गुरुवार, १९ मार्च, २०२०

        दुबईहून आलेला अहमदनगरचा पुरुष कोरोना बाधित 
                        राज्यातील एकूण संख्या 48 
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून विमानतळावरील स्क्रिनीग सुविधेची पाहणी.
मुंबई, प्रतिनिधी :- राज्यात आज दिवसभरात तीन ११,पुणे मनपा ८, मुंबई ९,नागपूर ४,यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण
करोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४८ झाली आहे.  नगर जिल्ह्यातील ५१ वर्षीय पुरुष करोना बाधित आढळला असून तो आपल्या पत्नीसह दुबईला गेला होता. त्याची पत्नी करोना निगेटिव्ह आढळली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, आज आरोग्यमंत्र्यांनी आज मुंबई विमानतळावर जाऊन तेथे सुरू असलेल्या स्क्रीनींग सुविधेची पाहणी केली.राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील पुढीलप्रमाणे:पिंपरी चिंचवड मनपा
प्रत्येकी३,अहमदनगर२,रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी १,एकूण ४८, राज्यात आज ७८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण १३०५  प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १०३६ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ९७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १३०५ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास आरोग्यमंत्री टोपे यांनी मुंबई विमानतळावर जाऊन प्रवाशांची होत असलेल्या स्क्रीनींग सुविधेची पाहणी केली.ही तपासणी कशी केली याची माहिती घेतली. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधत त्यांचे कौतुकही केले. इमिग्रेशन अधिकारी तपा भट्टाचार्य विमानतळ आरोग्य अधिकारी डॉ ए. आर. पसी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...