गुरुवार, १९ मार्च, २०२०

कोरोना बाबत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षास प्रदेशातून किंवा जिल्हा बाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी-जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना जि. प्रतिनिधी :-  कोरोना बाबत जिल्हास्तरीय  आपत्कालीन नियंत्रण कक्षास परदेशातून किंवा जिल्ह्याबाहेरून  जालना जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींनी माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले आहे. कोरोना विषाणू संसर्ग आजाराबाबत (कोविड-19) जिल्हास्तरावर आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षामध्ये कार्यरत अधिकारयांद्वारे परदेशातून किंवा जिल्ह्या बाहेरून जालना जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींची माहिती एकत्रित केली जात आहे.
        या नियंत्रण कक्षातून संबंधित व्यक्तींना थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात आहे . यावेळी त्यांना कोरोना संसर्गाच्या सतर्कतेच्या दृष्टीने माहिती विचारली जात असून ती माहिती संबंधित व्यक्तींनी कोणतीही शंका मनात न ठेवता विचारणाऱ्या द्यावी.याच बरोबर अशा कोविड- 19  चा  प्रादुर्भाव झालेल्या  देशातून  अथवा  जिल्ह्यातून  आलेल्या व्यक्तींनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष हेल्पलाईन क्रमांक 02482-223132 क्रमांकावर संपर्क साधून सकाळी 10 :30 ते सायंकाळी 5 या वेळेत स्वतःहून आपली प्रवासाबद्दल तसेच या आजाराबद्दल काही लक्षणे जाणवत असल्यास त्याची माहिती द्यावी अशी विनंती करण्यात येत आहे.परदेशातून किंवा बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या या व्यक्तींच्या प्रवासाच्या दिवसापासून 14 दिवसांच्या प्रकृतीविषयी  निरीक्षण  ठेवणे गरजेचे  आहे. त्याची माहिती या आजाराचा  धोका  रोखण्यासाठी या नियंत्रण कक्षाद्वारे घेतली जाईल.   
     जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असून यासाठी कोणतीही शंका मनात बाळगू नये असेही आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...