गुरुवार, २१ मे, २०२०

रमजान ईदपर्यंत खरेदीसाठी मार्केट उघडण्याची परवानगी देऊ नका



परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी

देशात तसेच राज्यात कोरोना, कोव्हीड -१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यात महाराष्ट्र राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्या अनुषंगाने रमजान ईदसाठी आपण परतुर शहरात खरेदीसाठी परवानगी देऊ नका अशी मागणी जमियते उलमा ए हिंद शाखा वरफळच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पुढे निवेदनात म्हटले आहे की परवानगी दिल्यास त्याचे परिणाम म्हणजे बाजारात गर्दी होईल, सोशल डिस्टन्स त्या ठिकाणी ठेवता येणार नाही. अर्थातच कोरोना व्हायरसला शिरकाव करण्यास मुभा मिळेल आणि परिणाम गंभीर होऊ शकतात. म्हणून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनासह, इतर प्रशासणासोबत समाजातील विविध घटकातील सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यात मुस्लिम समाजही सर्वतोपरी सहकार्य करीत आहे . अशा परिस्थितीत आपण मार्केट उघडण्याची परवानगी दिल्यास रूग्णांची संख्या वाढण्यासाठी ते कारण होईल व एखादा प्रसंग भोवला जाईल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. अशा विदारक परिस्थितीमध्ये आनंद साजरा करता येणार नाही. याची जाणिव आम्हास आहे. तसेच महाराष्ट्राची स्थिती सुध्दा गंभीर आहे. त्यामुळे या गंभीर बाबींचा गंभीरता पुर्वक विचार करून रमजान ईद निमित्त कोणत्याही परिस्थितीत मार्केट उघडण्याची परवानगी देण्यात येऊ नये असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शाखा अध्यक्ष हाफेज मुखीद, हाफेज अफजल, हाफेज मूहिद यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...