गुरुवार, १९ मार्च, २०२०

ग्रह एकत्र आल्याने कोरोनाची लागवण हलाहल रोगामुळे ही परिस्थिती निर्माण झाली -वे.शा.राजू महाराज सामगावकर
जालना प्रतिनिधी :- कोरोना व्हायरस या संसर्ग
जन्य आजाराने पूर्ण जगाला हादरून टाकले आहे.यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे जगभरात थैमान घातलेल्या या आजाराला वैदिक शास्त्रानुसार काही ग्रहांचा प्रादुर्भाव असल्याचे जालना येथील इन्कमटेक्स कोलोनीत राहणारे वेदशास्त्री राजेश महाराज सामनगावकर यांनी सांगितले.या मध्ये वैदिक कारन निश्चितच आहे यामुळे जगावर वाईट - चांगले दिवस हे ग्रहमानाच्या स्थितीनुसार येतात.गेल्या 6 फेब्रुवारीला मंगल ग्रहोणे राशीमध्ये प्रवेश केल्याने या संसर्ग जन्य कोरोना व्हायरसाने जगभरात थैमान घातलेल आहे.कोरोना व्हायरस हा भारतात जेव्हा धनु राशीमध्ये गुरू,केतू,मंगल हे तिन्ही ग्रह एकत्र आल्याने हा व्हायरस जलद गतीने पसरत असल्याचे राजेश महाराज यांनी सांगितले.यामुळे जगात लोकांच्या विनाशाचा हा प्रादुर्भाव झाला आहे.कोरोना हा भारतात लवकरच आटोक्यात येईल.हा व्हायरस येत्या 26 एप्रिल पर्यत हा भारत देशात थैमान घालणार असल्याचे ही यावेळी राजेश महाराज यांनी बोलताना सांगितले.शनी हा ग्रह मकर राशीमध्ये पहिल्यापासूनच असल्याने मंगल ग्रह हा पण पृथ्वीच्या तत्वाच्या राशीमध्ये आहे.म्हणून येणाऱ्या 22 मार्च ला यावर मात होईल.तसेच 30 मार्च रोजी गुरू हा मकर राशीत प्रवेश करेल गुरू हा मकर राशीत आल्याने हा शुभ ग्रह असल्याने हा व्हायरस लवकरात लवकर आटोक्यात येईल.याचा धोका हा भारतात 45 दिवस राहणार आहे गुरू मंगल,शनी,मकर राशीत असल्यामुळे हा हलाहल रोग निर्माण झाला आहे.गुरू त्या ठिकाणी आल्यामुळे त्याचा प्रभाव कमी होईल.हालाहल या रोगामुळे अशे रोग भूकम्प प्रकार होत असतात.अंधश्रद्धेचा ग्रहावर परिणाम हा नक्कीच होत असतो.यावर विश्वास ठेवलाच पाहिजे.ज्योतिष शास्त्र हे आजच नसून पुरातन काळापासून असल्याचे राजेश महाराज यांनी सांगितले.आजपर्यत ज्योतिष शास्त्राने सांगितल्या प्रमाणे त्या त्या गोष्टी घडत आलेल्या आहे.त्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे.सर्व शुभ अशुभ घटना हे राशी प्रमाणे होत असतात मनुष्य कुठेही हतबल झाला असेतर तो सर्वात पहिले ज्योतिष शास्त्रकडे धाव घेत असतो.म्हणून राशी ग्रहाला माणलेच पाहिजे असे यावेळी वेदशास्त्री राजेश महाराज सांमनगावकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...