सोमवार, २२ जून, २०२०

रांजणी परिसरात तुरीला किडे खात असल्याने शेतकरी चिंतेत

रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात तुरीच्या पिकाला किडे खात असल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषि विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गात उत्साह निर्माण झाला होता. परिसरात दमदार पाऊस होत असल्याने शेतकरी वर्ग खरीप पिकांच्या पेरणीत मग्न झालेला दिसत आहे. रांजणी परिसरात कापूस व तुरीची जवळपास शंभर टक्के पेरणी झालेली आहे. मात्र जास्त पावसामुळे सोयाबीनची पेरणी लांबणीवर पडली आहे. रांजणी परिसरात कापूस व तुरीची पेरणी वेळेवर झाल्याने कापूस उगवला आहे. परंतु तुरीच्या पिकाला उगवण्यापूर्वीच किडे खात आहेत. काही शेतक-यांनी तुरीची लावणी दोन ते तीन वेळेस करूनही या पिकाला जमिनीच्या वर येण्यापूर्वी किडे खाऊन नष्ट करत आहेत. त्यामुळे वारंवार तुरीची लावणी करुन शेतकरी वर्ग हैरान झालेला दिसत आहे. त्यामुळे कृषि विभागाच्या वतीने शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

ॲन्टीजन टेस्टींग,  टेलिएक्सरे तसेच ॲन्टीबॉडीज टेस्टींग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोरोनाबाधितांवर उपचार करा जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताचा मत्यू होणार नाही, याची दक्षता -- पालकमंत्री राजेश टोपे



जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असुन ही अतिशय चिंतेची बाब आहे.  जिल्ह्यातील रुग्णांसाठी आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन ॲन्टीजन टेस्टींग,  टेलिक्सरे तसेच ॲन्टीबॉडीज टेस्टींग या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात यावेत.  जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताचा मत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री टोपे बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री नार्वेकर, डॉ. जगताप आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असुन केवळ अर्ध्या तासामध्ये रुग्णाचा अहवाल देणाऱ्या ॲन्टीजन्ट या तंत्रज्ञानाबरोबरच टेलिएक्सरे ही सुविधाही जालना जिल्ह्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली असुन या तंत्रज्ञानाचा  प्रभावीपणे वापर करण्यात यावा.  तसेच ॲन्टीबॉडीज टेस्टींगसुद्धा करण्याचे निर्देश देत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची, आरोग्य विभागाने दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला भाग हा कंन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषित करुन या भागातुन एकही नागरिक विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. या भागात नियम अधिक कडकपणे लागू करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस विभागाला यावेळी दिल्या.तालुका आरोग्य अधिकारी तसेच आशा वर्कर्स यांनी पॉलीऑक्सीमीटरचा वापर करुन घरोघरी जाऊन मधुमेह, ऱ्हदयरोग असे आजार असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती व ज्यांना सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे आहे अशा व्यक्तींचे जलदगतीने सर्व्हेक्षण करण्यात येऊन आवश्यकतेनुसार संस्थात्मक अलगीकरण करण्याबरोबरच वेळप्रसंगी अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.शहरामध्ये झोपडपट्टी भागामध्ये राहणारे नागरिक एकाच शौचालयाचा वापर करतात.  या शौचालयाच्या माध्यमातुनसुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असल्याने शौचालये नियमितपणे स्वच्छ करण्याचे निर्देश देत हायपोक्लोराईड द्रव्याने निर्जंतुकीकरणाची कार्यवाही नगरपालिकेने करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या.  कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत जनमानसांमध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत  कोरोनासंदर्भात छोटछोटे व्हिडीओ, कार्टुन्सची निर्मिती करुन समाजमाध्यमे, विविध वाहिन्या, वृत्तपत्रे याद्वारे जनमानसांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.  

रविवार, २१ जून, २०२०


  जालना जिल्ह्याच्या हद्दीतुन जाणाऱ्या शेगांव ते पंढरपूर  या राष्ट्रीय माहामार्गाच्या कामाची चौकशी करा.    



प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांनी निवेदना मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी.



जालना, ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्याच्या हद्दीतून शेगाव ते पंढरपूर (५४८) क्रमांक राष्ट्रीय महामार्गाच्या, ९० किलोमीटर रस्त्याच्या बांधकामात,मेघा इंजिनिअरिंग कंपनी व (MSRDC) अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता, श्री विक्रम जाधव,उप अभियंता श्री अतुल कोटेचा, यांनी मेगा इंजिनिअरिंग कंपनी  कोट्यावधी रुपयाचा घोटाळाप्रकरणी २०१८ मध्ये मुख्यमंत्री यांच्या कडे तक्रार केली होती, परंतु चौकशी झाली नव्हती, या प्रकरणी नव्याने उच्चस्तरीय समिती नेमून कारवाई करण्या बाबत निवेदन देण्यात आली. व सविस्तर माहिती अशी की,
जालना जिल्ह्याच्या हद्दीतून ९० किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग शेगाव ते पंढरपूर रस्त्याचे कामत घोटाळा करून काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे,शेगाव ते पंढरपूर (५४८) क्रमांक राष्ट्रीय महामार्गाचे काम खराब होत असल्याची तक्रार दि,४,८,२०१८ परत दि,१४,८,२०१८ मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन देऊ तक्रार केली होती, पण चौकशी झालेली नाही, "मग लक्षात आले जेडी हि खराब है, पेड नाही" म्हणून शेगाव ते पंढरपूर रस्त्याचे खालचे (बेडचे) मजबुतीकरण पूर्वीचा जुना रस्ता तसाच ठेवून त्याच्या बाजूचा रुंदीकरणाच्या कामांमध्ये माती मिश्रित मुरूम,निकृष्ट दर्जाच्या माळावरच्या दगडाची खडी वाफरल्याली आहे,तसेच जुन्या रस्त्याचे खोदकाम न करता,अधीक्षक अभियंता रस्ते विकास महामंडळ (MSRDC) औरंगाबाद अधीक्षक अभियंता  यांच्या कडे दि,१४,७,२०१८ रोजी निवेदन देऊन काम खराब होतात आहे असी तक्रार केले होती, 
परंतु या मध्ये MSRDC अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता,उप अभियंता जालना, यांनी कोणतीच दखल न घेता,मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन  लिमिटेड हैदराबाद,या कंपनी विरोधात (MSRDC) ने कोणची कारवाई केली नाही,कारण अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता,मेघा इंजिनिअरिंग कंपनी कडून टक्केवारी घेऊन संबंधित मेघा कंपनीला सहकार्य केले, व तळणी ते मंठा या रस्त्यावरील दोन ठिकाणी पुलाचे बांधकाम चालू असतांनी पूल बांधकाम कोसळून गेले,तसेच “राष्ट्रीय केंद्रीय रस्ते विकास मंत्री, मा श्री नितिनजी गडकरी यांनी या शेगाव पंढरपूर रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या जाहीर भाषण करतांनी सांगितले होते,या गुत्तेदारने या राष्ट्रीय महामार्गाचे काम खराब केले तर त्याला बुलडोझर खाली घालीन” मग या मेघा इंजीनियरिंग कन्ट्रक्शन कंपनीवर (MSRDC) ने कारवाई का केली नाही,तसेच जालना जिल्ह्याच्या हद्दीतुन जवळपास ९० किलोमीटरच्या कामत अनेक ठिकाणाहून माती मिश्रित वढ्या नाल्याची वाळू व माती मिश्रित मुरूम,माळावरील दगडाचा वाफर केले आहे,या मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन कंपनीने वाळु व मुरूम,माळावरच्या दगडाची सरास चोरी करून वापरत असल्या बाबत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने,जिल्हाधिकारी कार्यालय जालना‌. तहसील कार्यालय परतुर‌. दि,३०,७,२०१८ रोजी तक्रार दिल्यानंतर जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील मौजे येनोरा येथील शासकीय पाझर (क्रमांक-३) तलावा मधून मुरूमाची चोरी होत असतांनी मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन च्या कामावर असणारे (२) पोकल्यान (२१) हयवा असे मिळून (२३) वाहनांवर,तहसीलदार परतुर यांनी दि,३१,७,२०१८ रोजी प्रत्यक्षात पाहाणी करून पंचनामा केला व (२३) वाहने जप्त करण्यात आली होती. आज दि, १५,६,२०२० रोजी (२१) हायवा, (२) पोकलेन असे (२३) वाहने अधिकृत तहसीलदार परतुर यांच्या ताब्यात आहेत किंवा नाही अशी शंका आहे,पण (२१) हायवा, (२) पोकल्यान यांचे पासिंग नंबर (व्हिडिओ) आहे,  तसेच मेघा इंजीनियरिंग कन्ट्रक्शन कंपनी यांनी मुरमाची चोरी केल्यामुळे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला त्यामुळे या मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन कंपनीची, गौण खनिज चोरी केल्याप्रकरणी तक्रार,

दि,२४,८,२०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे निवेदन देऊन तक्रार केली होती,या नंतर मा जिल्हाधिकारी जालना व तहसील कार्यालय परतुर.तशील कार्यालय यांनी गौन खानीज वाळु,मुरुम,दगड चोरी केल्या प्रकरणी मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शनला (१९ )कोटी रुपये दंड केला,त्या पैकी (९) कोटी रुपये दंडाची वसूल करून,उर्वरित वसुलीसाठी कार्यवाही करण्यात आली होती. तसेच सध्या शेगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गा क्रमांक,(५४८) या महामार्गावर काम करणारे. मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन यांनी बोगस काम केल्यामुळे या रस्त्यावरुण वाहन जातेवेळी हादरे बसतात,आपण रस्त्यावरून चाललो का जहाजातून चाललोय असा भास होतो,रस्त्याच्या बाजूला ऊभे राहिल्यास वाहने जातांनी रस्त्यात "भंन भंन" आवाज येतो,कारण या रस्त्याचे  काम खुपच खराब झाले मुळे रस्ता खाली वर खाली वर झालेला आहे,शेगाव ते पंढरपूर या रस्त्याच्या कामात जालना या मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन कंपनी कडून (MSRDC) अधिकाऱ्याने टक्केवारी घेतल्यामुळेच जालना जिल्ह्यातील सरहद्द वडगाव तालुका मंठा,गंगा सावंगी तालुका परतुर,रस्ता ९० किलोमीटर जालना जिल्ह्याच्या हद्दीत जात आहे, या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णपणे खराब झाले आहे म्हणून (MSRDC) अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत ,उप अभियंता जालना, मेगा इंजिनिअरिंग कन्ट्रक्शन कंपनी यांची अमलबजावणी संचालनालय (ईडी) निडर अधिकाऱ्या मार्फत चौकशी करावी, प्रधानमंत्री मा श्री नरेंद्रजी मोदी यांनी देशाला आव्हान केले आहे "मै खाऊंगा ना खाने दुंगा" म्हणून राष्ट्रीय महामार्गाचे काम बोगस केले, म्हणून मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन कंपनी लिमिटेड हैदराबाद हि कंपनी किती हि मोठी असू द्या,काळ्या यादीत टाका, कारण जालना जिल्ह्याच्या हद्दीतील ९० किलोमीटर रस्ता हा आताच खराब होत चाला आहे, पुलाचे चालू बांधकाम असतांनी अनेक ठिकाणी पुलाचे बांधकाम कोसळले, अनेक ठिकाणे रस्त्याला भेगा पडल्यामुळे रस्त्याचे नवीन रस्ता खोदकाम करून नवीन दुरुस्ती काम चालू आहे, या मार्गावरील वाटुर ते परतुर दोन्ही बाजूचे १५ किलोमीटर रस्त्याचे बांधकाम खोदुन नविन काम करण्याची गरज आहे.

मा उद्धवजी बाळासाहेब मुख्यमंत्री या नात्याने शेगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गा (५४८) क्रमांक,देखरेख करणारे MSRDC अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता औरंगाबाद,उप अभियंता जालना यांच्या सहकार्याने मेगा इंजिनिअरिंग कन्ट्रक्शन कंपनी रस्त्याच्या कामात घोटाळा केला आहे,या घोटाळ्याची नव्याने उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी, हे प्रकरण  अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मुंबई यांच्या कडे देऊन,योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी प्रकाश  सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी निवेदना मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

शनिवार, २० जून, २०२०

झूम ॲप वापरताना सावध राहा : ‘महाराष्ट्र सायबर’चे नागरिकांना आवाहन.


मुंबई,ब्युरोचीफ :- सध्या अनेकजण घरुन काम (Work From Home) करत आहेत.ऑनलाईन मिटिंगसाठी वापरायला सोपे असल्याने झूम (zoom) या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.सायबर भामट्यांनी झूम ॲप सदृश काही मालवेअर (malware) व खोटी ॲप बनवली आहेत. त्यामुळे हे ॲप वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’ने केले आहे.   आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या ऑनलाईन मिटिंगसाठी झूम, मायक्रोसॉफ्ट मीटिंग, स्काईप, सिस्को वेबेक्स (zoom ,microsoft meetings ,skype ,cisco webex) आदी सॉफ्टवेअर आणि ॲप्स वापरली जात आहेत. झूम त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने  या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे .सायबर भामट्यांनी बनविलेली झूम ॲप सदृश काही मालवेअर जर डाऊनलोड केली, तर तुमच्या सर्व मिटिंग रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या मोबाईल किंवा संगणकाचा ताबादेखील हे सायबर भामटे घेऊ शकतात . ‘महाराष्ट्र सायबर’ने सर्व नागरिकांना विशेष करून झूम ॲप वापरणाऱ्यांना  हे ॲप वापरताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.झूम ॲप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे. शक्यतो कुठलीही गोपनीय माहिती अशा मिटिंगमध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना ही माहिती द्यावी . मिटिंग ॲडमिनने मिटिंगचे आयडी व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत. तसेच सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग ॲडमिन /होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींचीच लॉगिन रिक्वेस्ट स्वीकारावी.

पुढील बाबी लक्षात ठेवा

तुम्ही जर मीटिंग होस्ट असाल तर पुढील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे

१) तुम्हाला जो रँडम मिटींग आयडी व पासवर्ड मिळेल त्याचाच  शक्यतो वापर करा, तुमचा कुठलाही आयडी किंवा पासवर्ड वापरू नका .

२) तुम्ही मिटींग सेटिंग अशा प्रकारे बदल करा की तुमच्याशिवाय मिटींग मधील अन्य कोणीही व्यक्ती ती रेकॉर्ड करू शकणार नाही .

३) मिटींग मध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी लॉगिन केल्यावर सदर मिटींग लॉक करा जेणेकरून अन्य कोणी व्यक्ती त्यात अनाहूतपणे लॉगिन करू शकणार नाही .

४) मिटिंग सेटिंग अशी करा की तुमच्या आधी व तुमच्या परवानगीशिवाय कोणी त्यात लॉगिन करू शकणार नाही.

५)तुम्ही जर काही कारणाने मिटींग सोडून जात असाल किंवा  मिटिंग संपली असेल तर लीव्ह मिटींग चा  पर्याय न वापरता एंड मिटींगचा पर्याय वापरा .

६) मिटिंगची लिंक आयडी व पासवर्ड ओपन फोरमवर शेअर करू नका .


कॉग्रेस पक्ष नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर - आ. गोरंट्याल

जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.

जालना (प्रतिनिधी) :- जालना जिल्हा व शहर कॉग्रेस कमिटच्या वतीने शुक्रवारी रोजी कॉग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या जन्मवाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीराचे उद्धघाटन आणि अन्न पाकीट वाटप आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. श्री स्वामी समर्थ ब्लड बँक जालना येथे शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलतांना अ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, कॉग्रेस पक्षाचा बलीदानाचा इतिहास आहे. देशाची अंखडता आणि राष्ट्रीय एकत्माता मंजबुत करण्यासाठी कॉग्रेस पक्षाने देशाला धर्म निरपेक्ष विचार देवुन देशाची राज्यघटना आबाधीत ठेवण्यासाठी प्रयत्नाची पराकष्टा केली आहे. खा. राहुल गांधी यांच्या जन्मवाढदिवसाच्या निमित्त रक्तदान करुन कार्यकर्त्यानी भारतीय राज्य घटना देशात कायम टिकवीण्यासाठी ही एक रक्तदानातुन शपथ आहे. कॉग्रेस कार्यकर्ते समाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात हे आजच्या या रक्तदान शिबीरातुन उघड झाले आहे. असे ही आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहर कॉग्रेस कमिटचे अध्यक्ष शेख महेमुद यांनी केले. याप्रसंगी जिल्हा कॉग्रेस कमिटचे कार्याध्यक्ष राजेंद राख, प्रदेश सचिव विजय कामड, सत्सग मुंढे, बदर चाऊस, दिनकर घेवदे, आनंद लोंखडे, डॉ.विशाल धानुरे, एकबाल कुरेशी, तालुक्याध्यक्ष वसंत जाधव, विठ्ठल सिंह राना, नगर सेवक विनोद रत्नपारखे, संदीप खरात, अरुन मगरे, शेख शकील, राजू पवार, गणेश चौधरी, दिलीप मोरे, विठ्ठल बापू डोंगरे, नासेर बेग, शहेनाज शेख, सय्यद निजाम, शिवराज जाधव, गणेश भालेराव, चंद्रकात रत्नपारखे, विजय लहाने, अरुण घडलिंग, संदीप वाघ, अंकुश गायकवाड आदी कायकर्ते उपस्थित होते.
यावेळी या रक्तदान शिबीरामध्ये कॉग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्योनी रक्तदान केले. रक्तदान शिबीरा नंतर गरजुना अन्नाचे पाकीटवाटप करण्यात आले. श्री स्वामी ब्लड बँकेचे प्रकाश भागे, आंनद घाडगे, अनिकेत पाखरे, फ्रान्कीक कांबळे आदी कर्मचारी रक्तदान शिबीरामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलान गणेश चौधरी यांनी तर तालुक्यध्यक्ष वसंत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.


वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी पिडीत पाईकराव यांना दिली भेट                      


जालना,ब्युरोचीफ :- मच्छींद्रनाथ चिंचवली ता.घनसावंगी येथील तुळसिराम पाईकराव यांना गावगुंडांनी जातीय भावनेतून दोन हात निकामी होई पर्यंत जबर मारहाण  केल्या प्रकरणी दिनांक 20 जून रोजी जालना येथील शासकीय रुग्णालयात  वंचित बहुजनआघाडीचे पदाधिकारी  भिमराव दळे, दीपक डोके, विष्णु शेळके,बि.के.कारके,गनेश खरात, अँड.कैलास रत्नपारखे, सचिन कांबळे, कैलास रत्नपारखे,राज रत्नपारखे यांच्यासह भेट दिली व वंचित बहुजन आघाडी पिडीत पाईकराव यांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भिमराव दळे," यांनी यावेळी सांगितले".

मागासवर्गीयांवरील हल्ले,कधी होणार कारवाई, वंचितच्यावतीने आंदोलनला सुरवात



मुंबई,ब्युरोचीफ :- राज्यातील मागासवर्गीयांवरील वाढते हल्ले पाहता प्रशासनाने अद्यापही ठोस पावले उचललेली नाहीत, राज्यभर निवेदने देऊन तीन दिवस झाले, मात्र कारवाई व योग्य तपासाला सुरुवात न झाल्याने वंचित बहुजन आघाडी अनुशक्तीनगर विभागाच्यावतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. मागासवर्गीयांनवरील हल्ले वाढत असून योग्य ती कारवाई केली जात नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आरोपींना पाठीशी घालण्यात येत असून व योग्य ती कारवाई होत नसल्याने राज्यभर तीव्र आंदोलन करीत सरकार विरोधात निवेदन देण्यात आले होते. असे असतानाही अद्याप कारवाईला सुरुवात न झाल्याने किमान तशी घोषणाही न केल्याने वंचितच्यावतीने जाब विचारो आंदोलन करण्यात आले. अनुशक्तीनगर विभागाचे अनिल वाकोडे, सुरेश वाघमारे,सुनीता डोळस, मकरंद कांबळे, कविता, दगडू साळवे,भाऊसाहेब जाधव, राणी अब्दुल्ले या कार्यकर्त्यानी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सरकारला जाब विचारला आहे. धर्मवादी, जातीयवादी असलेले हे सरकार जोपर्यंत निःपक्षपातीपणे कारवाई करायला सुरुवात करीत नाही, तोपर्यंत राज्यभर आंदोलन करून सरकारला जाब विचारला जाईल,असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला होता. त्यानुसार राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. 

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...