गुरुवार, २३ एप्रिल, २०२०


नळविहीरा गावात वाढला नशेली पदार्थ विक्री चा धुमाकुळ
जाफराबाद,प्रतिनिधी:- जाफराबाद नळविहीरा गावामध्ये जि. प. शाळेसमोर  दुकानामध्ये नसेली पदार्थ 
सर्वात जास्त प्रमाणात विकल्या जात आहे.यामुळे शाळेतील लहान मुलांना यावर परिणाम दिसून येत आहे याकडे शालेय शिक्षण समिती सदस्य काना डोळा करत आहेत. या दुकानामध्ये नसेली पदार्थ  तंबाखू गुटखा बार मावा पेट्रोल यादी नसेली पदार्थ विकल्या जातात. तर दुसरीकडे याच गावामध्ये जुगार खेळायला ५ ते६  गावचे लोक येत असतात. यामुळे कोरोना भिती  पोटी गावामधील नागरीकांना हिताचे वातावरण पसरले आहे.या गावाच्या शिवारात गावरान दारु सुध्दा मिळते. यामुळे गावातील महीलांना चितां जनक  होत आहे  . या संबंधी  आम्ही विचारपुस  केली असता ग्रामपंचायत कोणतेही कारवाई करायला तयार नाही.याकडे पोलीस प्रशासनाने सक्त प्रमानावर कारवाई करण्याची गरज आहे.

घरपोच किराणा वाटपाचा शुभारंभ : गरजवंतांसाठी शिवसेना ठरली " आधारवड "
शिवसेना प्रमुखांचे संस्कार कृतीतून जोपासण्याचा प्रयत्न - माजी मंत्री अर्जुनराव  खोतकर
 जालना ( प्रतिनिधी) :-कोरोना महामारीस रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असलेल्या गोर- गरीब, मजूर, कामगार, श्रमजीवी कुटूंबियांसमोर जगण्याची भ्रांत पडली असतांना " संकटं तिथे मदतीला शिवसेना " हे ब्रीद सार्थ ठरवत सर्व प्रथम जालना शहर व जिल्हाभरात शिवसेना पक्ष गरजवंतांना मदतीसाठी धावून आला आहे.
मुंबई येथील कोरोना ग्रस्तांना मदत, पहिल्या टप्प्यात जनजागृती, घरपोच भोजनाची पाकीटे, भाजीपाला वितरित करत माणसे जगविण्यासाठी सुरू असलेल्या सेवा यज्ञात शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मोठा समिधा वाहिला असून आता घरपोच किराणा साहित्य मिळणार असल्याने  गरजवंतांसाठी शिवसेना मोठी आधार वड ठरली आहे. तथापि " गरज पडेल तिथे मदतीचा हात सदैव पुढे करा " ही शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण प्रत्यक्ष कृतीत जोपासून मदतीचा अल्पसा प्रयत्न केला असल्याचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
शिवसेनेच्या वतीने हजारो कुटूंबांना सोशल डिस्टन्स चे पालन करून किराणा साहित्य वाटपाचा शुभारंभ गुरूवारी ( ता.२३) भागवताचार्य प.पू.शेष महाराज गोंदीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर राव अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, अनिरूध्द खोतकर, संजय खोतकर, पंडितराव भुतेकर, रावसाहेब राऊत, संतोष मोहिते,शहर प्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त,दीपक रन्नवरे,युवासेना समन्वयक अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, पांडुरंग डोंगरे, हरीहर शिंदे, नगरसेवक विजय पवार,अशोक पवार, निखिल पगारे, संतोष जांगडे, गणेश घुगे, गोपीकिशन गोगडे,संदीप नाईकवाडे, किशोर पांगारकर, संताजी वाघमारे, दादाराव पाचफुले, राम सतकर,शंकर लुंगे, विजय जाधव, जगन्नाथ चव्हाण, आदींची उपस्थिती होती.
माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यावेळी बोलतांना म्हणाले की, एकीकडे राज्याला कोरोना मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रत्येक क्षणास झटत आहेत. लॉकडाऊन मुळे संकटात सापडलेल्यांना मदतीसाठी शासनासोबतच शिवसेना पक्षाकडून युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे. असे खोतकर यांनी नमूद केले. जालना जिल्ह्यात वाडी, वस्ती, तांडे यांसह शहरी भागातील झोपडपट्टया, कामगार, श्रमजीवी व सर्वसामान्य कुटुंब राहत असलेल्या वसाहतींमध्ये मदत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरु असून याच सेवेचा एक भाग म्हणून ही मदत देण्याचा अल्पसा प्रयत्न आहे. असे सांगून सर्व नगरसेवक, शिवसेना, युवा सेना पदाधिकारी यांच्या मार्फत नियोजन बध्द रितीने सोशल डिस्टन्स राखत सदरील मदत वाटप केली जाणार असल्याचे अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले.
या वेळी अंकुश पाचफुले, घनश्याम खाकीवाले, संतोष सलामपुरे, राजेश घोडे, किशोर नरवडे, राजू सलामपुरे, किशोर शिंदे, सुशील भावसार,दीपक वैद्य, संतोष परळकर, दीपक राठोड, संतोष क्षोञीय, भोला कांबळे शिवाजी मुळे यांच्या सह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
गरजूंना जगण्याचे बळ मिळाले : प.पू.शेष महाराज
आजमितीस रोजगार नसल्याने अनेकांसमोर  जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला असतांना सातत्याने समाजकार्यात अग्रेसर असलेल्या माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी माणसे जगविण्यासाठी  मदतीचा हात दिल्याने गरजवंतांना जगण्याचे बळ मिळाले असा विश्वास भागवताचार्य प. पू.शेष महाराज गोंदीकर यांनी व्यक्त केला. विपरीत परिस्थितीत दातृत्वाची ज्योत प्रज्वलित ठेवून अर्जुनराव खोतकर यांनी धर्माचरण जपले असून गरजवंतांचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहतील. असेही शेष महाराज गोंदीकर यांनी सांगितले.
खोतकर यांची सामाजिक बांधिलकी स्फुर्ती देणारी : भास्कर राव अंबेकर
संकट काळात गरजूंना मदतीसाठी सदैव तत्पर असलेले माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी कायमच सामाजिक बांधिलकी ची भूमिका जोपासली असून त्यांचे कार्य सर्व घटकांना स्फुर्ती देणारे आहे. असे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर राव अंबेकर यांनी सांगितले. आज कुठल्याही पदावर नसतांना स्वखर्चाने गरजवंत कुटुंबांना घरपोच किराणा वितरित करण्यासाठी खोतकर यांनी उचललेले पाऊल गरजूंना नवी उर्जा देणारे आहे. असे भास्कर राव अंबेकर यांनी नमूद केले.

पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जालना येथील कोव्हीड हॉस्पीटलसाठी 20 पोर्टेबल व्हेंटीलेटर व पाच हजार मास्क
  जालना,प्रतिनिधी:- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जालना येथील कोव्हीड हॉस्पीटलसाठी यावेळी अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी श्री कडले, सिद्धेवर वाघमोडे आदींची उपस्थिती होती.
सीआरआर फंडातुन 20 पोर्टेबल व्हेंटीलेटर व पाच हजार मास्क उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे सातत्याने प्रयत्नशिल असुन त्यांच्या पुढाकाराने जालना येथे 150 खाटांच्या उभारण्यात आलेल्या कोव्हीड रुग्णालयासाठी क्रश्ना डायग्नोस्टीक प्रा. लिमिटेड, पुणे या कंपनीच्यावतीने सीएसआर फंडातुन एलटीव्ही 950 या बनावटीचे 20 पोर्टेबल व्हेंटीलेटर व पाच हजार मास्क कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्रवण मुथा यांनी आज दि. 23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सुपूर्द केले.

बुधवार, २२ एप्रिल, २०२०


       लाँकडाऊनचा फुल उत्पादक शेतकर्यांना मोठा फटका
सिंधीकाळेगाव,प्रतिनिधी (शाम गिराम):-जगभरात थैमान घातलेल्या कोरोणा विषानुने लाँकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत धार्मिक, सामाजिक 
कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका फुल उत्पादकांना बसला आहे. जालना तालुक्यातील पिरकल्याण येथील शेतकरी अक्षय शिंदे यांनी शेतामध्ये गुलछडी, गलांडा आदी फुल पिकांची चार महिन्यापुर्वी लागवड केली होती माञ फुले विक्रिस आली आणि कोरोनामुळे संचार बंदी लागु झाली त्यामुळे फुल शेती करणार्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. फुलशेतीवर केलेला खर्चही निघणे मुश्किल झाले, असुन व्यापारीही येत नसल्याने फुल उत्पादक शेतकर्यांची चिंता वाढली. रोज कमीत कमी 20 ते 25 किलो माल वाया जात आहे.  लॉकडाउन असल्यामुळे फुल मार्केट पूर्णपणे बंद आहे शेतकऱ्यांचे फुल शेतातच सडत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढलं आहे .

प्रतिक्रिया (अक्षय शिंदे)
माझी 20 गुंठे गुलछडी आहे दररोज 15 किलोच्या आसपास फुल निघत होते परंतु संचारबंदीमुळे
        
फुल शेतातच सडून जात आहे त्यामुळे माझं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे खरं तर फुल शेतीवर शेतकऱ्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह अवलंबून असतो.फुलमार्केट बंद असल्याने संपूर्ण शेतकरी अधिक आर्थिक अडचणीत सापडला आहे फुलशेती करणार्यांना शेतकऱ्यांना सरकारने काही मदत करायला हवी अशी भावना सर्व सामान्य शेतकऱ्यांची आहे.अशा प्रकारचे फुले फुलली परंतु लाकडाऊनमुळे विक्रिसाठी नेता येत नाही


दुधविक्रेत्यांना सायं 6 ते 8 या वेळेत दुध वाटपासाठी मुभा
जालना,प्रतिनिधी:-  दुधविक्री, फळे व भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, पिठाची गिरणी, कृषि निविष्ठा (बि-बियाणे), खते, किटकनाशके, कृषी औजारे, पेट्रोलपंप 
ही दुकाने सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेतच केवळ अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेच सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असुन या वेळेव्यतिरिक्त दररोज सायंकाळी 6.00 ते 8.00 या वेळेत जिल्ह्यात दुध वाटपासाठी, संकलन केंद्रावर जमा करण्यासाठी दुधविक्रेत्यांना सुट देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी, जालना यांनी कळविले आहे.  तसेच अत्यावश्यक सेवा व त्यासंबंधीची सेवांची गोदामे व त्यातील कर्मचारी यांनाही आदेशातुन सुट देण्यात आली असुन वाहतुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत संबंधितांना पास देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.


परतुर तालुक्यातील मौजे शिरोडा येथील महिला कोरोना बाधित
             महिलेच्या संपर्कातील 41 पैकी 19 व्यक्तीं 
                      विलगणीकरण कक्षात दाखल.
           उर्वरित व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल
                         करण्याची कार्यवाही सुरु
जालना, प्रतिनिधी:- परतुर तालुक्यातील मौजे शिरोडा येथील 39 वर्षीय महिलेच्या स्वॅबचा अहवाल दि. 21 एप्रिल, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला आहे.  महिलेच्या सहवासात 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 8, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 273 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 1, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -303, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-37, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 71, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 116 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 303 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-49,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-16, पोलीस प्रशिक्षण केंद्र-98, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 325 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 59 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 402 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडस प्रकल्प यांच्या नियोजनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातुन शहरातील गरजू व्यक्तींना आजपर्यंत 2 लाख 78 हजार 186 फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहे.
B मौजे शिरोडा येथील महिलेस दि. 13 एप्रिल,2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे खोकला व ताप या आजाराचा जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 805 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 71 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 486 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 23 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 567 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने 01 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 02 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 532, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 94, एकुण प्रलंबित नमुने-27 तर एकुण 415 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.टाऊन हॉल परिसरातील एक 55 वर्षीय महिला न्युमोनिया व मधुमेह आजारानेग्रस्त आहेत.वाटुर ता. परतुर येथील 34 वर्षीय पुरुष, रोषनगाव ता. बदनापुर येथील 21 वर्षीय तरुण, लालबहादुरशास्त्री महाविद्यालय परिसर, परतुर येथील 75 वर्षीय पुरुष हे न्युमोनियानेग्रस्त असुन अंबड येथील 60 वर्षीय पुरुष रुग्ण क्षयरोगग्रस्त असुन जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल आहेत.  या सर्व रुग्णांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आलेले असुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
सामान्य रुग्णालय, जालना येथे दु:खी नगर येथील कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असुन या महिलेचे तीन स्वॅबचे नमुने पॉझिटीव्ह प्राप्त झाले होते मात्र दि. 21 एप्रिल रोजी स्वॅबचा नमुना निगेटीव्ह आला असुन पाचवा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असुन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. सदरील महिलेला 6 एप्रिलपासुन ताप व खोकला होता.6 एप्रिल रोजी महिलेने परतुर व 10 ते 13 एप्रिल दरम्यान जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते.  जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल झाल्यास दि. 13 एप्रिल रोजी महिलेच्या स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.  दि. 14 एप्रिल रोजी त्याचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला. महिलेचा दुसऱ्यांदा स्वॅबचा नमुना 20 एप्रिल रोजी पाठविण्यात आला होता.  त्याचा अहवाल दि.21 एप्रिल, 2020 रोजी रात्री 10.00 वाजता पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे. महिला ही न्युमोनिया आजाराने ग्रस्त असुन महिलेची प्रकृती स्थिर आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्या पथकाने शिरोडा ता. परतूर येथे भेट देऊन तालुका आरोग्य अधिकारी, रतुर यांना कंटेन्टमेंट प्लॅनच्या अनुषंगाने सुचना देऊन महिलेच्या संपर्कात आलेल्या सहवासितांच्या पाठपुराव्यासाठी वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश असलेली दोन पथके  तयार करण्यात आली असुन  80 कुटूंबातील 560 लोकांचे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे.
49 व्यक्ती आल्या असुन यात 8 व्यक्ती हायरिस्क तर 41 लोरिस्क संपर्कातल्या असुन त्यापैकी 19 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असुन स्वॅब तपासणी व उर्वरित संपर्कातील व्यक्तींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु  असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.


सिंधीकाळेगाव :-जालना तालुक्यातील सेलगांव येथे  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शेलगावचे सरपंच श्री धोंडीराम फकिरा पवार यांनी शेलगाव येथील सर्व गरजू नागरिकांना 50 कुंटल  अन्नधान्याचे वाटप केले गरजुवताना कही तरी मदत करावा म्हनुण गहु वाटप केले ह्या वेळी उपस्थित योगेश जाधव राहुल पवार रोहित पवार सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...