बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार -शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
मुंबई, / प्रतिनिधी :- राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेत मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त मांडण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.
आज राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत सदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला. त्यास उत्तर देताना मंत्री श्रीमती गायकवाड बोलत होत्या. यावेळी  सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभु, आशिष शेलार, भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.मंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या, सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याबाबतचे विधेयक उच्च सभागृहात मांडले जाणार असून, मराठी भाषा दिनानिमित्त ते विधानसभेत उद्या मंजूरीसाठी मांडण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी, केंद्रीय, आंतरराष्ट्रीय या सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून, ज्या शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्याने या मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री गायकवाड यांनी दिली.त्याचबरोबर, ज्या खाजगी शाळा शैक्षणिक शुल्काबाबत नियम पाळत नाहीत अथवा गरजेपेक्षा जास्त शुल्क वापरतात अशा शाळांबाबत तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थित उपप्रश्नास दिली.
                 सावता परिषदेच्या मराठवाडा विभाग 
              उपाध्यक्षपदी विष्णूभाऊ पुंड यांची निवड.
जालना/प्रतिनिधी :- सावता परिषदेच्या मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी अंबड येथील विष्णुभाऊ पुंड यांची निवड करण्यात आली.
 सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या सुचनेनुसार प्रदेश महासचिव मयुर वैद्य यांनी ही निवड एका नियुक्तीपत्राव्दारे केली.  तसेच मराठवाडा विभाग संघटकपदी गणेश वाघमारे (जालना), महिला आघाडी जालना जिल्हाध्यक्षपदी सौ. सुषमा खरात, युवक आघाडी जालना जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

हरीनाम हे मानव जीवनाचे उध्दार करणारे नाम आहे- ह.भ.प
बद्रीनाथ महाराज यज्ञेकर जोशी
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी):-भगवंताच्या नाम चिंतनाने मोह,मध,मत्सर, या सर्व गोष्टीचा नाश होतो तसेच मानव जीवनाचा उध्दार होतो असे प्रतिपादन रामनगर येथील बाल कीर्तनकार बद्रीनाथ महाराज यज्ञेकर-जोशी यांनी मौजपुरी येथे सुरू असलेल्या 
 अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी पहिल्या दिवशी कीर्तन रुपी सेवेत केले.किर्तनरुपी सेवेसाठी घेतलेल्या ज्ञानदेव राय यांचा अभंग रामकृष्ण नामे हे दोनी साजिरे हृदय मंदिरी स्मरा कारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा रुदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया या अभनगवर पुढे निरुपम करताना ते म्हणाले की एकदा मनुष्य मोह पाश्यात अडकला गेला की त्याला काही कळत नाही त्याचप्रमाणे मद्यपान केलेला माणूस मद्यपान केल्यानंतर आपले श्रेष्ठत्व व स्थान विसरून जातो पण मद्याची नशा ही काही काळापुरती मर्यादित असते पण मोहाची नशा ही जन्मोजन्मी उतरत नाही त्याच बरोबर ज्ञानी मनुष्य मोहपाश्या अज्ञानी होतो सदाचारी हा दुराचारी होतो अशा मोहतून जर सुटका करायची असेल तर भगवंतांचे नामसमरण जीवनात केले पाहिजे त्याचबरोबर तारुण्य हे माणसाला नको त्या गोष्टीकडे घेऊन जात जाते तेव्हा तरुणपणात भगवंताचे नामचिंतन करणे आवश्यक आहे आपुलिया आपण करा सोडवणं या अभंगतील उकतीप्रमाणे आपली जर दुःखातून सोडवणं करावयाची असेल तर ते आपणच सोडवू शकतो कीर्तन श्रवणासाठी मौजपुरी सह पंचक्रोशीतील भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात उपस्तीती होती
                                          दुःखद वार्ता
अंबड (प्रतिंनीधी) :- अंबड येथील आंबेडकर नगर येथील रहिवासी
बबनराव खरात वय 67 वर्ष,रा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर
यांचे अल्पशा आजाराने आज दि.26/02/20  रोजी दुःखद निधन झाले आहे. आयु.सुनिल बबनराव खरात,अनिल बबनराव खरात,किशोर बबनराव खरात,राहुल बबनराव खरात,राजु बबनराव खरात यांचे ते वडील होते,व आयु.मती ज्योतीताई खरात यांचे ते सासरे  होते.

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

             शहरी महानेट प्रकल्पाचा अप्पर जिल्हाधिकारी 
                  रवींद्र परळीकर यांच्या हस्ते शुभारंभ
जालना (प्रतिनिधी):- दि.24 -सध्या इंटरनेटचा वापर प्रत्येक कामकाजात आवश्यक झाला आहे .शासकीय कार्यालयासह सर्वानाच आता ऑनलाईन  कामकाजामुळे इंटरनेट शिवाय पान  हालत नाही. त्यामुळे इंटरनेट सुविधा असणे आणि ती विनाव्यत्यय  सुरु राहणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे . त्यासाठी शासनाने  शहरी महानेट प्रकल्प  सुरु केला असून या शहरी महानेट  प्रकल्पचा शुभारंभ अप्पर
 जिल्हाधिकारी रविंद्र परळीकर यांच्या हस्ते नुकताच तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला .यावेळी तहसिलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसिलदार श्री.राजमाने, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक आण्णासहेब वाघमारे,मंडळ अधिकारी श्री.भोरे, वरिष्ठ नेटवर्क अभियंता अंकुश तुपेकर, सागर खैरनार, रिलांस जिओचे देवेंद्र कुलकर्णी, रुपेश गुप्ता यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील महत्वाचे शासकिय विभाग त्यांच्या अखत्यारित असलेले 203 शासकिय कार्यालये,शाळा, शासकिय विभाग इ. ठिकाणी ऐकमेकांना जोडली जाणार आहेत.नव्याने निर्माण करण्यात आलेल्या फायबर ऑप्टिक इंटरनेट सुविधे अंतर्गत त्या त्या ठिकाणी  उच्च गतीने सेवा देण्यात येणार आहे.   यावेळी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक अण्णासाहेब वाघमारे यांनी योजनेचे फायदे तसेच सामान्यांसाठी होणा-या लाभाची माहीती दिली. शासकीय कार्यालये,शाळा वस्तीगृहे यांना मोफत व अल्प दरात जोडणी देण्यात येणार आसल्याचेही त्यांना शेवटी सांगितले. दुर्गम भागातील तालुक्याला देखील याचा लाभ मिळणार आसल्याने अप्पर  जिल्हाधिकारी  श्री. परळीकर  यांनी समाधान व्यक्त केले.या उपक्रमा अंतर्गत जिल्हातील शासकिय कार्यालयामध्ये ई-गव्हर्नस, आरोग्य सेवा, शिक्षण, ई-डेटा  उपक्रमांना गती देउन त्यांचा दर्जा सुधारणार आहे. नागरिकांना मिळणा-या दाखलांचे कामकाजही गतीशील होणार असल्याने समस्या निकाली निघणार आहे.इंटरनेट वापराचे महत्व वाढल्याने या शहरी महानेट प्रकल्पाचा लाभ शासकिय कार्यालयांना होणार आहे या प्रकल्पामुळे इंटरनेटची सेवेची गती वाढणार असुन यामुळे शासकिय कार्यालयातील कामकाजाला गती मिळणार आहे.
स्वा.सै.स्व.धाकलेश्वर करनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
जालना/प्रतिनिधी :- येथील माजी आमदार दलितमित्र स्वातंत्र्य सैनिक स्व. धाकलेश्वर (दादा) मक्काजी करनाडे यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त रहेमान गंज वासीयांतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व. करनाडे यांच्या प्रतिमेस राहुल करनाडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या जीवन कार्याविषयी खलील पहेलवान यांनी विचार मांडले. तसेच उपस्थितांचे अकबर बादशाह व शे. सिद्दीक यांनी आभार मानले. या कार्यक्रमास चुन्नु रफीक, ईश्वर सिंग, राहुल करनाडे, शेख परवेज, शेख जफर यांच्यासह रहेमानगंजवासीयांची मोठ्या संख्येेने उपस्थिती होती.
माजी आमदार दलितमित्र स्वातंत्र्य सैनिक स्व. धाकलेश्वर (दादा) मक्काजी करनाडे यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त रहेमान गंज वासीयांतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी खलील पहेलवान, अकबर बादशाह, शे. सिद्दीक, चुन्नु रफीक, ईश्वर सिंग, राहुल करनाडे, शेख परवेज, शेख जफर यांची उपस्थिती होती.

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

   महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना टेंभुर्णी व                    तीर्थपुरी येथे आधार प्रामाणिकरणास प्रारंभ

जालना, दि. 24 - महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्याच्या टेंभुर्णी तर घनसावंगी तालुक्याच्या तीर्थपुरी या गावातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्त प्रथम शेतकरी पंढरीनाथ महादू धारे यांना आधार प्रमाणित नोंद प्रमाणपत्र देऊन या योजनेचा शुभारंभ आज  दि. 24 फेब्रुवारी रोजी टेंभुर्णी येथील आपले सरकार सेवा केंद्र येथे करण्यात आला.यावेळी सहाय्यक निबंधक श्रीमती कल्पना शहा, चेअरमन रावसाहेब अंभोरे, जिल्हा सहकारी बँकेचे भागचौकसनिस देविदास दंदाले, गटसचिव गणेश चव्हाण, विष्णू डोईफोडे, भुंजगराव पिंपळे, शालिक बनकर, सरपंच गणेश धनवाई, भिकन खाँ पठाण, अंकुश देशमुख, हरिभाऊ सोनसाळे, गोरखनाथ राऊत आदींची उपस्थिती होती.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यातील टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील आधार प्रमाणिकरण कामाची पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला. टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील प्रत्येकी 551 अशा एकुण 1 हजार 102 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या दोन गावातील यादी प्रसिद्धीनंतर काही अडचणी  असतील तर त्याची माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे. यात शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहितीची खातरजमा करुन कर्जमुक्तीसाठी सहमती दर्शवायची आहे.  जिल्ह्याभरातील सर्व गावांची अंतिम यादी येत्या 28 किंवा 29 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. 

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...