शनिवार, २१ मार्च, २०२०

अवकाळी पाऊस व वारा गारपीटमुळे नुकसान झाल्याने प्रशासनाने दखल घ्यावी- जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी.
जाफराबाद प्रतिनिधी :- जाफराबाद तालुक्यातील
नळविहीरा, आंबेगाव, टेंभुर्णी व परिसरात आज (दि .१७ ) मंगळवारी रात्री ७.४५ वा. पंधरा मिनिटे अवकाळी वारे व पावसासह गारपीटही झाली आहे. भोकरदन तालुक्यातील बऱ्याच भागासह जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हीच अवस्था आहे.यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता बळावली आहे.या अवकाळी वारे,पाऊस व गारपिटीमुळे आंब्याचा मोहर व फळे गळून पडली आहेत तर द्राक्ष, डाळिंब  आदी फळपीकालही याचा फटका बसला आहे.
       अगोदर पेरा झालेला काही अंशी  गहु, हरभरा, शाळू ज्वारी, करडई, मका काढणीच्या अवस्थेत आहे तर थोडी उशिराने पेर झालेली ही पिके आता पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये झालेल्या अती पावसाने शेत तयार करण्यात जास्त अवधी गेल्याने नंतर झालेल्या पेऱ्याचे प्रमाण अधिक आहे.
     यामुळे या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे अगोदरच हतबल झालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही.
प्रशासनाने तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन कार्यवाही केली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...