मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत
आजपर्यंत 6 लाख 3 हजार 998 रुपयांचा मुद्देमाल जप्त
            जालना, प्रतिनिधी :- अबकारी अनुज्ञाप्तीवरील व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश काळात अवैध 
दारु वाहतुक रोखण्यासाठी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जालना श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली असुन अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात दररोज  मोहीम राबविण्यात येत आहे. दि. 6 एप्रिल 2020 रोजी राज्य उत्पादन शुल्क,अंबड विभागाच्या पथकाने कारला, थेरगाव रोडने वाहन क्रं. –MH-43N-8547 चा सिनेस्टाईल 5 ते 10 किलोमीटर पाठलाग करुन वाहन अडवत तपासणी केली असता त्यात देशी दारु 180 मिलीच्या 432 सिलबंद बाटल्या मिळुन आल्याने वाहन चालकास म.दा. का. 1949 चे कलम 65 अ,इ अन्वये अटक करण्यात आली आहे. तसेच निरिक्षक भरारी पथक, जालना यांच्या पथकाने दि. 6 एप्रिल 2020 रोजी जालना तालुक्यातील नाव्हा व कडवंची गावातील हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर छापे टाकुन 4 गुन्हे नोंदवले आहेत. त्यात त्यांनी 875 लिटर गुळमिश्रित रसायन जागीच नष्ट केले.
या कारवाईमध्ये निरीक्षक राहूल रोकडे निरीक्षक सुनिल गायकवाड, दुय्यम निरीक्षक अनिल बीडकर, अभय औटे, तसेच जवान सुनिल कांबळे, रावसाहेब पल्लेवाड, अंकुश बिजुले, विजेंद्र पवार, देविइदास आडेप,ज्ञानेश्वर सांबारे यांनी सहभाग नोंदवला.
             अवैध धंदा, दारु वाहतुक विरुध्द कारवाई – कोरोना विषाणु (कोवीड-19) च्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 24 मार्च 2020 ते 7 एप्रिल 2020 एकुण 21 गुन्हे त्यामध्ये 4 वाहने एक तीन चाकी वाहन क्रं.MH-20BT-838 व दोन टु व्हिलर MH-21 AZ-4697,  MH-21 AN-9537, एक चारचाकी,MH-043N-8547 असा एकुण रुपये 603998 चा मुद्देमाल जप्त केला आहे.
            कोरोना विषाणु (कोवीड-19) अबकारी अनुज्ञप्तीवरील व्यवहार बंदच्या काळात दि. 24 मार्च 2020 ते 7 एप्रिल 2020 या कालावधीत एकुण 21 गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यात 8 वारस व 13 बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले असून 8 आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यात हातभट्टी225 लिटर, रसायन 24330 लिटर देशी 212.06 ब.लि. असून 4 वाहने जप्त करण्यात आले असून 603998  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्यविक्री, वाहतूक संबंधी कुठलीही माहिती असल्यास दुरध्वनी क्रं.02482-225478 व 18008333333या टोल फ्री नंबर व्हॉटसअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक,  राज्य उत्पादन शुल्क जालना यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...