गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

 जालना शहरातील मोती तलाव येथे प्रलंबीत असलेला तथागत गौतम 
बुद्धांचा पुतळा तात्काळ उभरण्यात यावा :- कैलास रत्नपारखे
जालना (प्रतिनिधी) :- शहरातील मोती तलावात येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या भव्य मुर्ती उभारण्याचा प्रलंबीत प्रश्‍न निकाली काढण्यात यावा. अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे कैलास रत्नपारखे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, जालना शहराच्या सौदर्यात भर घालण्यार्‍या मोती तलावाlत हैद्राबाद येथील हुसेन सागरच्या धर्तीवर तथागत गौतम बुद्ध यांची मुर्ती बसवण्याचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे. मोती तलावात तथागत गौतम बुध्दाची मुर्ती स्थापीत करण्यात यावी. यासाठी शहरातील अनुज्ञयाकडुन अनेकदा आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर साधारणताः सन 2005 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी बौध्द अनुज्ञयांच्या तिव्र भावना लक्षात घेवुन नगरपालीकेचे स्थायीसमिती व सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव पास करण्यात आला होता. त्यानंतर हा ठराव पास झाल्यानंतर एक समिती गठीत करण्यात येऊन त्या माध्यमातुन प्रशासकीय पुर्तताकरण्यात आली होती. विशेषत या समितीने अहवाल तयार केला होता. त्यांनतर तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मोतीतलाव परिसरात भेट देऊन पाहणी केली होती, पंरतु त्यांनतर या प्रश्‍नाकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे हा प्रश्‍न अजुनही रेंगाळत पडलेला आहे.मोती तलावात तथागत गौतम बुद्धाची मुर्ती उभारण्याच्या प्रक्रीयेला सुरुवात होऊन मुर्ती बनवीणार्‍या शिल्पकाराला अग्रीम रक्कमही देण्यात आली होती. अजुनही नगरपालीकेने लक्ष दिल्यास या कामांला पुन्हा वेग येऊ शकेल विशेष म्हणजे मोती तलावात तथागत गौतम बुध्दाची मुर्ती उभारल्यास शहराच्या सौदर्यातं मोठी भर पडुन एक पर्यटन स्थळ म्हणुन नावारुपाला आल्या शिवाय राहणार नाही. सदरचा प्रश्‍न हा बौध्द अनुयायांच्या व इतर नागरीकांच्या भावनेशी निगडीत असल्यामुळे तो तात्काळ सोडविण्यात यावा. अन्यथा वंचीतबहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही शेवटी निवेदनात दिला आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष दीपक डोके शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे, जिल्हा सचिव विनोद दांडगे, सचिन कांबळे, गौतम म्हस्के, अर्जुन जाधव, किशोर जाधव, राजेंद्र पारखे, महेंद्रसींग हजारी, राजु गवई, धर्मेश कणसे, मनोज म्हस्के यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...