शुक्रवार, २९ मे, २०२०



                     अंबड पंचायत समिती कार्यालयातील कृषी विस्तार अधिकारी राजेंद्र देशमुख 
                                          यांना पाच हजाराची लाच घेताना गजाआड.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या विहिरीच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी तक्रार कडून 5 हजार रुपयांची लाच



अंबड़/अरविंद शिरगोळे :- अंबड पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी राजेंद्र देशमुख (वय 57 वर्षे) यांना आज गुरुवारी ता.28 डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या विहिरीच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी तक्रार कडून 5 हजार रुपयांची लाच घेताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने देशमुख यांच्या अंबड शहरातील चांगले नगर येथील राहत्या घरी त्यांना रंगेहाथ पकडल्याने अंबड शहरात धडधडी उडाली आहे. या कारवाईमुळे पंचायत समितीचे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ चालू आहे. लॉक डाऊन मध्ये सर्व काही थांबलेले असताना लाचखोर अधिकाऱ्यांची दुकानदारी सुरूच असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यातील अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथील तक्रारदार यांनी तक्रार दिली की त्यांच्या वडिलांचे नाव असलेल्या शेतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेमध्ये विहीर खोदण्यासाठी दोन लाख 50 हजार रुपये मंजूर झाले. असून दोन लाखाचे बिल काढण्यासाठी अंबड पंचायत समितीचे कृषी विभागाचे विस्तार अधिकारी राजेंद्र विठ्ठलराव देशमुख यांनी यापूर्वी 10 हजार रुपये घेतले व उर्वरित राहिलेले 50हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी आलोसेश्री देशमुख यांनी पुन्हा तक्रारदार यांच्याकडून 1 हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली सदर तक्रारीवरून आज गुरुवारी (ता.28) रोजी पडताळणी केली असता राजेंद्र देशमुख देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे  पाच हजार रुपयाची लाचेची मागणी निष्पन्न झाली. शहरातील चांगले नगर येथे राहत्या घरी देशमुख यांनी तक्रारी कडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद वारिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.एस.शेख व कर्मचारी मनोहर खंडागळे, गणेश चेके, शिवाजी जमदाडे, ज्ञानदेव झुंबड, अनिल सानप, सचिन राऊत, ज्ञानेश्वर म्हस्के, चालक प्रवीण खंदारे, आरेफ़ शेख, यांच्या पथकाने ही कामगिरी पार पडली आहे अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती


                                        बुलडाणा जिल्ह्यातील तीन रुग्णांची कोरोनावर मात..!





बुलडाणा,ब्युरोचीफ दि २९:- सामान्य रुग्णालय खामगाव येथे दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये आलमपुर ता नांदुरा , जळका भडंग ता खामगाव व गोपाळ नगर खामगाव येथील रुग्णांचा समावेश आहे.  त्यापैकी आज सायंकाळी तीन रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये आलमपुर ता नांदुरा येथील २० वर्षीय युवक, जळका भडंग  येथील २५ वर्षीय पुरुष व गोपाळ नगर, खामगाव येथील ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. कोरोनावर मात देत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात 32 झाली आहे. मागील दहा दिवसांपासून कुठलेही लक्षण नसल्यामुळे शासनाच्या नवीन निकषानुसार या रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. टापरे उपस्थित होते.  रुग्णालयातून बाहेर पडताच रुग्णांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.  कोरोना वर मात केल्यामुळे आनंदित भावमुद्रेत रुग्ण घरी परतले. शासनाने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना घरपोच सोडले.




‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

*💥यावर्षी ‘वारी’ हेलिकॉप्टर, विमानातून; पायी पालखी सोहळा रद्द!*
-------------
पुणे: कोरोना संकटामुळे यंदाचा पायी पालखी वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. दिंड्यांना ही परवानगी नाकारली आहे. वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झालं असून आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने पंढरपूरला देवभेटीस जाणार आहेत.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात होते. दरम्यान त्यांच्या उपस्थितीमध्ये वारीबाबत बैठक झाली. या बैठकीत पायी वारी सोहळ्याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या.  त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत दशमीला निर्णय स्पष्ट होईल.
पतीनेच केला डोक्यात दगड घालून पत्नीचा खुन ; गेवराई शहरातील घटनेने उडाली खळबळ
"""""""""""""""""""""""""""""""""""
इम्रान सौदागर | गेवराई - शहरातील जायकवाडी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असुन परिसरात खळबळ उडाली आहे.

 गंधराबाई बप्पासाहेब घुले (वय अंदाजे 65 वर्ष) या आपल्या पत्नीला  त्याने आधी काठीने मारहाण करत डोक्यात दगड घालून हत्या करण्यात केली. सदरील ईसम हा मनोरूग्ण असल्याचे समजते घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक चोबे सह अनेक कर्मचारी दाखल झाले असून आरोपी बप्पासाहेब  याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
*सरकारने परिस्थितीचे भान ठेवून "महाबीज"चे भांडार शेतकऱ्यांना मोफत खुले करावे-पूजा मोरे*


मागील वर्षी परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.यामुळे सोयाबीन बियाण्याचीही प्रत खालावली होती.याची झळ आता आगामी खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.सोयाबीनचे बियाणे क्विंटल मागे 1 हजार रुपयांपेक्षा अधिक महागले आहे.प्रामुख्याने महाबीजच्या बियाण्याचा दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सोयाबीन बियाण्याची 30 किलो ची बॅग मागील हंगामात 1890 रुपयांपर्यंत विकली जात होती.यंदा ही किंमत 360 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.ही दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नसून म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा तात्काळ पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशअध्यक्ष पूजाताई मोरे यांनी केले आहे.

राज्यात सोयाबीन हे प्रमुख पीक झालेले आहे.राज्यात जवळपास 39 लाख हेक्टरपेक्षा अधिक सोयाबीन क्षेत्र आहे.यासाठी सोयाबीन उत्पादकांना लाखो क्विंटल बियाण्यांची गरज भासते.सोयाबीन हे स्वपरागसिंचित असल्याने दरवर्षी नवीन बियाणे विकत घेणे गरजेचे नसले तरी महाराष्ट्रात सोयाबीनचे 30 ते 40 टक्के दरम्यान नव्याने खरेदी होते.या बियाणे विक्रीत प्रामुख्याने महाबीजच्या वाटा असतो.हंगामात सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली.असाच फटका बीजोत्पादनालाही बसला आहे.बियाणे कंपन्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.यामुळे सहाजिकच बियाणे उत्पादनात वाढ झाली.यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ केलीय आहे.महाबीज बियाण्याच्या 30 किलो वजनाची बॅग मागील वर्षी पेक्षा 360 रुपयांनी यंदा महागली आहे.मागील वर्षात 1,890 ला मिळणारी बॅग 2250 रुपयांपर्यंत पोहचली आहे.म्हणून किलोलो 75 रुपयांना दर चुकवावा लागणार आहे.तर काही खासगी बियाणे कंपनीचे दर प्रति बॅग 2,400 किंवा त्यापेक्षा अधिक झाले आहेत.ही शेतकऱ्यांची लूट आहे.या कोरोनाच्या अडचणीच्या काळात सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करणे अपेक्षित होते मात्र त्या उलट त्यांनी दरवाढ केली आहे.म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा शेतकऱ्यांना पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे व खाजगी कंपन्यांच्या भाववाढीवर निर्बंध घालावे अशी मागणी पूजा मोरे यांनी केली आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...