गुरुवार, १९ मार्च, २०२०

कोरोना:येत्या रविवारी देशात जनता कर्फ्यू. 
 औरंगाबाद प्रतिनिधी:- येत्या रविवारी देशभर जनता कर्फ्यु म्हणजेच संचारबंदी असे सुचित करण्यात आले आहे. 22 मार्चला रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात आवाहन केलं आहे.
 चीनच्या वुहान शहरातून फैलावलेल्या कोरोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे जगभरात 9000 हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत.
कोरोना चे भारतात 4 बळी
तर जगभरात नऊ हजाराहून अधिक बळी आपल्या देशात 173 कोरोना बाधित रुग्ण आत्तापर्यंत आढळले असून यात सर्वात जास्त 47 रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला संकल्प करायला हवा की, आपण स्वत:ही करोनापासून वाचू या आणि इतरांनाही वाचवूया.
 संकल्प आणि संयम हेच करोनाला उत्तर आहे. करोनावर अजूनही उपाय निघालेला नाही.
 भारतावर या जागतिक संकटाचा परिणाम होणार नाही, असं मानून चालणं चुकीच ठरेल.
 भारतासारख्या 130 कोटींच्या विकसनशील देशावर करोनाचं संकट सामान्य गोष्ट नाही.

 आज 130 कोटी देशवासियांकडे काही मागण्यासाठी आलो आहे. मला तुमचा येणारा काही काळ हवा आहे.
 देशवासियांनी मला कधीही निराश केलेले नाही. मी जेव्हा कधी काही मागितलं तेव्हा देशवासियांनी मला दिलं आहे.
 संकट टळलेलं नाही. प्रत्येक भारतीयानं सजग राहायला हवं. संपूर्ण जग मोठ्या संकटातून जातं आहे.
22 मार्चला रविवारी संध्याकाळी पाच वाजता सायरन वाजवला जाईल तेव्हा आपण आपल्या घराच्या दारात खिडकीत बाल्कनीत उभे राहून सरकारी कर्मचाऱ्यांचा डॉक्टरांचं टाळ्या वाजवून आजवरच्या कार्याबद्दल अभिनंदन करूया
असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
≠=============≠==============≠==============≠===============≠=============

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...