शुक्रवार, २९ मे, २०२०

*सरकारने परिस्थितीचे भान ठेवून "महाबीज"चे भांडार शेतकऱ्यांना मोफत खुले करावे-पूजा मोरे*


मागील वर्षी परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.यामुळे सोयाबीन बियाण्याचीही प्रत खालावली होती.याची झळ आता आगामी खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.सोयाबीनचे बियाणे क्विंटल मागे 1 हजार रुपयांपेक्षा अधिक महागले आहे.प्रामुख्याने महाबीजच्या बियाण्याचा दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सोयाबीन बियाण्याची 30 किलो ची बॅग मागील हंगामात 1890 रुपयांपर्यंत विकली जात होती.यंदा ही किंमत 360 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.ही दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नसून म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा तात्काळ पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशअध्यक्ष पूजाताई मोरे यांनी केले आहे.

राज्यात सोयाबीन हे प्रमुख पीक झालेले आहे.राज्यात जवळपास 39 लाख हेक्टरपेक्षा अधिक सोयाबीन क्षेत्र आहे.यासाठी सोयाबीन उत्पादकांना लाखो क्विंटल बियाण्यांची गरज भासते.सोयाबीन हे स्वपरागसिंचित असल्याने दरवर्षी नवीन बियाणे विकत घेणे गरजेचे नसले तरी महाराष्ट्रात सोयाबीनचे 30 ते 40 टक्के दरम्यान नव्याने खरेदी होते.या बियाणे विक्रीत प्रामुख्याने महाबीजच्या वाटा असतो.हंगामात सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली.असाच फटका बीजोत्पादनालाही बसला आहे.बियाणे कंपन्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.यामुळे सहाजिकच बियाणे उत्पादनात वाढ झाली.यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ केलीय आहे.महाबीज बियाण्याच्या 30 किलो वजनाची बॅग मागील वर्षी पेक्षा 360 रुपयांनी यंदा महागली आहे.मागील वर्षात 1,890 ला मिळणारी बॅग 2250 रुपयांपर्यंत पोहचली आहे.म्हणून किलोलो 75 रुपयांना दर चुकवावा लागणार आहे.तर काही खासगी बियाणे कंपनीचे दर प्रति बॅग 2,400 किंवा त्यापेक्षा अधिक झाले आहेत.ही शेतकऱ्यांची लूट आहे.या कोरोनाच्या अडचणीच्या काळात सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करणे अपेक्षित होते मात्र त्या उलट त्यांनी दरवाढ केली आहे.म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा शेतकऱ्यांना पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे व खाजगी कंपन्यांच्या भाववाढीवर निर्बंध घालावे अशी मागणी पूजा मोरे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...