बुधवार, २४ जून, २०२०

मौजे निरखेडा येथील सोयाबीन पेरलेल्या शेतीची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडून पाहणी




जालना,ब्युरोचीफ :- खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली. पेरणीनंतर काही गावातील बियाणांची उगवण होत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जालना तालुक्यातील मौजे निरखेडा येथील श्री जाधव या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन महाबीजकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्याची कमी पेरणी झालेल्या क्षेत्राची पहाणी करुन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी श्री गाडे, मोहीम अधिकारी श्री कराड, मंडळ कृषी अधिकारी श्री सुखदेवे, कृषी सहाय्यक श्रीमती कुलकर्णी व गावातील शेतकरी उपस्थित होते.


रांजणी परिसरात सोयाबीनच्या पेरणीला आला वेग, शेतक-यांची आधुनिक यंत्रांना पसंती


रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात सोयाबीनच्या पेरणीला वेग आला असून शेतकरी वर्ग पेरणीसाठी जुन्या तिफन व फराटा ऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आधुनिक पध्दतीने पेरणी करताना दिसत आहे. त्यामुळे आधुनिकतेचा शेती कामावर देखील प्रभाव पडत असल्याचे दिसत आहे.
काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात बैलांच्या सहाय्याने फराट किंवा तिफनने पेरणी केली जायची. त्यामुळे शेतामध्ये आठ ते पंधरा दिवस शेतक-यांना मुक्काम करावा लागत होता. यामुळे शेतांना एखाद्या गावासारखे स्वरुप येत होते. परंतु माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र आधुनिक परिवर्तन होत आहे. याला शेती सुध्दा अपवाद राहिली नाही. आधुनिकतेच्या या युगात कोणाकडे वेळ नाही. प्रत्येकाला घंटो का काम मिनटो में करण्याची सवय लागली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शेतकरी तिफन ऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात जास्त पावसामुळे शेतीची कामे खोळंबली होती. त्यामुळे सोयाबीनची पेरणी सुध्दा लांबणीवर पडली होती. सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीची कामे आटोपण्याच्या तयारीत असून लवकर पेरणी होण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करताना दिसत आहे.


वीजग्राहकांची प्रचंड लूट, सुलभ हप्त्यांच्या सवलतीचे गाजर - राजेंद्र पातोडे



मुंबई,ब्युरोचीफ :-लॉकडाऊनच्या कालावधीनंतर मीटर रिडींग न घेता सरसकट तींन महिन्याचे वीजबिल ग्राहकांना देऊन त्यांची लूट करण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्ते करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. तथापि ही सवलत नसून शासकीय लूटीला राजाश्रय दिला जात असल्याचे ही त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांची मीटर रिडींग घेण्यात आली नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना सरासरी वीज वापरानुसार बिल देण्यात आले. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात आले. त्यामुळे मार्च ते जून पर्यंतचे रिडींग घेऊन एकूण वीजवापराचे एकत्रित बिल ग्राहकांना देण्यात आले. हे सरासरी बील आकारताना एकूण तीन महिन्याचे बिल एकत्र केल्याने युनिट पाचशेच्यावर जाताच त्याच्या दरात मोठी वाढ करण्यात येत आहे. गृहीत धरा की तीन महिन्याचे सरासरी बिल हे ६६४ युनिट असेल तर त्याला ११. ७१ प्रमाणे आकार लागेल व त्याचे तीन महिन्याचे बिल हे ७७७५ इतके होईल. शिवाय त्या मध्ये इतर चार्ज समाविष्ट केल्यास ती रक्कम ८४०० इतकी होईल. हेच बिल दरमहा आकारले तर ६६४ भागीले तीन महीने केले असता दरमहा  २२१.३३ इतका वीज वापर होतो. त्याचा वीज दर २२१.३३ x ७. ५० पैसे केला तर हे बिल १६५९. ७५ होईल व दरमहा  १६५९.९७ प्रमाणे वीज बिल असल्यास तीन महिन्याचे ४९७९.९२ इतके वीज बिल येईल. परंतु महावितरणने हे सरासरी बिल देताना ८४०० इतके दिले आहे. कारण एकत्रित बिलामुळे वीज आकारात वाढ झाली आहे. वीज बिल आकारणी करताना घरगुती वीज ग्राहकास १०० युनिट पर्यंतचा दर हा २,५७ पैसे अधिक इंधन समायोजन आकार घेतला जातो. १०० ते ३०० युनिट पुढे ४,५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार लावला जातो.३०० ते ५०० युनिटचा ६,५१ पैसे तर  ५०१ ते १००० युनिट पर्यंत ७,५५ पैसे आणि १००० युनिट पुढे हा आकार ७,८१ पैसे आहे.
ही दर आकारणी पाहता दरमहा १०० ते ३०० युनिट साठी ४,५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार असलेल्या ग्राहकांना सरासरी बिलामूळे ५०० युनिट पेक्षा अधिकचा ७,५५ पैसे दर लावण्यात आला आहे. त्यामुळे वीज बिलात जवळ जवळ दुप्पटीने वाढ झाली आहे. हा ग्राहकाच्या खिश्यावर टाकलेला सरकारी दरोडा आहे. ही महावितरणची मनमानी असल्याचे राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.
एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्याचे तसेच ग्राहकांनी एप्रिल व मे मध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येईल, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले.परंतु वीज बिल न भरता ही दुरुस्ती होणार नाही. त्यामुळे दिलेल्या रकमेच्या अवाजवी वीज बिलाचा भरणा ग्राहकाला करावा लागेल. सोबतच बिल कमी करण्यासाठी किंवा दुरुस्त्यासाठी वीज कार्यालयाच्या फे-या माराव्या लागतील.
महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही, असे ऊर्जामंत्री सांगत असले तरी  जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या सरासरी युनिट प्रमाणे दिले आहे. त्यामध्ये ग्राहकांना लुटण्यात येत आहे.सबब वीज ग्राहकांनी ही अवास्तव वीज बिलाचा भरणा करू नये. https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन आपल्या रीडिंगची तपासणी करावी व सरासरी बिल न घेता दरमहा बिल (तीन स्वतंत्र बिल) घेऊनच वीज बिलाचा भरणा करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.


कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात अपुऱ्या सुविधांमुळे,वंचितने अधिकाऱ्यांना धरले धारेवर


कल्याण,ब्युरोचीफ :- अपुऱ्या सुविधांमुळे कल्याणच्या रुक्मिणी रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला होता. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून रुक्मिणी रुग्णालयात वेंटिलेटर व बेडची संख्या वाढवावी, खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वाढ तयार करण्यात यावा, टेस्ट लॅबची संख्या वाढविण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे विभागाच्यावतीने कल्याण-डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आरोग्याच्या गैरसोयींमुळे सामान्य व्यक्तींचे अतोनात हाल होत आहे. कल्याणच्या रुक्मिणी रूग्णालयात व्हेंटिलेटर व बेड उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रुक्मिणी रुग्णालयात बेड व व्हेंटिलेटर वाढविण्यात यावे, खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वार्ड तयार करावा. कोविडच्या टेस्टसाठी लॅब वाढवाव्यात.  पालिका रुग्णालयात कर्मचारी व  रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्यात यावी. या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे महिला जिल्हाध्यक्ष माया कांबळे, नितीन वानखेडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हुंबरे यांच्यावतीने कल्याण-डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले.


कोकणवासीयांना तात्काळ मदत करावी - प्रकाश आंबेडकर


आपत्तीग्रस्तांना 'वंचित'च्यावतीने अन्नधान्य, कपड्यांचे वाटप !

*रायगड,ब्युरोचीफ :-*  निसर्ग वादळामुळे कोकणवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून फळबाग, घरे तसेच शाळांना त्याचा मोठा फटका बसला आहे. शासनाने यांना मदतीचा हात पुढे केला असला तरी अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. या ठिकाणी त्यांनी अनेक कुटुंबांना आज गरजेच्या वस्तूंची मदत केली. शिवाय येत्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर गरजेच्या वस्तू, अन्न धान्याचे वाटप देखील करण्यात येणार आहे.'निसर्ग' वादळाने कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज मंडणगड तालुक्यात आले होते. सुपारी आंबा-काजू या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच हजारो घरांचे छप्पर उडून गेले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. शाळा तसेच महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागात अद्यापही वीज प्रवाह सुरळीत झालेला नाही. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही झाला आहे.
कोकणात गुंठा पद्धत असून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकरी आणि हेक्‍टरी नुकसान भरपाई देण्याची पद्धत आहे ही पद्धत या ठिकाणी अंमलात आणू नये, गुंठा पद्धतीनेच नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ज्या घरांचे नुकसान झाले आहे ते सरसकट न देता प्रत्येक घरांचे किती नुकसान झाले आहे ते पाहून नुकसान भरपाई देण्यात यावी, जेणे करून ते त्यांच्या पायावर उभे राहतील. अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी शासनाला केली आहे. हे सरकार कोकणवासीयांवर उभे असून कोकणातील लोकांनी पहिल्यांदाच मदत मागितली आहे. सेना त्यांना पूर्णपणे मदत करेल अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. महाड या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन या पाहणी दौऱ्याची सविस्तर माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना दिली. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


कापूस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान, अकोला राज्यातील पहिली जिल्हा परिषद


अकोला,ब्युरोचीफ :- अल्पभूधारक सर्वसाधारण शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कपाशी बिजी२ बीटी बियाणे लागवडीसाठी ९० टक्के अनुदान योजनेला मान्यता देण्यात आली आहे. अशी योजना मंजूर करणारी अकोला जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव आहे. वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या योजनेबाबत सूचना केल्या होत्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषि अर्थव्यवस्था अडचणीत आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. माणसांचे जीवनमान सर्व शेतीवरच अवलंबून असते. कितीही क्रांती झाली तरी पोटाला लागणारे अन्न जमिनीतून निर्माण होते. त्यासाठी शेतकरी काबाड कष्ट करतो. मात्र समाजाचा व शासनाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था वाईट होत चालली आहे.या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करता, या वर्षी भारतातील कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा यासाठी अकोला जिल्हा परिषदेने अल्पभूधारक, सर्वसाधारण शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे निश्‍चित केले आहे. २०२०-२१ खरीप हंगामात शेतकऱ्यांना कपाशी बिजी २, बीटी बियाणे लागवडीसाठी 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. 90 टक्के अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी अध्यक्ष प्रतिभा भोजने, सभापती पंजाबराव वडाळ, पशुसंवर्धन समिती व गटनेते यांनी सहकार्य केले. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे यांनी दिली.


मंगळवार, २३ जून, २०२०

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के ६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे


मुंबई,ब्युरोचीफ :- कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात  ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ६९ हजार  ६३१ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५०.०९ टक्के एवढे झाले आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख २ हजार ७७५ नमुन्यांपैकी १ लाख ३९ हजार १० नमुने पॉझिटिव्ह (१७.३१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ५ हजार  १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ५७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यापैकी ७५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६९ टक्के एवढा आहे.

गेल्या ४८ तासात नोंद झालेल्या ७५ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-४२, भिवंडी-निजामपूर मनपा-१, धुळे मनपा-१, पुणे-१, पुणे मनपा-८, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर मनपा-१, सातारा-१, सांगली-१, रत्नागिरी-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद-८, अकोला -१, अमरावती मनपा-१,  यवतमाळ-१, बुलढाणा-२ अशाप्रकारे जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (६८,४१०), बरे झालेले रुग्ण- (३४,५७६), मृत्यू- (३८४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,९८२)

ठाणे: बाधित रुग्ण- (२६,५०६), बरे झालेले रुग्ण- (१०,७६६), मृत्यू- (७५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,९८८)

पालघर: बाधित रुग्ण- (३८६६), बरे झालेले रुग्ण- (११५४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६१९)

रायगड: बाधित रुग्ण- (२७१४), बरे झालेले रुग्ण- (१७११), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०८)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५०४), बरे झालेले रुग्ण- (३५२), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (१४४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

पुणे: बाधित रुग्ण- (१६,९०७), बरे झालेले रुग्ण- (९१४२), मृत्यू- (६२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१४१)

सातारा:  बाधित रुग्ण- (८६८), बरे झालेले रुग्ण- (६३२), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५)

सांगली: बाधित रुग्ण- (३०२), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७५०), बरे झालेले रुग्ण- (६९१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२३४५), बरे झालेले रुग्ण- (११७०), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६०)

नाशिक: बाधित रुग्ण- (२९६५), बरे झालेले रुग्ण- (१६२०), मृत्यू- (१७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३००), बरे झालेले रुग्ण- (२२४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)

जळगाव: बाधित रुग्ण- (२४७६), बरे झालेले रुग्ण- (१२६७), मृत्यू- (१८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (८९), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

धुळे: बाधित रुग्ण- (५८७), बरे झालेले रुग्ण- (३५०), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३६८६), बरे झालेले रुग्ण- (१९८२), मृत्यू- (२०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०३)

जालना: बाधित रुग्ण- (३९५), बरे झालेले रुग्ण- (२५९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५)

बीड: बाधित रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)

लातूर: बाधित रुग्ण- (२२७), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५)

परभणी: बाधित रुग्ण- (८५), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५)

नांदेड: बाधित रुग्ण- (२९५), बरे झालेले रुग्ण (१७८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०६)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१८३), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

अमरावती: बाधित रुग्ण- (४६३), बरे झालेले रुग्ण- (३१२), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७)

अकोला: बाधित रुग्ण- (१२७२), बरे झालेले रुग्ण- (७८८), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१७)

वाशिम: बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१७६), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२५१), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१३५२), बरे झालेले रुग्ण- (८९७), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४२)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

भंडारा: बाधित रुग्ण- (७७), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (६०), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६०), बरे झालेले रुग्ण- (४७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (११७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७)

एकूण: बाधित रुग्ण-(१,३९,०१०), बरे झालेले रुग्ण- (६९,६३१), मृत्यू- (६५३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टिव्ह रुग्ण-(६२,८३३)

(टीप-आज राज्यात एकूण नोंदविलेल्या २४८ मृत्यूंपैकी ७५ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १७३ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत आणि १७३ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६५,सोलापूर ४२, औरंगाबाद – १५, ठाणे -१३,  नाशिक -१८, जळगाव -७, अमरावती -१, बुलढाणा -१, कल्याण डोंबिवली -२, मालेगाव -१, मीरा भाईंदर -३, पिंपरी चिंचवड -१, रत्नागिरी -२, सांगली -१, सातारा -१, यांचा समावेश आहे.  हे  १७३ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही माहिती केंद्रसरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...