शनिवार, २१ मार्च, २०२०

कोरोना च्या विषाणू ची धास्ती,अंबड पोलिस ठाण्यात तक्रारदारांसाठी सँनिटायझरची केली व्यवस्था
अंबड पोलीसांचे जमावकडे लक्ष व जनजागृती मोहिम
अंबड/ प्रतिनिधी (आरविंद शिरगुळे) :- कोरोणाविषाणुचा
प्रादुर्भाव  रोखण्याचासाठी अंबड़ पोलिस ठाणे यांने पूर्ण पने खबरदारी घेतलेली असून तक्रार देण्यास येणाऱ्या तक्रारदारांना सँनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे तक्रारदारांना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून आल्यावरच आपली तक्रार नोदविल्या जाईल.तसेच पोलिस स्टेशन हद्दीत जमाव होऊ दिला नसून जनजागृति सुद्धा पोलिसांकडून करण्यात येत आहे. भारतातच नव्हे तर बऱ्याच देशामधे  कोरोना हाहाकार मजविला असून सर्वत्र भीतिचे वातावरण पसरलेले आहे. महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळी खबरदारी घेण्यासाठी उपाय योजना आखण्यात येत आहे. शाळा महाविद्यालय, मंदिर, यात्रा, आठवड़ी बाजार असे बंद करण्यात आलेले असून स्वछता राखुन काळजी घेण्याची आवाहन करण्यात येत आहे. त्यात अंबड़ पोलिस ठाण्याचे  पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबड़ पोलिस स्टेशनमध्ये  काळजी घेतलेली आहे. पोलिस स्टेशनच्या ठाणे अमलदार कक्षाच्या बाहेर सर्व बँरीकेट लावून पँक करुण एक व्यक्तिच आत जाईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. बेरिकेटला कोरोना संदर्भात जनजागृति पोस्टर सुद्धा लावण्यात आलेली आहे0 जंतुनाशकाने हात धुवून तोंडाल रुमाल किंवा मास्क लावून आत प्रवेश करावा असा फलक लावून सँनिटायझर ठेवण्यात आले असल्यामुळे प्रत्येकी व्यक्ति   सँनिटायझर ने हात तोंडाल रुमाल किंवा मास्क धुवून लावून आत प्रवेश करताना पहावयास मिळत आहे तसेच पोलिस स्टेशन हद्दित असलेली दर्गा रवना पराडा  येथील सकलादी बाबा दर्गा येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी जातात त्यामुळे इथे यत्रेचे स्वरूप नेहमी पहायाला मिळते पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी येथे जाऊन तेथील पुजारी मुजावर व प्रतिष्ठित नागरिक व्यापारी यांच्या सोबत बैठका घेऊन जनजागृति केली व मंदिर दुकान बंद ठेवण्यात आले गुरुवार आठवड़ी बाजार दिवस असल्यामुळे पोलिसांनी सकाळ पासूनच बजारावर करडि नजर ठेऊन तिथे लगलेल्या दुकाने, नगर परिषद व तहसील कार्यल्याच्या कर्मच्यारी मदतीने हटविन्यात आल्या तसेच पोलिस स्टेशन हद्दित जमाव होऊ दिला जात नसून त्याची सुद्धा खबरदारी पोलिस निरीक्षक  नांदेडकर यांच्या कडून घेतली जात आहे. शहरातील जमाव होते असलेल्या  दुकान, पान शेंटर, हॉटेल यांना नोटिसा पोलिस स्टेशन कडून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे पोलिस ठाणे अंबड़ हे कोरोना प्रादुर्भाव संदर्भात पुढे असल्याने दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...