मंगळवार, १९ मे, २०२०

पीककर्जासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी


                   जिल्हा प्रशासनाचे आवाहन.


   जालना,प्रतिनिधी : - खरीप हंगाम 2020- 21 करीता जिल्ह्यामध्ये बँकांतर्फे पिक कर्ज वाटप सुरु आहे. जागतिक महामारी कोवीड – 19 विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाकडुन देशपातळीवर संचारबंदी घोषीत करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोविड -19 या आजाराचा  प्रसार होऊ नये, यासाठी होणा-या गर्दीचे नियमन करण्यासाठी जालना जिल्ह्यातील पिक कर्जासाठी इच्छुक शेतक-यांनी                                            https://forms.gle/2T19Tth3uQFe5CgS9 या संकेतस्थळावरील, गुगल लिंकवरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी  दि. 20 मे 2020 ते 31 मे 2020 या दरम्यान करावी. सदरची लिंक Jalna.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध असुन या लिंकद्वारे नोंदणी केलेल्या शेतक-यांची यादी जिल्हा अग्रणी बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र  असणा-या शेतक-यांना लघुसंदेश (SMS) पाठविण्यात येणार आहे. बँकेमार्फत लघुसंदेश (SMS) प्राप्त झालेल्या शेतक-यांनी बँकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधारकार्ड 7/12,  8 – अ, फेरफार नक्कल, पॅनकार्ड, टोचनकाशा, पासपोर्ट साईज -2 फोटो, पासबुक या कागदपत्रासह बँकेत उपस्थित राहावे. अंतिम पीक कर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल. तसेच सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व जिल्हा समन्वयकांनी  व शाखाधिकारी यांनी नोंदणी केलेल्या शेतक-यांची यादी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांचेकडून प्राप्त करुन घ्यावी. त्याअनुषंगाने  पीक कर्ज घेण्यास  इच्छुक शेतक-यांनी वरील दिलेल्या संकेतस्थळावर, गुगल लिंकवरील फॉर्म भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नुतनवाडी ता.जालना येथील 11 वर्षीय मुलाच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

              जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती



जालना,प्रतिनिधी :- मुंबईवरुन परतलेले नुतनवाडी ता. जालना येथील रहिवासी असलेले 11 वर्षीय मुलगा व त्याची 16 वर्षीय बहीण नुतनवाडी ता. जालना येथे दि. 16 मे 2020 रोजी आले होते. या दोघांपैकी 11 वर्षीय मुलाला दि. 17 मे 2020 रोजी ताप येत असल्यामुळे त्याला व खबरदारीची बाब म्हणुन त्याच्या बहिणीलाही जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या दोघांपैकी 11 वर्षीय मुलाच्या स्वॅबचा अहवाल दि. 18 मे 2020 रोजी प्रयोगशाळेकडुन पॉझिटीव्ह प्राप्त झाला तर त्या मुलाच्या 16 वर्षीय बहीणीचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला असुन या मुलाच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क सहवाशीतातील एकुण 10 व्यक्तींच्या स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

            जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. जालना यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी, जालना व वैद्यकीय अधिकारी पिरपिंपळगाव यांनी दोन टिमच्या साह्याने नुतनवाडी येथील एकुण 57 कुटुंबातील 278 लोकांचे आरोग्य सर्वेक्षणाचे काम सुरु केले आहे.

            जिल्ह्यात एकुण 1837 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 40 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 897 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 65 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 1527 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -01 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 36 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1421, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 259, एकुण प्रलंबित नमुने -66 तर एकुण 857 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.

14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या -17, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 765 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-46, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -557, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -40, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -31, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 1176 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. 

            आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 179 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 6622 असे एकुण–6801 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश–2727, मध्यप्रदेश -777, बिहार 160, तेलंगणा- 27, राजस्थान-167, झारखंड – 30, आंध्रप्रदेश -103, ओरिसा – 113, छत्तीसगड- 10, हैद्राबाद-05 असे एकुण – 4119 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.

             कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 557 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-17,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-6, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-22,पोलीस प्रशिक्षण केंद्र-115 मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-04, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-46, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -103, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -32, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-12, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे – 41, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-35, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-60,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टे क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-30 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.

            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 595 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 108 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 587 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 90 हजार 100 असा एकुण         316908 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

कोरोनामुळे उस्मानपूरच्या शेतकऱ्यांनी उपटली ''फुलांची बाग


परतुर,प्रतिनिधी :- दुष्काळाने संकटात असलेला परतूर तालुक्यातील शेतकरी आता कोरोनाच्या या संकटामुळे पुरता उध्वस्त होत असताना पाहायला मिळत आहे .लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे परतूर तालुक्यातील उस्मानपूर या  गावचे  सतिश दत्ता राऊत या शेतकऱ्याने आपल्या शेतातील एक एकरची गुलाब,झेंडू दीड एकर फुलांची बाग उपटून टाकली आहे.दीड ते दोन लाख रुपये खर्च करून सतिश राऊत  यांनी आपल्या दीड एकर शेतात झेंडूची बाग लावली होती.तर एक एकर क्षेत्रात गुलाबाची बाग लावली होती सध्या या गुलाब व झेंडूला फुले आली आहेत. दोन ते तीन दिवसांत ही फुले तोडून बाजारात विकली नाहीत तर ती खराब होणार होती. मात्र, बाजार पेठच उपलब्ध नसल्याने त्यांनी आपली जवळपास एक हेक्टरची बाग उपटून टाकली आहे. या बागेतून त्यांना तीन ते चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित होत

लग्नसराई मध्ये या वर्षी फुलांची मागणी पाहता फुले शेतात लावली होती मात्र कोरोना या विषाणूजन्य व्हायरसमुळे मेहनत घेऊन पिकविलेला फुलांचा बाग नष्ट करावा लागला यामुळे लावले खर्चही निघाला नाही म्हणून तेल गेले तूपही गेले........अशी वेळ माझ्यावर आली असल्याची प्रतिक्रिया शेतकरी यांनी दिली पुढे त्यांनी सांगितले की शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकरी सतिश राऊत यांनी केली

*विलगीकरण कक्षातील सहा व्यक्तींना पुष्प वर्षाव तर टाळ्यांच्या गडगडात सुट्टी*


एका कुटुंबातील सहा जणांना अहवाल निगेटिव्ह

अंबड/अरविंद शिरगोळे* : घनसावंगी रोड वरील समाज कल्याण विभागाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वस्तीग्रह विलगीकरण साक्षात व्काँरंटाईन सहा व्यक्तींना सोमवारी दिनांक 18 मे रोजी दुपारी सुट्टी देण्यात आली याबाबत शासकीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की अंबड येथील घनसावंगी रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींचे वसतिगृहात दोन विलगीकरण कक्ष असून बाहेरगावाहून अंबड तालुक्यात आलेल्या लोकांना तोरण टाईम करून तपासणी केली जाते आतापर्यंत अंबड येथील विलगीकरण कक्ष क्र.1 मध्ये 26 तर क्र.2 मध्ये 12 असे मिळून एकूण 38 व्यक्ती दाखल करण्यात आले होते त्यापैकी मुंबई येथून आलेल्या आणि विलगीकरण कक्ष क्रमांक एक मध्ये दाखल केले गेलेल्या एका कुटुंबातील सहा जणांना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना विलगीकरण कक्षातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पौर्णिमा घुगे, डॉ.पांढरे, समाज कल्याण जालना विभागाचे अनिल सूनगत, डॉ.अमोल जाधव, डॉ.किर्तीचा तरटे, छाया काकड, स्वाती देवगुणे, सुनिता राठोड, आदीसह नर्स सुरक्षा कर्मचारी त्यांच्या वर पुष्प वर्षाव करून व टाळ्यांच्या गडगडात करून सुट्टी देऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.



परदेशी शिष्यवृत्तीचा शासन निर्णयास स्थगिती नको, कायमची अट रद्द करा- राजेंद्र पातोडे



मुंबई,ब्युरो चीफ : - महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख निश्चित करण्यात आली होती. तथापि खुल्या प्रवर्गासाठी ही उत्पन्न मर्यादा २० लाख असल्याने हा निर्णय परदेशात उच्च शिक्षणासाठी जावू पाहणाऱ्या अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांबाबतीत केलेला उघड जातीयवाद आहे, अशी टिका वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी करून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर आंदोलन करीत शासनाचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता. परिणामी शासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र हा निर्णय रद्द करण्यात यावा, प्रशासनाने शब्दच्छल न करता सामाजिक न्याय विभागाने ही अट सरळ रद्द करावी, अशी मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.



*अंबड शहरात वंजार गल्ली सील, कानडगाव दोन ते अंबड एक असे तीन संशयित रुग्ण*



पोलीस निरीक्षक अनिरुद्ध  नांदेडकर यांनी अतिदक्षता घेत आपल्या फौजफाट्यासह आरोग्य विभाग तसेच नगरपरिषद प्रशासन यांना पाचारण करून अंबड शहरातील वंजार गल्ली पूर्णपणे सील

अंबड/प्रतिनिधि* संपूर्ण देशात तसेच अनेक राज्यात कोरोनाने थैमान घातला असता असतांनासुद्धा अंबड तालुका हा कोरोना पासून मुक्त होता. मात्र आता अंबड शहरात धोरणाने शिरकाव केला असून वंजर गल्लीमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी त्यांच्या फौजफाट्यासह जाऊन सोमवारी वंजार गल्ली पूर्णपणे सील केली आहे. काही दिवसापूर्वी मुंबई येथून तीन जण आहे कानडगाव येथे आले होते. त्या पैकी दोन जणांना व्काँरंटाईन करण्यात आले होते.  त्यांच्या लाळेचे नमुने जिल्हा रुग्णालयातर्फे दिनांक 8 में रोजी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. सदर रुग्णाचे आहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली होती त्यामुळे पोलिसांनी कानडगाव व डोमेगाव पूर्णपणे सील केल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण होऊन चिंतेत वाढ झाली होती. अंबड तालुक्यातील कानडगाव येथील दोन तर आता नव्याने अंबड शहरातील वंजार गल्ली येथील एक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने अंबड तालुका शहरासह कोरोना रुग्णांचा आकडा आता तीन वर पोहोचल्याने पोलीस निरीक्षक अनिरुद्ध  नांदेडकर यांनी अतिदक्षता घेत आपल्या  फौजफाट्यासह आरोग्य विभाग तसेच नगरपरिषद प्रशासन यांना पाचारण करून अंबड शहरातील वंजार गल्ली पूर्णपणे सील करण्यात आली आहे. सध्या नंबर शहरामध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले दिसून येत आहे.

                  कोरोना जनजागृतीचा संदेश

सरकारच्या आदेशाचे पालन करा. सावता परिषदेचे युवक तालुकाअध्यक्ष राम गिराम


सिंधीकाळेगाव,प्रतिनिधी (श्याम गिराम) :- कोरोनामुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे.कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य कर्मचारी,मेडिकल,पोलीस,सफाई कामगार,महावितरण,नगर परिषद कर्मचारी,महसूल कर्मचारी हे सर्वच जण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहेत.सध्या शाळेच्या मुलांना सुट्ट्या असल्याने मुले घरी बसून त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देत आहेत.जगभरात थैमान घातलेल्या कोरोणा विषानुने लाँकडाऊन करण्यात आले आहे.सध्या कोरोनाच्या अनुषंगाने शहरातील अनेक दुकाने, हॉटेल्स यासह आदी दुकाने बंद आहेत. आवश्यक कामासाठी सर्वसामान्य नागरिक, परप्रांतीय मजुर बाहेर पडत. सर्वांनी घरीच रहा शासकीय आदेशाचे पालन करा व सरकारला सहकार्य करा, कामाशिवाय कोनीही बाहेर पडु नये सर्वांनी मास्कचा वापर करा. घरीच रहा आरोग्याची काळजी घ्या सुरक्षीत अंतर पाळा गरजुंना मदत करा कोरोना राक्षसाचा सामना करा, आरोग्याला जपा विनाकारण फिरू नका. सध्या कोरोणा विषाणु साठी शासन प्रशासन कसोटीचे करत असुन या विषाणुचा फैलाव होऊ नये यासाठी संपुर्ण महाराष्ट्रालात लाँकडाऊन करण्यात आलेले असुन ग्रामिण भागात देखील सर्व बंद आहे.देशांवर कोरोना ह्या विषुने थैमान घातले आहे आपला महाराष्ट्र ही कोरोना ह्या संकटांशी लढत आहे शासनाने घालून देल्याला नियमांचे पालन करा घरी राहून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा मीच माझा रक्षक माझे आरोग्य माझी जबाबदारी, काळजी घ्या घरीच थांबा असे सावता परिषदेचे  युवक तालुका अध्यक्ष राम भाऊ गिराम यांनी सांगितले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...