मंगळवार, १७ मार्च, २०२०

दोन हजार रुपये ची लाच घेताना तलाठी अँन्टी करप्शनच्या        जाळ्यात
जालना/ प्रतिनीधी :-  दोन हजार रूपयाची लाच घेताना
तलाठी व एक खासगी ईसम लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकले
याबाबतीत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी दिनांक 16.03.2020 रोजी तक्रार दिली की, माझे सासूचे वारसा हक्क नोंद करणेसाठी व 6 क देण्यासाठी कोसगाव सज्जा येथील तलाठी अतुल सर्जेराय बोर्डे यांनी 3,000/-रूपयांची लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली. सदर तक्रारीयरून आज दिनांक 16.03.2020 रोजी सापळा लावला असता, लोकसेवक यांनी तक्रारदार यांना 3,000/- रुपये लाचेची मागणी केली व तडजोडीअंती2,000/- रुपये स्वीकारण्यास तयार होवून लोकसेयक श्री अतुल सर्जेराय बोर्डे वय 42 वर्ष व्यवसाय नोकरी तलाठी, सज्जाको सगाय ता. भोकरदन रा. वरुड (बु.) ता जाफ्राबाद जि. जालना यांनी त्यांचे सोबतचे खाजगी इसम नामे श्री. विलास सांडुआगळे यांचे हस्ते पंचासमक्ष 2,000/- रुपये लाच स्वीकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाप थकाने भोकरदन - जाफ्राबाद रोडवरील तलाठी कार्यालयात माहोरा ता. जाफ्राबाद येथे रंगेहाथ पकडण्यात आले.लोकसेवक श्री अतुल सर्जेराव बोर्डे व संगणक आॕपरेटर श्री विलास सांडु आगळे दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालु आहे.सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अरविंद चावरीया, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अनिता जमादार,ला.प्र.विभाग औरंगाबाद, पोलीस उप अधिक्षक श्री.रविंद्र डी.निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संग्राम शिवाजी ताटे, पोलीस निरीक्षक, एस.एस.शेख तसेच कर्मचारी श्री.मनोहर खंडागळे, श्री. अनिल सानप, श्री.आत्माराम डोईफोडे, श्री. ज्ञानेश्वर म्हस्के, श्री.सचिन राऊत, श्री. शिवाजी जमधडे, श्री. कृष्णा देठे, श्री गजानन कांबळे,श्री गणेश चेके, श्री गणेश बुजाडे, श्री जावेद शेख, श्री प्रवीण खंदारे, श्री आरिफ शेख यांनी पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...