शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

            पोखरी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
गेवराई ( प्रतिनिधी ) :- गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग केंद्र अंतर्गत असलेल्या पोखरी येथील जिल्हा परिषद शाळा वार्षिक स्नेहसंमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत दि.07  फेब्रुवारी 2020 रोजी उत्साहात संपन्न झाला.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.राजेंद्र मोघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती गेवराई चे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री.मिलिंदजी तारूकमारे साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी प्रमुख
उपस्थिती म्हणून श्री.तालीब साहेब, श्री.खेत्रे सर (मा.अध्यक्ष गेवराई शि.प. स) श्री कुडके सर, श्री. दुधाळ सर,श्री.राठोड सर, श्री.खाडे सर, श्री.चौधरी सर, गावाचे सरपंच बिबीशन मोघे साहेब यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळ्याच्या वेळी श्री.तरूकमारे साहेब यांनी सांगितले की पोखरी गावातील प्रशालेचे विद्यार्थी हे सर्वगुण संपन्न असून भविष्यात ते आपल्या गावाचे नाव लोकिक करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सुमारे 130 विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांचा अधिकार सादर केला. यामध्ये देशभक्तीवर गीत,लावणी, गोंधळ, गीत, बालगीत,शेतकरी गीत, कव्वाली,बांगडा,विनोद, नाटिका,सादर करून उपस्थितांना चार तास मंत्र मुग्ध केले.या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गणेश दहिवाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक श्री. भाऊसाहेब घोंगडे सर, श्री.महेंद्र देशमुख सर, श्रीमती आयेशा पठाण मॅडम, श्रीमती रोहिणी बागडे मॅडम, यांच्यासह केंद्रातील शिक्षक व मित्रपरिवार, सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी शाळेचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवार सर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...