मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

            उत्पादन शुल्क विभागाची किमयाच भारी
      दारू एका दुकानात,पण सील केले बाजूच्याच दारी

धर्माबाद (भगवान कांबळे):- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाॅकडाऊन असताना जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर
यांच्या आदेशाने संचारबंदी कालावधीत महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी दारूची दुकाने सील करण्यात आले आहेत.ही कारवाई करत असताना मात्र धर्माबाद मध्ये एका देशी दारूच्या दुकानात मुख्य दरवाजाला सील न करता बाजूचें चॅनलगेट असलेल्‍या दाराला सील करण्यात असल्याचे उघड झाले आहे.त्याचे झाले असे की काल एका किराणा दुकानांमध्ये अवैध गुटखा सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्या ठिकाणी त्या दुकानाच्या गोदामावर धाड मारत असताना घटनास्थळावर अनेक पत्रकार व पोलीस बांधव उपस्थित होते
धर्माबाद तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सुनील पाटील व काही पत्रकारांच्या लक्षात या देशी दारू च्या दुकानाकडे गेले
 सदरील दुकानाच्या मुख्य दरवाज्‍याला सील  नसल्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शटर उचलून पाहिले तर आतून बंद केले होते व बाजूच्या चॅनल गेटला सील केलेल होते त्या ठिकाणाहून  श्री सुनील पाटील यांनी उत्पादन शुल्कच्या धर्माबाद च्या संबंधित  कार्यालय प्रमुखांना दूरध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी दुकान सील केल्याचे सांगितले परंतु मुख्य दरवाजा सील  केला नसल्यामुळे शहरात होत असलेल्या अवैध दारू विक्रीचे केंद्र तर हेच नाही ना अशीही शंका उत्पन्न होत आहे.
चढ्या भावाने दारूविक्री होत असतानाचा अनेक घटना समोर येत असताना देशी दारूच्या मुख्य दरवाज्याला सिल न करण्यामागे उत्पादन शुल्काची काय किमया आहे हे त्यांनाच माहीत
श्री सुनील पाटील यांची प्रतिक्रिया याविषयावर घेतली असता ते म्हणाले की उत्पादन शुल्क अधिकारी जेव्हा याठिकाणी येईल या  दुकानांची संपूर्ण चौकशी केली जाईल, रेकॉर्ड तपासले जातील आणि जर काही गडबड आढळल्यास संबंधितांवर कारवाई सुद्धा करण्यात येण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत तात्काळ उत्पादन शुल्काच्या नांदेड येथील अधिकार्याला व नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांना सुद्धा दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली आहे
जर उत्पादन शुल्क विभागच अवैध दारू ला चालना देत असेल तर मात्र त्याला कोणीही रोखू शकणार नाही.वर्षभरामध्ये धर्माबाद  एकदाच येणारा उत्पादन शुल्क चा संबंधित अधिकारी आता मात्र दररोज चार वाजता धर्माबाद येथे येत असल्याचीही गुप्‍त माहिती होत आहे.धर्माबाद तालुक्यातील देशीविदेशी दुकानांच्या सील ची तपासणी करण्यासाठी येत असल्याचे सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात येतात आहे
संबंधित प्रकरणांमध्ये जिल्ह्याधिकार्‍यांनी लक्ष घातल्यास काळाबाजार उघड होईल असेही सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...