मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

सर्वानी घरी राहूनच महात्मा फुले जयंति साजरी करावी
                                                                   - संतोष डोंगरखोस

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- सध्या संपूर्ण
जगावर कोरोना चे संकट कोसळले आहे,व त्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले आहे,तसेच जगभरात लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे,कोरोनामुळे आपला देश व राज्य 14 एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन  केले आहे,तेव्हा आपण या देशाचे नागरिक या नात्याने कायद्याचे पालण करुन सरकारला सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे,तेव्हा आपण सर्वानी सार्वजनिक कार्यक्रम घेणे अथवा कार्यक्रमात सहभागी होणे स्वतःसाठी व देशासाठी घातक आहे.तेव्हा आपण सर्वानी सार्वजनिक कार्यक्रम टाळावे.
तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचे संपुर्ण देशात ,राज्यात तसेच आपल्या जिल्ह्यातही असंख्य पुर्णाकृती तथा अर्धाकृती पुतळे आहे या पुतळ्यांचा यथोचित सन्मान शासकीय पातळीवर शासनाने करावा ही नंम्र विनंती.तसेच जयंती उत्सव सार्वजनिक कार्यक्रम परिस्थिती पुर्ण आटोक्यात आल्यावर घेता येईल परंतु आज सार्वजनिक कार्यक्रम न घेता सरकारला सहकार्य करावे ही विनंती.प्रतिवर्षी 11 एप्रिलला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो परंतु यावर्षी आपण सर्व कोरोना सारख्या महामारीने संकटामधे आहोत तेव्हा घराबाहेर पडुन संघटीत कार्यक्रम न घेता घरात राहूनच गर्दी न करता अत्यंत साध्या पद्धतीने प्रतिमा पूजन करुन जयंति साजरी करावी ही नंम्र विनंती.असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष श्री.संतोष डोंगरखोस यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...