सोमवार, २२ जून, २०२०

रांजणी परिसरात तुरीला किडे खात असल्याने शेतकरी चिंतेत

रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात तुरीच्या पिकाला किडे खात असल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषि विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गात उत्साह निर्माण झाला होता. परिसरात दमदार पाऊस होत असल्याने शेतकरी वर्ग खरीप पिकांच्या पेरणीत मग्न झालेला दिसत आहे. रांजणी परिसरात कापूस व तुरीची जवळपास शंभर टक्के पेरणी झालेली आहे. मात्र जास्त पावसामुळे सोयाबीनची पेरणी लांबणीवर पडली आहे. रांजणी परिसरात कापूस व तुरीची पेरणी वेळेवर झाल्याने कापूस उगवला आहे. परंतु तुरीच्या पिकाला उगवण्यापूर्वीच किडे खात आहेत. काही शेतक-यांनी तुरीची लावणी दोन ते तीन वेळेस करूनही या पिकाला जमिनीच्या वर येण्यापूर्वी किडे खाऊन नष्ट करत आहेत. त्यामुळे वारंवार तुरीची लावणी करुन शेतकरी वर्ग हैरान झालेला दिसत आहे. त्यामुळे कृषि विभागाच्या वतीने शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...