शुक्रवार, १० एप्रिल, २०२०


शहरातील दु:खीनगर भागातील 7 हजार 22 व्यक्तींचे सर्व्हेक्षण पुर्ण
              16 एप्रिलपर्यंत सर्व्हेक्षण सुरुच राहणार
जालना, प्रतिनिधी – जालना शहरातील दु:खी नगर परिसरात 20 पथकाच्या सहाय्याने 1 हजार 175 कुटूंबातील 7 हजार 22 व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले असुन हे सर्व्हेक्षण 
16 एप्रिल, 2020 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती जिल्ह्यात एकच कोरोनाबाधित असलेल्या महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या सामान्य रुग्णालयातील 17 कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असुन त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  दि. 6 एप्रिल रोजी कोरोना बाधित महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु असुन त्यांची प्रकृती गंभीर आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आतापर्यंत 159 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन 15 व्यक्तींना अटक करण्याबरोबरच 15 वाहने जप्त करण्यात आली आहेत तर 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 499 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 131 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 305 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 22 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 306 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 267, रिजेक्टेड नमुने-03, एकुण प्रलंबित नमुने-34 तर एकुण 174 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 5, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 72 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या शुन्य, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-5, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या निरंक, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 131, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या            67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. 

a
जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

           राशन दुकानदारांकडून ग्राहकांची सरास लूट
         एका कार्ड धारकाकडून 5 किलोचे अन्न लंपास
                  हा काळा बाजार थांबणार कधी

  
जालना / प्रतिनिधी :- जालना तालुक्यात राशन दुकानदारांकडून गरीब ग्राहकांची सर्रास लूट करण्यात येत आहे.प्रत्येकी ग्राहकाकडून 5 ते 10 किलो चे धान्य दुकानदार 
लंपास करीत असल्याचे निदर्शनात आले.
शहराचा धान्य पुरवठा हा ग्रामीण भागात वितरण होत असल्याचे निदर्शनात आले आहे.शासनाकडून प्रत्येकी व्यक्ती 3 किलो गहू तर 2 किलो तांदूळ देण्यात येते परंतु स्वस्त धान्य दुकानदार हे प्रत्येकी कार्ड मागे 5 ते 10 किलो धान्य ग्राहकाकडून लंपास करून ग्राहकांची लूट करीत आहे.तसेच जालना शहरातील दुकान नंबर 44 चा धान्य हतवन येथील दुकान नंबर 157 मध्ये या धान्याची काळ्या बाजाराने विक्री होत असल्याची बाब लक्षात आली असता या दुकानदाराला जालना तालुका पुरवठा अधिकारी राजमनी यांच्या समोर हजर करण्यात आले.हा काळ्या बाजाराची त्याच्या समोर उघड झाला आहे.देश भरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे यामुळे देशभरात लोकडाऊन करून सचारबंदी लादण्यात आली आहे.यासाठी गरिबांचे हाल होऊ नये त्यांना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. अन्नधान्य हा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विविध संघटना हे गोर गरिबांसाठी जेवण अन्नधान्य हे मोफत पुरवठा करत आहे.आणि दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानदार याचा गैरफायदा घेत आपली घरे भरत आहे.गोरगरीब जनतेची पिळवणूक करीत आहे.याला शासनाने कुठेतरी आळा घालावा नसता गरीब जनतेवर उपासमारीची वेळ येईल.जालना तालुका पुरवठा अधिकारी राजमनी यांनी असं जर कुठे आढळून आल्यास याची तक्रार करावी जेणे करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असल्याचे त्यांनी सांगितले.पुढे बोलताना राजमनी म्हणाले की,मे व जुनचा पुरवठा हा रास्त भावानेच होईल तोही उद्यापासून त्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे त्यात तांदूळ हे शासनाकडून मोफत देण्यात येणार आहे त्याचे कोणतेच पैसे घेण्यात येणार नाही ते मोफत देण्यात येईल.जर कोणी दुकानदार त्याचे पैसे लादत असेलतर त्याची तक्रार करावी त्याच ठिकाणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
             साध्या पद्द्तीने महात्मा फुले जयंती साजरी करवी.

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- महात्मा ज्योतिबा फुले यांची सार्वाजानिक जयंती 11एप्रलि रोजी असुन ती आपल्या घरातच कुटूंबासोबत साजरी करावी, 
असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुका अध्यक्ष संजय गिराम यांनी केले आहे. देशावर कोरोनाचे संकट आहे. सर्वांनी घरातच फोटोची पुजा करावी.सध्या जगावर कोरोना सारख्या माहामारीचे संकट आहे आणी हजारो लोक म्रुत्यु मुखी पडले आणी हजारो लोकांना याची लागन झालेली आहे हीच परिस्थिती लक्षात घेता भारतात सुध्दा 14 एप्रिल पर्यंत संचार बंदी घालण्यात आली आहे . महात्मा जोतिबा फुले यांची जयंती घरातच साजरी करावी व सरकार ला सहकार्य करावे असे महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुका अध्यक्ष संजय गिराम यांनी सांगितले.

             पोलीसांनी तयार केली सॅनिटायझर व्हॅन
             पोलिसांसाठी देखील सॅनिटायझर व्हॅन!
पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निर्मिती
जालना,प्रतिनिधी :- जीव धोक्यात घालून 
ही रक्षण करणाऱ्या पोलीसांचे संरक्षण व्हावे म्हणून जालना पोलीसांनी सॅनिटायझर व्हॅनची निर्मिती केली आहे. एका पोलीस व्हॅनचे रुपांतर सॅनिटायझर व्हॅनमध्ये केले असून कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसाठी या व्हॅनमधून सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेकडून या व्हॅन ची निर्मिती करण्यात आली आहे.कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना एका प्रकारे सुरक्षा कवच मिळाले आहे.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही व्हॅन तयार केली आहे. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, प्रशांत महाजन आणि बिनतारी संदेश यंत्रणेचे पोलीस निरीक्षक संजय व्यास या तिघांच्या प्रयत्नांमधून ही व्हॅन तयार झाली आहे.व्हॅनच्या आतमधील सर्व बाजू प्लास्टिकने बंद करुन शेती आणि यंत्र अन्य कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्पिंकलरच्या साह्याने यांमधून सॅनिटाझरची शरीरावर फवारणी होते. शहरातील सर्व भागांमध्ये फिरून त्याठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांसाठी ही व्हॅन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जिल्हा विशेष शाखेने केलेल्या या उपक्रमाबद्दल पोलीस प्रशासनातून त्यांचे कौतुकही होत आहे. अतिरीक्त पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी बोलताना या व्हॅनची माहिती दिली.

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

          धर्माबाद नगर परिषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व  सीमा बंद; बाहेरच्यांना लोकांना शहरात नो एन्ट्री
धर्माबाद( भगवान कांबळे) :-कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस स्टेशन 
व नगर परिषद च्या वतीने धर्माबाद शहर आता शिल करण्यात आले  आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत तालुक्यात व शहरात येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, या लोकांमळे हा आजार आपल्या शहरात व तालुक्यात  पसरू शकतो या भीतीने काही गावांनी आपल्या सीमा बंद करुन घेतल्या आहेत. यापूर्वीच म्हणजे सोमवारी सरकारने राज्यात संचारबंदीसह जिल्ह्यातील सीमाही बंद केल्या आहेत. त्यामुळे अनेकजण जिल्ह्यात अकडून पडलेत. तर, गावकऱ्यांनीही सीमा बंद केल्याने गावातही जाताना अडचण येत आहे. दरम्यान, गावाकडे आलेल्या नागरिकांशी सौजन्यावे वागण्याचं आवाहन धर्माबाद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे  यांनी केलं आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी दिसलेले चित्र हे चिंता वाढवणारे असेच होते. कारण, मोठ्या प्रमाणात नागरीक घराबाहेर पडले होते. बाईक, कार, रिक्षा यांची संख्या देखील रस्त्यावर मोठी होती. त्यामुळे रविवारी कमावलं के सोमवारी गमावलं असे हे चित्र होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला. सोबतच जिल्ह्यातील सीमाही ऐकमेकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. यातून अत्यावश्यक सेवा वगळ्यात आल्या आहेत.
                      तालुक्यातील काही गावतही सीमाबंदी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून धर्माबाद  तालुक्यातील ब-याच  गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी गावकऱ्यांच्या बैठकीत झाला आहे.  राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. घरा बाहेर न जाणे, सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या जात आहेत. या शिवाय गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सुचनाही दिल्या जात आहेत.
    करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात थांबावे, यासाठी      धर्माबाद  पोलिसांच्या वतीने परिसरात रूट मार्चद्वारे आवाहन
धर्माबाद(भगवान कांबळे):- महाराष्ट्रापुढे कोरोना व्हायरसचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात 
करण्यासाठी डॉक्टर, पोलीस आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहे.  करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात थांबावे, यासाठी धर्माबाद  पोलिसांच्या वतीने शहर परिसरात रूट मार्चद्वारे आवाहन करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी सूनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली धर्माबाद  पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे यांच्या आदेशानुसार  पोलिस  स्थानकापासून ते  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक फूलेनगर , साठेनगर, रामनगर, मेनरोड बाळापूर रत्नाळी मौलाली नगर  या प्रमुख मार्गावर सहाय्यक पोलिस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे,  अनिल सन्नगले, यांसह ३० पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांचा एकत्रित रूट मार्च विविध भागांतून पार पडला.

            !! काय केलस कोरोंना......भूक घरी बसु देत नाही !!                                   सरकार घराबाहेर निघू देत नाही !
देशाची संवाद साधायची बातमी येते तेव्हा मनामध्ये धस करते. कारण देशातील नागरिकांनी धसकाच घेतलाय .देशवासियांना याचा पूर्वानुभव आहेच. संपूर्ण जग कोरोना.नावाच्या
भयानक वायरस चा सामना करण्यासाठी आपल्या देशातील आरोग्य सेवेचा आढावा घेऊन.पूर्वतयारी करत असताना. आपल्या देशाचे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मात्र  आपल्याच धुंदीत होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. आपल्या देशांमध्ये पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हा प्रधानमंत्री .नमस्ते ट्रम्प. आणि मध्यप्रदेशच्या  प्रदेश सरकारच्या घडामोडींमध्ये व्यस्त होते. त्यांच्या अगोदर राज्य सरकारांनी. आपल्या  राज्यात खबरदारीचा उपाय करत असताना .चहूबाजूने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली. तेव्हा त्यांना अचानक देशातील नागरिकांना संवाद साधण्याची आठवण आली. पहिल्याच संवादामध्ये त्यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू. स्वतःहून पाळण्याचे आव्हान देशवासीयांना केले. तेव्हा कुठे त्यांना डॉक्टर. नर्स .पोलीस .सफाई कामगार. आपल्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस लढत असल्याचे दिसले. या सर्वांचं मनोबल वाढवण्यासाठी. व आभार व्यक्त करण्यासाठी. संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी. आपल्या घरासमोर दारात येऊन टाळी आणि थाळी वाजवून यांचे आभार मानावे असे आव्हान केले. बहुतांशी देशातील जनता कुठलीही शंका न घेता मोठ्या प्रमाणावर याच्यावर अमल केली. टाळी थाळी वाजवून काही होणार नाही. माहित असून सुद्धा. मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. ते या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व बंधू भगिनींन च मनोबल वाढवणे साठीच. आपण जे आव्हान केलं. त्याला जनता प्रतिसाद देते.म्हणून कसलीही  पूर्वतयारी न करता अचानक 21 दिवसाचे लॉक डाऊन जाहीर केले. झालं असं अन्नधान्य यांचा तुटवडा पडतो की काय. या भीतीपोटी लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी तुंबळ गर्दी केली. आपापल्या कुवतीप्रमाणे खरेदी करून साठवले. दुसरीकडे मजूर वर्ग चिंतेत पडला. रोज काम केल्याशिवाय चूल पेटत नाही. अशांची संख्या लाखोंच्या घरात जाते. त्याच बरोबर ज्यांचं पोट भिक्षेवर अवलंबून आहे. त्यांची तर कल्पनाच केलेली बरी. डोंबारी समाज .रस्त्यावर खेळ मांडून .आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालून. लोकांचं मनोरंजन करतो. त्यावर मिळालेल्या पैशावर पोट भरतो. पारधी समाज. रस्त्यावर खेळणी लहान सहान  वस्तूंची विक्री करून आपली भूक भागवतो. मांगारूडी समाज .म्हशी भादरने. जनावरांची सिंग कापणे. करून आपलं घर चालवतो .डक्कलवार समाज . भिक्षेवर अवलंबून असतो. त्याच बरोबर बुर बर् पोचंमा. असो किंवा गोसावी डौरी गोसावी असो.हा  सर्व समाज आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर भिक्षा मागूनच जगतो. या सर्वावर उपासमारीची वेळ आली. त्यांच्याकडे  कुणाचेच लक्ष नाही. नेत्यांचे लक्ष भविष्यात आपल्या कामी येणार याकडे .शासकीय अधिकाऱ्यांचे त्यांचं  लक्ष जाईल तिथेच .अशी अवस्था दिसून येते. शासन सांगते कोणीच उपाशी झोपणार नाही. इकडे मजुरांना व गरिबांना काहीच मिळत नाही. प्रश्न असा की खाते कोण?
आठ एप्रिल रोजी धानुरे. ता. खेड. जिल्हा .पुणे येथून मला फोन आला .लातूर विभागातील तीनशेच्या आसपास मजुर  अडकलेत. गावी जाण्यासाठी साधन नाही .घरी भरलेलं राशन  संपत आले. आमच्यावर उपासमारीची वेळ आली. आम्हाला कोणीच मदत करत नाही. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम वावडे. यांनी आपल्या परीने थोडीफार मदत करण्याचा प्रयत्न केला .परंतु तेवढ्यावर कसं भागणार? शासनाची काहीच मदत पोहोचत नाही .असे संगीले. यांची दुसरी अडचण अशी. की यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत. एक वर्षासाठी तात्पुरते रेशन कार्ड दिले होते. परंतु एक वर्षानंतर त्याचा सर्वे केला नाही. त्यांना कायमची रेशन कार्ड दिले नाहीत .त्यामुळे शासनाचे रीतसर अन्नपुरवठा दुकान आहेत. तिथून यांना रेशन मिळत नाही. म्हणून त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली. शासन व्यवस्था असंच काम करत राहिली. तर कोरोना  पेक्षा जास्त लोक अन्न अन्न करुन तडफडून मरतील. ही वेळ येऊ द्यायची नसेल  तर सरकारला आपल्या कामाची गती वाढवावी लागेल. अन्न व नागरी पुरवठा. संबंधित जिल्हा अधिकारी. प्रांत अधिकारी. गाव पातळीवरील कर्मचारी .या सर्वांच्या संगनमताने. योजनाबद्ध पद्धतीने गरजू उपाशीपोटी झोपणाऱ्या पर्यंत. अन्न धान्य तातडीने  पोहोचवले पाहिजे. याच बरोबर  आदिवासी समाजाची. सुद्धा अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आगोदरच कुपोषणामुळे  रोज हजारो बालकांचा मृत्यू होतो .अशा महामारी च्या वेळी तर परिस्थिती आणखीन भयानक होऊ शकते. म्हणून त्यांच्याकडे विशेष  लक्ष देण्याची गरज वाटते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे. आरोग्य मंत्री आदरणीय राजेश टोपे .आदरणीय गृहमंत्री अनील देशमुख .आणि त्यांचे सर्व मंत्रिमंडळ .डोळ्यात तेल घालून 24 तास या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. खूप चांगलं काम करत आहेत. किती रुग्ण वाढले. किती रुग्ण बरे झाले .किती रुग्ण दगावले.डॉक्टर .नर्सेस. सफाई कर्मचारी.यांच्या सुरक्षेसाठी काय काय उपाययोजना केली. तपासणी केंद्र किती वाढवले. सरकार याविषयी किती संवेदनशील आहे .तपशीलवार माहिती महाराष्ट्राला देत आहेत. परंतु एवढ्यावर भागणार नाही. हे सुद्धा तेवढेच खरे. गोरगरीब वंचित बेसहारा लोकांना वेळेवर अन्नधान्य पोहोचलं नाही. तर पुढील काळामध्ये भयंकर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल. ज्या पद्धतीने माध्यमे कवर करत आहेत. त्यावरून असे दिसते की मजूर गरीब सर्वहारा समाजाचं यांना काहीच पडलेले नाही .किती गरिबांपर्यंत अन्नधान्य गेलं अडकलेल्या मजुरांची काय  अवस्था. याची बातमी ना वाचायला मिळते ना बघायला मिळते .फक्त शासनाने कोरोना विषयी .जी माहिती दिली जाते त्याच बातम्या वारंवार दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून वास्तव समोर येत नाही. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. म्हणतात माणूस कोणत्याही परिस्थितीत जगलाच पाहिजे. अन्न व नागरी पुरवठा संबंधित जिल्हा अधिकारी प्रांत अधिकारी गाव पातळीवरील अधिकारी कर्मचारी यांना एवढीच विनंती .या संकट काळी.कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही मार्गाने यांना जगवा. कारण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी  या कष्टकरी वंचित समूहाचा सिंहाचा वाटा आहे. शेवटी या गरीब व बेसहारा समूहाला जगवण्याची शासन व समाज.या सर्वांची जबाबदारी आहे. माणूस हा जगलाच पाहिजे. आता या गरीब वंचित कष्टकरी समूहावर असं

  म्हणायची वेळ आली आहे...काय केलंस कोरोना....भूक घरात               बसू देत नाही.. सरकार घराबाहेर निघू देत नाही.
                       ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
                       सुभाष हणमंते./संपादक.चार्वाक                                                   दर्शन.मुंबई.मो.नो.9987788692


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...