शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०


मनसे ने जालना बस स्थानकात लावले संभाजीनगरचे फलक

जालना ( प्रतिनिधी) : - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औरंगाबाद ऐवजी संभाजी नगर म्हणावे असे जनआंदोलन हाती घेतले असून या आंदोलनाचा एक भाग म्हणून मनसे पदाधिकारी व मनसे सैनिकांनी आज जालना बसस्थानकात  एस. टी. बसेसना संभाजी नगर चे फलक लावले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ( ता. १४)पदाधिकारी व मनसे सैनिक एकञ आले.जालना मध्यवर्ती बसस्थानकात  मनसेचा झेंडा व फलके  हाती घेऊन छञपती शिवाजी महाराज की जय,छञपती संभाजी महाराज की जय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो..औरंगाबाद नको संभाजी नगर म्हणा मराठी ह्रदयसम्राट राज ठाकरे आगे बढो,अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण बसस्थानकाचा परिसर दणाणून सोडला.तसेच औरंगाबाद कडे जाणार्या एस टी बसेस च्या काचांवर जालना ते संभाजी नगर अशी फलके लावली.अचानक झालेल्या या आंदोलनामूळे प्रवाशांची एकच गर्दी झाली. या वेळी मनसे चे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे, शरद पाटील मांगधरे, महेश नागरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संजय राजगूरे, प्रमोद म्हस्के, अजय मोरे, पंकज घोगरे, अमोल जाधव, गणेश धांडे, आकाश जाधव,मयूर बूजाडे,आकाश खरात यांच्या सह पदाधिकारी व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान पक्षातील वरिष्ठांकडून आदेश येताच संभाजी नगर करण्यासाठी जनआंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल असे मनसे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी सांगितले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...