गुरुवार, १९ मार्च, २०२०


त्या मौजे खंडाळा प्रकरणात घटनेची निपक्षपणे चौकशी न करणाऱ्या पोलीस निरीक्षक व विभागीय पोलीस अधिकारी यांना सह आरोपी करून निलंबित करा बहुजन समाज पार्टी जालना च्या वतीने मागणी.
बहुजन समाज पार्टी च्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन
जालना (प्रतिनिधी) :-  वैजापूर तालुक्यातील लाख 
 खंडाळा येथील भीमराज बाळासाहेब गायकवाड यांची समाजकंटकांकडून (हल्ला करणारे आरोपी) क्रूरपणे हत्या करण्यात आली. व तसेच त्यांच्या आई-वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा समाजकंटकां (हल्ला करणारे आरोपी) च्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टी जालना च्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले. घटनेची अधिक माहिती अशी की, वैजापूर खंडाळा येथील दलित बौद्ध तरुण भिमराज गायकवाड यांचा मोठा भाऊ कामानिमित्त बाहेरगावी गेला असता त्याच्या शेजाऱ्यांनी आपली मुलगी पळविण्याच्या संशयावरून त्या तरुणाच्या घरावर हल्ला करण्यात आला.दलित बौद्ध तरुण भिमराज गायकवाड यांच्या वर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.दलित बौद्ध तरुण भिमराज गायकवाड यांचा मृत्यू झाला.आई-वडील वर देखील हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.व सदर गायकवाड कुटुंब यांनी घटनेच्या एक दिवस अगोदर निवेदन दिले होते की आमच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे आम्हाला संरक्षण देण्यात यावे.त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे हा प्रकार घडला. व संबंधित पोलिस स्टेशनला केलेली तक्रारीची दखल न घेतल्यामुळे तसेच पोलिसांच्या असभ्य वर्तना मुळे हत्याकांड घडलेले असून सदरील घटने संबंधित पोलिस निरीक्षक व पोलिस अधिकारी यांना सहआरोपी करून निलंबित करण्यात यावे व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा संबंधित खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा.आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी. गायकवाड कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदना मार्फत  करण्यात आली आहे.कारवाई न झाल्यास सदरील घटनेच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा व राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. पुन्हा महाराष्ट्राला अशा घटना घडू नये म्हणून यासाठी शासनाकडून कठोर आदेश प्रशासनाला देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात केली आहे.वेळी जिल्हयातील पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते,  जिल्हा सचिव ज्ञानेश्वर गरबडे, वैभव
दहीवाळ,रविभाऊ मगरे,दिलीप मगरे,पदमाकर बोर्ड,सोनवनेभाई,अनिल् तुपे,सचिनभाऊ खरात,लक्ष्मीबाई लोखंडे सरस्वतीबाई डोळसे,सुरेश  कांबळे, दिपक सोनवणे, बबन सोनवणे,सचिन हिवराळे, अँड ढील्पे सर, आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...