गुरुवार, २५ जून, २०२०

सुबोध काकाणी यांना उद्योग क्षेत्रातुन राज्यपाल नियुक्त विधान परिषद वर घेण्यात यावं..


नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड.

श्रीमती ज्यांची गुलामी करते असूनही कोणत्याही प्रकारची घमेंड नसलेले *काकाणी*परिवारातील पुरुषोत्तम राजाराम काकाणी या दाम्पत्याला दि. 16/10/1978 रोजी पुत्ररत्नाचा हेंद्राबाद येथे जन्म झाला. घरातील अगदी लहान पनापासूनच लाडका असलेले हे मुलं अगदी कमी वयातच नावारुपाला येऊ लागले ते त्याच्यातील सर्व जाती धर्मातील तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या प्रवृतीमुळे जनमानसात त्याच्या विषयी आपोआप आदर निर्माण होऊन कोणीही निस्वार्थ त्याचा होऊन जातो असे हे धर्माबादकराणा लाभलेले वेक्तीमत्व अगदी फोन वर जरी मदत मागितली तर ती काही वेळात मदत पोहचता करणारे मी पाहिलेले सुबोध काकाणी कोरोना वायरस च्या लॉकडाऊन काळात शहरवासीयांना हाताला काम नाही शहरात हातावर पोट असलेली गोरगरीब जनता त्यांच्या घरात कशी चूल पेटेल या विवंचनेत असलेला व आपली तळमळ मित्र परिवारांना सांगून त्यांच्या संकल्पने तुन साकार झालेले *गावकरी किचेन च्या मधून शहरातील रोज 20 ते 23 हजार जनतेची भूख भागवण्याचे सारखे 32 दिवसात 650000(सहा लाख पणास हजार )अन्नचे पाकीट व्यवस्तीत घरपोच दिले जवळ जवळ 700 किंटल तांदूळा ची खिचडी करून दिल्यामुळे या उपक्रमाची नोंद राज्यस्तरीय स्तरावर झाली.  *गावकरी किचन*मधूनघरोघरी जाऊन खिचडी वाटप करणारे सुबोध काकाणी तालुक्यातील मोठे अधिकारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, तहसीलदार दत्तात्रय शिंदे, पोलीस निरीक्षक सोहन माच्छर, मुख्यधिकारी देवरे. धर्माबाद शहराचे उपनगर अध्यक्ष विनायक रावजी कुळकर्णी शहरातील सर्व नगरसेवक. व प्रतिष्टीत नागरिक यांना या माध्यमा तुन सेवा करण्याची संधी मिळून देणारा सर्व खर्च स्वतः करून हि कोणत्याच प्रकारचा आव न आणणारा मी पाहिलेला देव माणूस सुबोध काकाणी यांनी बुलढाणा अर्बन बॅंकेच्या व स्वतः च्या माध्यमातुन आपल्या परिसरातील जनतेच्या समस्याचे बारकाईने अभ्यास करून ती पूर्णत्वास आणण्याच्या जिद्दीने आपणाला यांच्या साठी काही तरी करावेच लागेल या विवंचनेतुन त्यांच्या संकल्पना साकार करणारे सुबोध काकाणी धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व प्रथम प्राधान्य दिले ते शेतकर्याचं शेत माल ठेवण्यासाठी अतकूर शिवारात भव्य असे 8हजार मेट्रिक टन व 7 हजार मेट्रिक टन क्षमतेचे 10वेअर हाऊस ची निर्मिती केली.सर्व परिसरात cctv बसून जिल्ह्यातील एकमेव ठिकाण असलेली शासन दरबारी  नोंद आहे. तिरुपती देवस्थानला सण 2015 मध्ये 5 लाख व 2016मध्ये 10 लाख दान दिले आहेत धर्माबाद परिसरात मोठया प्रमाणात उधोग निर्माती करून 500जणांना कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला अतकूरगावास माजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या संकल्पने तुन दत्तक घेतले.2016मध्ये कोरडा दुष्काळ पडला असताना शहरवासियांना मोफत दिवस रात्र पाणी पुरवठा टेक्टर द्वारे केला.बुलढाणा अर्बन बॅंक व दिवाणी न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर मध्ये 526रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता.धर्माबाद तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामात तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.काकाणी व ड्रा. अरुण डोंगरे यांच्या काळात मोफत जी सी बी उपलब्ध करून दिली होती   त्यामुळे पूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शहरात रुग्णांना ने आन करण्यासाठी रुग्णवाहनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी हेरलं व तीचा लोकार्पण सोहळा पारपडला त्या मुळे तालुक्यातील रुग्णांचा प्रश्न मार्गीलागला लगेच त्यांनी शववाहिनीची तालुख्यतः गरज आहे म्हणून तीही दिमतीत उभी केली.तालुक्यात कुठेही आग लागल्या वर ती वीजवण्यासाठी अग्निशमन गाडी सुद्धा जनतेच्या सेवे साठी दिली कोविड -19 च्या काळात धर्माबाद नगर पालिका हद्दीत निर्जंतुकीकरन करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा नगरपालिकेस  मोफत उपलब्ध करून दिली.धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समीती परिसरात हमाल मापाडी, व्यापारी, शेतकऱ्या व जनते साठी पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळावे म्हणून या परिवारा कडून  करण्यात आले आहे.कोविड-19पासून देशास  व राज्यास मदत म्हणून या काकाणी  परिवारा काडून अचानक धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयास भेट व तेथील कोरोना कक्ष पाहणी साठी आलेले नांदेड जिल्याचे जिल्हाधिकारी ड्रा.विपीन इटनकर यांना स्वघरी येण्याचे आमंत्रण देऊन पंतप्रधान सहायता निधी म्हूणन 250000 व मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी म्हणून 250000 चा धनादेश संपत केला. आता तालुक्यातील सर्व जाती धर्मातील जनतेच्या पाल्याना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून अतकूर  शिवारात भव्य असे राजाराम काकाणी सहकार विद्या मंदिर स्थापन करण्यासाठी इमारत बाधकाम प्रगती पथावर आहे.परिसरातील गोरगरीब  मुलींच्या लग्नासाठी ते 11000, हजार रुपये आपल्या आजोबा राजाराम काकाणी यांच्या नावे देतात.यांच्या या सेवाभावी व्रतिची दाखल उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी जिल्हाप्रशासनस देऊन ती महाराष्ट्रचे राज्यपाल कोशरिया यांच्या परेंत पोहचवण्याचे काम जिल्हा प्रशासनाणे केले आहे या कामाची दखल राज्यपालंनी घेऊन मा.सुबोध काकाणी यांना नुकतेच सांगण्यात आली आहे.त्यांच्या या विविध कामाची दखल घेऊन राज्यपाल यांनी उधोग क्षेत्रातुन विधान परिषद वर नियुक्त करावयाची मागणीने जोर धरला आहे.तालुक्यातील युवावर्गाने सामूहिक निवेदन देण्यासाठी गावोंगावी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.सुबोध काकाणी यांना विधान परिषद वर उद्योग क्षेत्रातुन घेण्यात यावे म्हणून धर्माबाद तालुक्यातील 52 ग्रामपंचायत पैकी 38ग्रामपंचायतिने तसा ठराव घेतला आहे उर्वरित ग्रामपंचायत मध्ये तसा ठराव घेण्यासाठीची प्रकीर्या चालू आहे.तसे काकाणी परिवाराचे सर्वच राजकीय पक्षतील नेत्यांना सोबत चांगले संबंध आहेत.माजी राज्यपाल श्री.विद्यसागर राव यांचे कोटुबिक संबंध होते.ते कोणत्या पक्षची मदत घेतात या कडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे.आपल्या तालुक्यात जे जे जण उपयोगी आहे त्या गोष्टी चा बारकाईने अभ्यास करून ती कशी अमलात आणावी त्याचा जनतेला कसा फायदा होईल असे हे  सुबोध काकाणी या परिसरातील असे व्यक्तीमत्व आहे की ते कोणत्याही राजकीय पक्षत नाहीत. तरी ते लोकप्रिय आहेत.अशी व्येक्ती उद्योग क्षेत्रातुन विधान परिषद सदस्य झाल्यास आम्हांला त्यांच्या अभिमानच होईल असे धर्माबाद येथील जनता व माजी नगर सेविका सौ.नीता गायकवाड यांनी म्हणले आहे.


बुधवार, २४ जून, २०२०

अंजानी आई फाऊंडेशन तर्फे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सैनिटीजर वाटप


औरंगाबाद,ब्युरोचीफ :- कोरोना व्हायरस ने जगात थैमान घातले असून प्रत्येक जिल्ह्यात कोरोना पेशंट झपाट्याने वाढत आहे .पोलीस प्रशासन जीव धोक्यात घालून  नागरी सेवा करीत आहे दिवसेन दिवस पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना देखील कोरोनाची लागण  होऊन मृत्यू होत आहे  प्रशासन मार्फत पोलीस ना कोणतेही सेफ्टी किट  दिलेली नाही  पोलीस अधिकारी अंमलदार स्वतःचा जीव धोक्यात घालून  कर्तव्य बजावत आहे.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अंजनीआई फाऊंडेशन जालना पंढरपूर टीम च्या वतीने शहर पोलिस  स्टेशन पंढरपूर या ठिकाणी पोलीस अधिकारी ठाणे अंमलदार,नागरिक  याना सैनिटीजर वाटप करण्यात आले.
अंजानी आई फाऊंडेशन लॉक डाऊन सुरू झाल्यापासून कार्यरत आहे जालना,औरंगाबाद, पंढरपूर,भुसावळ ,इत्यादी जिल्ह्यात तालुक्यात अंजनीआई फाऊंडेशन जालना ची टीम स्वतः फिल्ड वर्क करत आहे अन्न धान्य, किराणा किट,मास्क,सैनिटीजर,रुमाल,फूड पाकीट ,पायी प्रवासी याना टी -शर्ट,चपल जोड वाटप करण्यात आले.दहा हजार व्हिटॅमिन c च्या गोळ्या ,फेस शिल्ड,औरंगाबाद शहर येथे वाटप करण्यात आले भुसावळ या ठिकाणी गरजू ना किराणा किट देण्यात आली  करण्यात येत आहे किरवले मित्र मंडळ च्या माध्यमातून वाटप सुरू आहे फाऊंडेशन चे काम विविध जिल्ह्यात चालू आहे अंजनी आई फाऊंडेशन
पंढरपूर टीम चे विजय जाधव, सचिन माने,आण्णा वाघमोडे अमोल अधटराव,यांनी सैनिटीजर वाटप केले.अशी माहिती अंजनी आई फाऊंडेशन च्या विद्या जाधव ज्योती आडेकर यांनी दिली.psi बालाजी किरवले यांनी मास्क ,सामाजिक अंतर ठेवण्याचे आव्हान केले.

अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नांना गटनेता विजय पवार यांची समर्थ साथ


प्रभागातील धार्मिक स्थळांचे करून घेतले निर्जतुंकीकरण

*जालना,प्रतिनिधी :-* माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या विशेष प्रयत्नांतून जालना शहरातील धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. त्याच अनुषंगाने श्री खोतकर यांच्या प्रयत्नांना साथ देत पालिकेचे शिवसेनेचे गटनेते विजय पवार यांनी प्रभाग क्र 13 मध्ये हा उपक्रम राबविला असून त्यांच्या नियंत्रणाखाली या भागातील सर्व धार्मिक स्थळ परिसरात फवारणी करण्यासह स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे.शहरातील अनेक भागात कोरोना रूग्ण आढळण्याचे प्रमाण गत काही दिवसात वाढले आहे. त्याचीच दखल घेऊन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नियोजनानुसार शहरातील धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रामुख्याने औषध आणि धुराची फवारणी करून संबंधीत परिसरात स्वच्छता राहण्यावर मोहिमेअंतर्गत विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मोहिमेला समर्थ साथ देण्याचा गटनेता विजय पवार यांचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने प्रभाग क्र 13 मधील सर्व धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे. या परिसरांमध्ये विजय पवार यांच्या नियंत्रणाखाली धूर व औषध फवारणी केली गेली आहे. शिवाय धार्मिक स्थळांसोबत प्रभाग परिसरातही साफ सफाई राखण्यावर श्री पवार यांचे विशेष लक्ष असून कुठल्याही परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही अशी ग्वाही श्री पवार यांनी दिली आहे.


डॉ.जयंत भालेराव यांचे निधन


जालना,प्रतिनिधी :- येथील आनंदवाडी परिसरातील रहिवासी डॉ. जयंत आबाराव भालेराव यांचे सोमवारी (दि 22) दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 64 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर रामतिर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घनसावंगी येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन अधिकारी म्हणून डॉ. भालेराव हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, भाऊ, बहिण, दोन मुले, सुना नांतवडे असा मोठा परिवार आहे.


ऑनलाईन परिक्षेत सचिन आर्य यांचे यश .ऑलंम्पिक दिनानिमित्त आयोजित केली होती स्पर्धा


जालना,प्रतिनिधी :- एकीकडे कोरोना महामारीसारख्या संकटाचा सामना करण्यासाठी जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभा असलेल्या जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांनी आपल्या दैनंदिन कामाकाजासही आवडीनिवडीवरची पकडही कमी होऊ दिलेली नाही. त्याचेच उदाहरण म्हणजे पोलीस दलातील कर्मचारी सचिन आर्य यांनी ऑलंम्पिक दिनानिमित्त अखिल भारतीय स्तरावर आयोजित ऑनलाईन स्पर्धेत विशेष यश संपादन केले हे मानले जात आहे.कोरोना आजारावर मात करण्यासाठी पोलीस प्रशासनासह आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी तसेच नागरिक गत अनेक दिवसांपासून झटत आहेत. त्यातच सर्वसामान्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील तायक्वांदो खेळाचे राष्ट्रीय पदक विजेते तथा राष्ट्रीय पंच सचिन आर्य यांनी ऑलंम्पिक दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदवून हे यश संपादीत केले आहे. भारतामधील एकमेव स्पोर्टइन या नामांकीत संस्थेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात संपादीत केलेले यश हे आर्य यांचे नेत्रदिपक यश मानले जात आहे. या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख, जनता पोलीस समन्वय समितीचे धनसिंह सुर्यवंशी, विजय कमळे, राष्ट्रीय खेळाडू विपूल राय, फईम खान, सय्यद निसार, सचिन गादेवार, मयुर पिवळ, प्रतिक ढाकणे यांनी श्री आर्य यांचे अभिनंदन केले आहे.


जिल्ह्यात चौदा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर वीस रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना,ब्युरोचीफ :- शहरातील लक्कडकोट परिसरातील 01,नानक निवास 04, विठ्ठल रुक्मिणी लोधी मोहल्ला 01, काद्राबाद 03, शंकर नगर 01, सरस्वती मंदिर 01,गुडला गल्ली 04, जाफ्राबाद शहरातील अंबेकर नगर 01,जाफ्राबाद शहरातील नगर पंचायत 01, जाफ्राबाद शहरातील आदर्श नगर 01, आदर्श नगर पिंपळखुडा, जाफ्राबाद 01,अंबड शहरातील 01 अशा एकुण 20 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात तर  जालना शहरातील काद्राबाद परिसरातील 02,मंगळबाजार 03, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 मधील 01 जवान,नाथबाबा गल्ली 03,मोदीखाना 01,नुतन कॉलनी, भोकरदन 02,गोंदी ता. अंबड येथील 02 अशा एकूण 14 व्यक्तींच्या पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3789 असुन  सध्या रुग्णालयात -104, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1436, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–61, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4674, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–14 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -398, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -4211 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-406 एकुण प्रलंबित नमुने-61, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1320.14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–03, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1215, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-44, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-245, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–16, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -104, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-24, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-20, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-277, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -102, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-07, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-10597, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 12 एवढी आहे. आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 245 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-14, शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-29, संत रामदास वसतिगृह जालना-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-00, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-26, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना–59 मॉडेल स्कुल परतुर-05, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-11, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-01 मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी–02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -27, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00, हिंदुस्थान मंगल  कार्यालय, जाफ्राबाद-09, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद –00, जेबीके विद्यालय, टेंभुर्णी-28, शेठ इ.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -30.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 872 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 827 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 76 हजार 930 असा एकुण 4 लाख 3 हजार 738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  


प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज उपलब्ध करुन द्या.

कंन्टेन्टमेंट झोनमधुन नागरिकांनी बाहेर पडू नये.


एसबीआय, युनियन बँक तसेच शहरातील कंन्टेन्टमेंट भागास भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सुचना

जालना,ब्युरोचीफ :-जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज दि. 24 जुन रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या मुख्य शाखेस, अंबड येथील एसबीआय  तसेच रामनगर येथील युनियन बँकेला भेट देऊन शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीककर्जाचा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.तसेच जालना शहरातील कन्टेन्टमेंट झोनला प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.बँक अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकांच्या लागवडी तसेच मशागतीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते.  शासन तसेच प्रशासनामार्फत प्रत्येक बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  पीककर्जाचे दिलेले उद्दिष्ट प्रत्येक बँकांनी शंभर टक्के पुर्ण करावे.  तसेच जिल्ह्यातील एकही गरजू शेतकरी पीककर्जापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देत ज्या बँका दिलेले उद्दिष्ट पुर्ण करणार नाहीत अथवा पीककर्ज देण्यास टाळाटाळ करतील अशा बँकांवर कारवाई करण्याचा ईशाराही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिला.यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, एलडीएम निशांत ईलमकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


नागरिकांनो कंन्टेन्टमेंट भागातुन बाहेर पडू नका
जालना शहरामधील कंन्टेन्टमेंट भागास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत या भागाची पहाणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये.केवळ अत्यावश्यक असेल त्या वेळीच घराबाहेर पडा.सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायरचा वापर, वारंवार साबणाने हात धुणे या बाबींची सवय लावून घेण्याबरोबरच प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


अंबड येथील कापूस खरेदी केंद्राला भेट अंबड येथे सुरु करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्राला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची पहाणी करुन एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना यावेळी दिले.यावेळी आमदार नारायण कुचे, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हाउपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांच्यासह अधिकारी व शेतकऱ्यांची  उपस्थिती होती



अंबड तहसिल कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट
अंबड येथील तहसिल कार्यालयास जिल्हाधिकारीरवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन तेथील कामकाजाचा महसुल अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.यावेळी उप विभागीय अधिकारी शशीकांत हदगल, तहसिलदार श्री शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.



  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...