शनिवार, १६ मे, २०२०

*अंबड़ शहरात प्रिन्स लॉज जवळ  पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार जाँन पिल्ले 7 हजाराची घेतली लाच*

प्रतिबंधक विभाग जालना यांनी रंगेहाथ पकडल्याने अंबड शहरात खळबळ


*अंबड/प्रतिनिधी* :  अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जाँन पिल्ले यांना आज दि 13 मे रोजी प्रिन्स लाँजजवळ अंबड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांनी रंगेहाथ पकल्याने खळबळ माजली आहेयाबाबत हकिगत अशी की , यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की , त्यांचेवर व त्यांचे भाऊ ,पत्नी आणि मुलगी यांचेवर पोलीस ठाणे अंबड जि जालना येथे दाखल असलेल्या गुरन 173 / 2020 कलम 324 , 323 . 504 , 506 , 34 भादंविचे गुन्हयात अटक न करता मा कोर्टात हजर करुन तपासात मदत करण्यासाठी आलोसे श्री जॉन पिले पोहेकॉ / 1018 यांनी तक्रारदाराकडे 40 , 000 / – रूपये लाचेची मागणी केली . सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली . सदर तक्रारीची दिनांक 11 . 05 . 2020 रोजी पडताळणी केली असता तहजोडीअंती तक्रारदार यांचेकडे लोकसेवक श्री . जॉन पिल्ले पोहेकॉ / 1018 यानी 20 , 000 / – रुपयेची लाचेची मागणी करून लोकसेवक श्री . जॉन पिल्ले पोहेकॉ / 1018 यांनी दि . 13 . 05 . 2020 रोजी 20 , 000 / – रुपये रक्कमेपैकी पहीला हप्ता म्हणुन 7 , 000 / – रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष लाच स्वीकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पथकाने प्रिन्स लॉज जवळ अंबड जि जालना येथे रंगेहाथ पकडण्यात आले . लोकसेवक श्री . जॉन पांडीयन पिल्ले वय 51 वर्ष व्यवसाय नोकरी पोलीस हवालदार इ . ने 1018 नेमणुक पोलीस ठाणे अंबड , रा रामनगर कॉलनी , जालना यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबात पुढील कार्यवाही चालु आहे . सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.अरविंद चावरीया , अपर पोलीस अधिक्षक डॉ . अनिता जमादार , ला . प्र . विभाग औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक श्री . रविंद्र डी . निकाळजे ,पोलीस निरीक्षक एस . एस . शेख , पोलीस निरीक्षक श्री.संग्राम ताटे तसेच कर्मचारी श्री . मनोहर खंडागळे,श्री .ज्ञानदेव जुंबड , श्री.अनिल सानप , श्री .ज्ञानेश्वर म्हस्के,श्री .गणेश चेके,श्री.सचिन राऊत , श्री .शिवाजी जमधडे,व चालक श्री.प्रविण खंदारे , श्री.आरेफ शेख यांनी पार पाडली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...