मंगळवार, १७ मार्च, २०२०

जालना शहरातील मदरसा अरबियाफैजुलउलुम,चंदनझिरा येथे "मदरसा परिचय"कार्यक्रम संपन्न.
जालना प्रतिनिधी :-या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.अब्दुल मजिद,प्रमुख पाहुणे जेआयएचचे सय्यद शाकेर, मा.नगरसेवक
सतीष दादा जाधव, ओम क्लिनिक हॉस्पीटचे डॉ.वसंत टकले, डॉ.भागवत काळे, डॉ.गजेंद्र मगर, शांतीलाल राऊत, जीवनराव केंढे,संपतराज जांगीड,राहुल मुंढे, सुभाष पारे, बाबुलाल मोरवाल, रमेश कवडे ई. मान्यवर उपस्थिती होते.सर्वप्रथम मदरशाचा परिचय देतांना मौलाना अब्दुल रऊफ म्हणाले, सर्वांसोबत न्याय करणे व अन्यायाविरूद्ध उभे राहणे ही शिकवण विद्यार्थ्यांस दिली जाते. देशाच्या रक्षणासाठी न्याय,सुरळीत अर्थव्यवस्था, शांती यांची आवश्यकता असते. समाज सुधारण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचेसुधारणे आवश्यक असते. देशाच्या विकासासाठी देशातील काही भ्रष्टाचार लोकांनी भारत देशाला चुना लावून विदेशात पळून गेलेत. यामुळे भ्रष्टाचार थांबविण्याची गरज आहे. मदरश्यातील विद्यार्थी हे वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण मिळते. देश बांधवांना मदत करणे व इतरांशी चांगले वागणे, कोणावरही अत्याचार न करणे व कोणाला अत्याचार करू न देणे, जगातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांचे भाऊ आहेत. कारण जगातील पहिल्या जोडप्यापासूनच (आदम आणि हव्वा)सर्व मानव जातीची वेल वाढत आली आहे अशी महिती मौलाना अब्दुल रऊफ यांनी दिली.यापुढे चंदनझि-याचे मा. नगरसेवक सतिष जाधव (दादा) यांनी आपले मत मांडतांना सांगितले की, प्रत्येक धर्म ही शांततेची शिकवण देते. आपआपसातील संवादाच्या कमतरतेमुळे जो दुरावा निर्माण झाला आहे तो कमी करण्याची गरज आहे. संघटीत होऊन भारताच्या विकासासाठी हातभार लावण्याची गरज आहे.यावेळी डाॕ. भागवत काळे सर,राहूल मुंढे सर, शांतीलालजी राऊत ई. मान्यवराःनी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नौशाद उस्मान साहेब यांनी समाजामध्ये सद्भावना जोपासणे हा फार मोठा उद्देश मदरश्याचा आहे. तसेच शांतता समितीत सहभाग घेणे हे इमामचे कार्य असते. खरा अध्यात्मिक मनुष्य हा धर्मसहिष्णु असतो.धर्म प्रचारक व्यक्ती धर्म सहिष्णु असतो. तो दंगली करू शकत नाही. मग तो कोणत्याही धर्माचा प्रचारक असो. पुढे ते म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी उलमा व्यक्तीनी कठोर परिश्रम घेतले व इंग्रजांकडून त्यांचे मृतदेह झाडांवर लटकविण्यात आले हे मदरश्यातील लोक होते.धर्माला दहशतवादाशी जोडणे अत्यंत चुकीचे आहे. पुढे भाषण करतांना नौशाद साहेब म्हणाले की, मदरशाला दहशतवाद व आंतकवादाशी जोडणे फार चुकीचे आहे.कार्यक्रमासाठी लोकहीत संघटनेचे सय्यद नासेर, बशीर खान,ई.पदाधिका-यांची ऊपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुफ्ती एहसान साहेब, मौलाना अब्दुल रऊफ साहेब, मौलानाअब्दुल अजीम (इत्तेहाद फांऊडेशन), सलीमभाई, शब्बीर पठाण, हाफीज आमेर, सुफियान खानआदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...