रांजणी येथे हातभट्टीच्या अड्डयावर गुन्हे शाखेचा छापा, महिलेसह दोघाविरोधात गुन्हा दाखल.
रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
रांजणी येथे हातभट्टीच्या अड्डयावर गुन्हे शाखेचा छापा, महिलेसह दोघाविरोधात गुन्हा दाखल.
रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
निलेश राणे विरोधात प्रकाश आंबेडकरांचे खडे बोल,निलेश राणेनी माफी मागावी - प्रकाश आंबेडकर
पुणे,ब्युरोचीफ :- गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही.माणूस म्हणून कोणालाही हिनवण्याचा अधिकार नाहीये. तृतीयपंथी देखील माणूस आहेत, त्यांना स्वीकारले पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावे. ऐरवी निलेश राणेची दखल घेण्याची गरज नाही.अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निलेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. निलेश राणेने जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त समाजाची माफी मागावी. निलेश राणेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध प्रकाश आंबेडकर यांनी केला असून वंचित बहुजन आघाडी तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे असल्याचे ही त्यांनी सांगितले. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हिजडा शब्दाचा अवमानकारक पद्धतीने उल्लेख करून तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखविल्या आहेत. त्याविरोधात 499, 501 अन्वये अब्रूनुकसान आणि मानहानीचा गुन्हा फैजपुर (जळगांव) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून निलेश राणे व त्यांच्या विरोधी असलेले प्राजक्त तनपुरे यांच्यात सोशल मीडियावर राजकीय वाद चालू आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून तृतीयपंथी समुदायाचा उपहासात्मक पद्धतीने वापर करत समुदायाच्या भावना दुखावल्या होत्या.कोणीतरी ‘हिजडा' राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा, ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले समोर आले की पिवळी होते साल्यांची, जागा सांग तनपुरे येतो मी. अशा पद्धतीने भाषा वापरत, तृतीयपंथी समुदाय जो की, स्वतःची सांस्कृतिक व सामाजिक ओळख ठेवून आहे व त्याच्या संघर्षा विषयी कुठलीही जाणीव नसलेले व लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेले, निलेश राणे यांनी संवेदनशीलता न दाखवता बेताल वक्तव्य केले. हे अशोभनीय व तृतीयपंथी समुदायाच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारे असल्याचे तक्रारदार शमीभा पाटील यांनी म्हटले आहे. 2014 च्या दीर्घ अहवालाअंती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र व राज्य सरकारी यांनी तृतीयपंथी अर्थात सांस्कृतिक ओळख हिजडा असलेल्या व्यक्ती वा समुदायाला कायदेशीर अधिकृत अशी लिंग म्हणून तृतीयपंथी मान्यता दिलेली आहे. कुठल्याही लिंग, जातीधर्माचा उपरोधिक वा अवमानकारक पद्धतीने त्याच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारा व सामाजिक क्षती पोहोचविणे हा अपराधच आहे. भारतीय दंड विधान 499, 501 नुसार वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या शमिभा पाटील यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी ही माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
रमाई आवास योजनेअंतर्गत घराचे बांधकाम होऊन दोन महिने झाले, बजेट नसल्याने लाभार्थ्य ना आर्थीक अडचण निर्माण होत आहेत.
प्रतिनिधी सिंधीकाळेगाव :- जालना तालुक्यातील सावंगी तलान ग्रामपंचायत अंतर्गत येथील रमाई आवास योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यचे घराचे बांधकाम होऊन एक ते दोन महिने झाले आहेत .व काही लाभार्थ्यचे बांधकाम चालु आहेत . या योजनेला बजेट नसल्याने त्यांना पुढील हाप्ता मिळण्यास विलंब लागत आहेत . तसेच लाभार्थी -श्री . सोपान राजाराम मांदळे, कैलास लक्ष्मण रंधवे, संजय भास्कर रंधवे, निवृ ती नारायण रंधवे, सोनाजी त्रिंबक मोरे यांनी बोलताना सांगितले की , आम्हाला पहिला हप्ता १५,०००(पंजरा हजार सपये ) अॅडव्हाँन्स मिळाला आहे . त्यामधुन घराचे बेसमेंट लेवल बांधकाम केले आहे.तसेच दुसरा हाप्ता ४५,०००( पंचेच्याळीस हजार रुपये )काही लाभार्थ्यना मिळाले आहे,काहींना मिळाले नाही तसेच काही लाभार्थ्यचे घराचे बांधकाम पुर्ण झाले असुन त्यांना तिसरा व अंतिम हाप्ता रुपय ४०,०००(च्याळीस हजार रूपये) देण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच लाभार्थीनी सांगितले की, रेती,सिमेंट,विटा, मिस्तरी यांची ऊसणवारी,उधारी करून बांधकाम पुर्ण केले असुन ते कुठून द्यावे. व आता काही दिवसापासून शेतीची काम चालु होणार असुन बीयाणे कुठून आणावी हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. तसेच वरील लाभार्थ्यनी वारंवार पंचायत समिती- गटविकास अधिकारी व इंजिनीअर यांना वारं-वार विचारणा केली.पण, त्यांनी सांगितले की शासनाकडून निधी आल्यानंतर वितरीत करणयात येईल. तसेच दुसरी कडे-शबरी योजनेला व पंतप्रधान आवास योजनेला निधी असुन या योजनेला का नाही हा प्रश्न लाभार्थ्यना भेडसावत आहे. तसेच वरिलाप्रमाणे आपली ही समस्या रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी बोलतांना सांगितले.
कोरोनाविरुध्द लढाईत माजी सैनिकही सरसावले.
पुणे,ब्युरोचीफ :- देशाच्या सीमेवर लढताना आपला नेमका शत्रू कोण हे सैनिकांना माहीत असते. परंतु देशात एका अदृश्य शत्रुने आक्रमण केले आहे, त्यांचे नाव कोरोना.. गेल्या दोन महिन्यापासून डॉक्टर्स, पोलीस, महसूल विभाग, सफाई कामगार या कोरोनाविरध्दच्या लढाईत अहोरात्र झटत असताना देशाच्या रक्षणासाठी ज्या सैनिकांनी लढा दिला, ते माजी सैनिकही अदृश्य शत्रुरुपी कोरोनाविरुध्दच्या लढाईत पुढे सरसावले आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जेव्हा माजी सैनिकांना आवाहन केले तेव्हा माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने हाकेला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, भोर, वेल्हा, जुन्नर, येथे माजी सैनिक चेक पोस्टवर संरक्षणासाठी जबाबदारी बजावत असताना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची दुहेरी भूमिका बजावत आहेत. पोलिसांची संख्या व त्यांच्यावरील कामाचा ताण पाहता आपण का बर घरी बसून राहावे, आपणही देशासाठी पुढे आलो पाहिजे, अशी स्वाभाविक प्रतिक्रिया माजी सैनिकांनी व्यक्त केली.
पोलिसांच्या खाद्यांला खादा लावून आरोग्यसेवक, स्वयंसेवक, सेवाभावी संस्था आदी कार्यरत आहेत. कोरोना विरुध्दची लढाई आपण नक्की जिंकू असा आशावादी संकल्प करत, प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी पुणे जिल्हातील माजी सैनिकांनी पुन्हा अंगावर वर्दी चढवली आहे. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे. पोलिसांना एक प्रकारचे मानसिक समाधान मिळत आहे. कोरोनाविरुध्दच्या जीवघेण्या लढाईत पोलिसांवरील कामाचा ताण कमी होऊन ते तणावमुक्त सेवा देत आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार यांनी व्यक्त केली.
कोरोनाविरुध्द लढाईत माजी सैनिकही सरसावले
देशाच्या सीमेवर लढताना आपला नेमका शत्रू कोण हे सैनिकांना माहीत असते. परंतु देशात एका अदृश्य शत्रुने आक्रमण केले आहे, त्यांचे नाव कोरोना.. गेल्या दोन महिन्यापासून डॉक्टर्स, पोलीस, महसूल विभाग, सफाई कामगार या कोरोनाविरध्दच्या लढाईत अहोरात्र झटत असताना देशाच्या रक्षणासाठी ज्या सैनिकांनी लढा दिला, ते माजी सैनिकही अदृश्य शत्रुरुपी कोरोनाविरुध्दच्या लढाईत पुढे सरसावले आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जेव्हा माजी सैनिकांना आवाहन केले तेव्हा माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने हाकेला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, भोर, वेल्हा, जुन्नर, येथे माजी सैनिक चेक पोस्टवर संरक्षणासाठी जबाबदारी बजावत असताना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची दुहेरी भूमिका बजावत आहेत. पोलिसांची संख्या व त्यांच्यावरील कामाचा ताण पाहता आपण का बर घरी बसून राहावे, आपणही देशासाठी पुढे आलो पाहिजे, अशी स्वाभाविक प्रतिक्रिया माजी सैनिकांनी व्यक्त केली.
पोलिसांच्या खाद्यांला खादा लावून आरोग्यसेवक, स्वयंसेवक, सेवाभावी संस्था आदी कार्यरत आहेत. कोरोना विरुध्दची लढाई आपण नक्की जिंकू असा आशावादी संकल्प करत, प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी पुणे जिल्हातील माजी सैनिकांनी पुन्हा अंगावर वर्दी चढवली आहे. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे. पोलिसांना एक प्रकारचे मानसिक समाधान मिळत आहे. कोरोनाविरुध्दच्या जीवघेण्या लढाईत पोलिसांवरील कामाचा ताण कमी होऊन ते तणावमुक्त सेवा देत आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार यांनी व्यक्त केली.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने फक्त चार दिवसात 35 हजार रूपये आणि 600 किलो अन्नधान्यांचे संकलन केले. बारामती पोलीस दलास माजी सैनिक सहकार्य करीत आहेत. त्यांना विशेष पोलीस अधिकारी कोवीड-19 योध्दा या नावाने विशेष ओळखपत्र देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णाला रक्ताचा तुटवडा कमी पडू नये, याकरिता रक्तदानही केले आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी या गावात एकूण 30 हजार रूपये जमा करून गावातील नागरिकांना आवश्यक ती मदत पोहचवली आहे, अशी माहिती आजी माजी सैनिक संघटनाचे कार्याध्यक्ष अनिल शिंदे यांनी दिली.
बारामती शहरामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली जय जवान आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने ‘पोलीस व माजी सैनिक साथ साथ’ कोरोनाविरोधी मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये पोलिसांच्या सोबत ‘चित्ता’ ड्रेस परिधान केलेले माजी सैनिक रस्त्यावर उतरले असून ते नागरिकांना शिस्तीचे धडे देत आहे. त्यांना सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पोलिसांसोबत नेमून दिलेले काम एकदिलाने करीत आहेत. नागरिकांनी मास्क वापरावे, शारीरिक अंतर ठेवावे, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये, ज्येष्ठ नागरिकांची कोरोना विषाणूपासून कशी काळजी घ्यावयाची, अशी प्राथमिक स्वरुपात माहिती देत आहेत. शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त करण्याबरोबर चेकपोस्टवर कर्तव्य बजावत आहेत. पोलीस प्रशासन व माजीसैनिक यांच्या समन्वयाने बारामती तालुका कोरोनामुक्त करण्यास हातभार लागत आहे.
जुन्नर येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने कोराना विषाणूच्या विरुध्द लढा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या पीएम केअर्स निधीत व मुख्यमंत्री सहायता निधीत अनुक्रमे 65 हजार रुपयांचे योगदान दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना देशातील वेगवेगळ्यास्तरावर कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांनी आपल्या भावनेनुसार, आवडीनुसार, वेळेनुसार, https://covidwarriors.gov.in/ या डिजिटल व्यासपीठावर स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील एकूण 9 हजार 814 माजी सैनिकांनी या डिजिटल व्यासपीठावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी झाले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील 1 हजार 587 माजी सैनिक आहेत राज्यातील इतर जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक माजी सैनिक पुणे जिल्ह्यातील आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 एप्रिल 2020 रोजी कोरोना युद्धात सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करू इच्छिणाऱ्या आणि आरोग्य सेवेत काम केलेल्या लोकांनी जसे की आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉडबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतु ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही, पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्या सर्वांनी पुढे येऊन आपले नाव, पत्ता covidyoddha@gmail.com या ई मेल वर नोंदवावे, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक कोरोनाविरुध्दच्या युध्दात सहभागी झाले आहेत.
इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून या गावातील मुख्यरस्त्यावर उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर माजी सैनिक सेवा बजावत आहेत. पळसदेव ग्रामपंचायत आणि माजी सैनिक यांच्या समन्वयाने मुख्य रस्त्यावर चौकशी कक्ष सुरु करण्यात आले आहे.
देशावर आलेले कोरोना विषाणूचे संकट हे आपल्याला परतून लावायचे आहे. लष्करातील जवानांनी एकदा अंगावर वर्दी चढवली की त्यांच्या अंगातली लष्करी वृत्ती, लढाऊ बाणा अखंड सळसळतो भले ते सेवानिवृत्त झाले तरीही ! याची अनुभूती पुणे जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पुन्हा एका प्रयत्यास आली आहे. देशाच्या संरक्षणासाठी ज्या निस्वार्थ वृत्तीने माजी सैनिक लढले त्याचप्रमाणे कोरोना विरुध्दच्या लढाईत तन-मन-धनाने माजी सैनिक उतरले असून खऱ्या अर्थाने आपण या कोरोना योद्धांचा सन्मानच केला पाहिजे, अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे
राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर. महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...