गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद अधिवेशनासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे : मा.सुरेश मुळे व मा.विनायक फुलंब्रीकर

जालना (प्रतिनिधी) :- 22 ते 23  फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10 वा दसरा चौक कोल्हापुर येथे कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन (जलसंपदा मंत्री) मा.जयंत पाटील,( सार्वजनिक बांधकाम मंत्री ), मा.अशोक चव्हाण ( ग्रामविकास मंत्री), मा.हसन मुश्रीफ ( गुहराज्यमंत्री), मा.सतेज उर्फ बटी डी पाटील (वस्त्रोघोग  मंत्री), मा.राजेंद्र पाटील यड्रावकर ( राज्यमंत्री ), मा.अर्जुन खोतकर शिवसेना (माजी राज्यमंत्री),मा.राजु वाघमारे काँग्रेस प्रवक्ता, मा.केशव उपाध्ये भा.ज.पा. प्रवक्ता  ( मिडीया हेड  ),  दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी  8.30 ते 10 शोभायात्रा मंगलधाम ते महाध्दार   रोड मार्ग दसरा चौक 10 ते 1.30 उदृघाटन समारंभ व वेवबाईट उदृघाटन 1.30 ते 2.30  विषय रुढी परंपरा व कालानुरूप बद्दल प. पु अतुलशास्त्री भगरे  दुपारी 3.30 ते 4.30 फळप्रक्रिया उघोग शेती विषयक विजय कुमार चोले पुणे 5 30 ते 6.30 किर्तन  ह भ प वासुदेव बुवा जोशी सायंकाळी 7.ते 9 (सुमधूर गीताचा कार्यक्रम) 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 10 30 चहा नाश्ता 10 30 ते 11 30:बॅकिग व अर्थशास्त्र जयंत काशिनाथ काकतकर सकाळी 11.30 ते 12 30 मोटिव्हेशनल  स्कील डेव्हलपमेट सौ.शुभांगी कुलकर्णी (औरंगाबाद ), 12 : 30 ते 10:30 ब्राह्मण समाजाचे सैन्यदलातील योगदान  मा.अतुलजी अशोक इदुरकर दुपारी 1.30 ते 2.30 भोजन 2 30 ते 4 खुले चर्चा सत्र ठराव विविध संघटनांच्या अध्यक्ष  मनोगत   होनार आहे याअधिवेशनासाठी जास्ती जास्त  संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आतंरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद  अध्यक्ष  मकरंद कुलकर्णी  (कोल्हापूर ), श्री.सुरेश मुळे (जालना),भगवती पुरोहित संघाचे विनायक महाराज फुलंब्रीकर ( जालना),  सचिन वाडे पा  (औरंगाबाद ) आनंद दवे( पुणे ) धनंजय कुलकर्णी ( केज ), विश्वजित देशपांडे पुणे, अंकित काणे (पुणे ), दिनेश कुलकर्णी (सोलापूर), सतीश शुक्ल (नाशिक), यानी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...