गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करणाऱ्या इंदूरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा
सामाजिक कार्यकर्त्या नंदा पवार यांची मागणी
 जालना: आपल्या कीर्तनातून गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करणाऱ्या इंदूरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जालना येथील सामाजिक कार्यकर्त्या नंदा पवार यांनी केली आहे.
      यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नंदा पवार यांनी म्हटले आहे की, निवृत्ती महाराज इंदुरीकर हे आपल्या कीर्तनातून सामाजिक प्रबोधन करतात, त्यांच्या कीर्तनाला लाखो नागरिक आणि महिला उपस्थित असतात,ते आपल्या कीर्तनातून सामाजिक व राजकीय घडामोडीवर विडंबन करतात,त्यातून जनतेचे मनोरंजन होते, मंगळवारी संपन्न झालेल्या इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा व्हिडिओ समाज माध्यमातून फैलावत आहे, इंदूरीकर महाराजांनी कीर्तनातून दिलेल्या सम -विषमच्या सल्ल्यामुळे महिला मंडळीत संताप व्यक्त केला जात आहे.इंदूरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात केली असून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केले आहे.
नंदा पवार
(सामाजीक कार्यकर्त्या)

इंदूरीकर महाराज यांनी केलेले वादग्रस्त आणि अशास्त्रीय विधान हे पुरोगामी महाराष्ट्रातील तमाम महिला वर्ग आणि समाजाचा अपमान करणारे आहे.एकीकडे महाराष्ट्र राज्य महिलांच्या वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे बदनाम होत आहे, महिलांचे सतत अपमान होत आहेत,त्यातच इंदूरीकर महाराजांची भर पडली आहे,आपल्या कीर्तनातून सतत महिला वर्गाची टिंगल करणाऱ्या इंदूरीकर महाराजांनी कीर्तनातून अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे.
  गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करणाऱ्या इंदूरीकर महाराजांनी स्वताला आवरावे, तसेच त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नंदा पवार यांनी केली असून इंदूरीकर महाराजांनी यापुढेही महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले तर त्यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम उधळून लावले जातील,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...