गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०


*आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे साहेब यांची *अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयास रात्री 11 वाजेच्या सुमारास अचानक भेट*
*रुग्णालयाची आरोग्य सेवा सुधारण्यासाठी दिले तातडीचे आदेश*
अंबड : दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री *मा.ना.राजेशभैय्या टोपे*  यांनी प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रात्री 11 वा.उपजिल्हा रुग्णाल अंबड येथे अचानक भेट दिली. तब्बल दोन तास संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करुन रुग्णासोबत संवाद साधला.

यावेळी *मा.ना.राजेशभैय्या टोपे* यांनी उपजिल्हा रुग्नालयाच्या शवविच्छेदन कक्ष, रुग्णालयातील सर्व प्रसाधन कक्ष,वार्ड, प्रसुती कक्ष,आतंररुग्ण,बाह्यरुग्ण, सामान्य रुग्ण वार्डाला भेट देत रुग्णांची व नातेवाईकांशी संवाद साधला. दरम्यान शहरातील एका किडणी च्या आजाराने गंभीर असलेल्या रुग्णास सर्वोतोपरी मदत करण्याबाबत सुचना केल्या. तसेच प्रयोगशाळा, धर्मशाळा, क्ष-किरण,औषधालय, वैद्यकीय अधिकारी निवासस्थाने पाहुन तेथे आवश्यक असलेले यंत्र तसेच दुरुस्तीचे आदेश उपस्थित अभियंता यांना दिले. उपजिल्हा रुग्णालयात तातडीने सोनोग्राफी यंत्र, क्ष-किरण यंत्र, जैविक नमुने तपासणी यंत्र,रुग्णकक्षातील बेड,अत्यावश्यक औषधी तत्रंज्ञ तसेच वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करणेबाबत आरोग्य विभागाला सुचना दिल्या.रुग्णालयाची पाहणी करुन अस्वच्छता आणि परिसर आणि तातडीने स्वच्छ करुन रंगरंगोटी व तांत्रिक दुरुस्ती करण्याचे *ना.राजेशभैया टोपे* यांनी आदेश दिले.
यावेळी शहराध्यक्ष ॲड अफरोज पठाण,गटनेते शिवप्रसाद चांगले,बाळासाहेब नरवडे,कैलास भोरे,ॲड.वसंत गायकवाड,गौतम ढवळे,पाशा पठाण,डॉ.तलवाडकर,डॉ.दोरके आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...