरजवंतांना ज़कात(एक प्रकारचा कर) आणि सदखा(दान काही रक्कम) जावी म्हणून गेवराई येथील मुस्लिम धर्मगुरु आणि त्यांचे सहकारी गेवराई तालुक्यात फिरन ज़कात(एक प्रकारचा कर) आणि सदखा(दान काही रक्कम) जमा करुण त्या जमा झालेल्या रक्कमें मधे किराणा आणि ईदच्या शिरखुरमा सहित्याची 1000(हजार) किट तयार केली आणि ते किट समाजातील गोर-गरीब ,विधवा महिला आणि अनाथ लोकांची ईद गोड़ व्हावी म्हणून किट वाटप करण्यात आली ह्या उपकर्णचा गेवराई तालुक्यात स्थुति होत आहे

ह्या किट मध्ये खालील वस्तु आहे.
गेहू,चावल, तेल,मिर्ची,नमक, हल्दी, खोपरा, खजूर,किशमिश, काजू,बदाम, ज़ीरा, शक्कर, मूंगदाल,मसूरदाल,चनादाल,डालडा, पत्ती
खालील लोकांनी परीश्रम केले
मुफ़्ती गय्यास जहागिरदार, हाफिज अनवर,नईम अत्तार,अब्दुल मुखतदिर,अतीक तंबोली, तुराब अत्तार,गुफरान सिद्दीक़,

मांगवडगाव खून प्रकरणातील पिडीत पवार कुटुंबियांची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली भेट.


प्रकरणात दोषारोपपत्र ५० दिवसांच्या आत दाखल करण्याच्या पोलिसांना केल्या सूचना


मृतांच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक मदत



घरकुल व अन्यत्र जमीनही उपलब्ध करून देणार - ना. मुंडे


बीड/अंबेजोगाई  :- बीड जिल्ह्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबियांची आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन केले.यावेळी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे यासाठी आपण प्रयत्न करणार असून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली जाईल असे श्री. मुंडे म्हणाले. तसेच सदर प्रकरणातील दोषारोपपत्र ५० दिवसांच्या आत दाखल करावे अशा सूचना ना. मुंडेंनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या.यावेळी ना. मुंडे यांच्यासह आमदार संजय दौड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, बहुजन मुक्ती मोर्चाचे बाबुराव पोटभरे, मानवी हक्क अभियानचे मिलिंद आव्हाड, अजय मुंडे , शिवाजी शिरसाट, दत्ताआबा पाटील यांसह अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांसह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.'धनु भाऊ आता तुम्हीच आमचे माय बाप' म्हणत पीडितांनी फोडला टाहो...धनंजय मुंडे पवार कुटुंबाच्या पालावर जाताच पवार कुटुंबियांनी 'धनु भाऊ, आता तुम्हीच आमचे माय बाप आहात, आम्हाला न्याय द्या...' असे म्हणत टाहो फोडला. यावेळी ना. मुंडे यांनी या प्रकरणातील दोषींना शिक्षा मिळून 100 % न्याय मिळेल अशी खात्री दिली. अंबेजोगाई येथे पालावर राहणाऱ्या पवार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ना. मुंडे यांनी किमान तीन महिने पुरेल इतके अन्न धान्य पवार कुटुंबियांना देण्याबाबत स्थानिक तहसीलदारांना आदेशित केले आहे. तसेच विभागामार्फत घरकुल योजनेतून घरासाठी निधी व जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे ना. मुंडे म्हणाले.दरम्यान सामाजिक न्याय विभागामार्फत हत्या झालेल्या तीनही व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख १२ हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात आली आहे. तसेच योजनेनुसार उर्वरित ४ लाख १२ हजार रुपये रक्कम दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देण्यात येईल असे ना. मुंडे म्हणाले.पवार कुटुंबीयांनी ना. मुंडे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या, यावेळी हे प्रकरण जमिनीच्या वादातून झाले असल्याचा संशय असल्याने पवार कुटुंबाने आपल्याला आणखी धोका होऊ नये म्हणून इतरत्र जमीन मिळवून देण्याबाबत ना. मुंडे यांना विनंती केली. श्री. मुंडे यांनी पवार कुटुंबियांना इतरत्र जमीन मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...