मंगळवार, ७ एप्रिल, २०२०


     जालना शहरातील दु:खीनगर परिसरातील 28 रस्ते सील
20 आरोग्य पथकामार्फत पसिरातील एक हजार कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार
शहागड येथील 26 व्यक्तींबरोबर उर्वरित 20 व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने निगेटिव्ह
जालना, प्रतिनिधी :- कोरोनाबाधित महिला रहात असलेल्या दु:खीनगर परिसरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली 20 
पथकामार्फत एक हजार कुटूंबाचे पुढील 14 दिवस दररोज सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कंटेन्टमेंट प्लॅननुसार दु:खीनगर भागात येणारे 28 रस्ते सील करण्यात आले असुन या ठिकाणी 20 चेकपोस्ट स्थापन करण्यात येऊन कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत  करण्यात आले असुन शहागड ता. अंबड येथील 26 व्यक्तींबरोबरच उर्वरित 20 व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले असल्याची माहितीही प्रशासनामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.जालना जिल्ह्यातील दु:खीनगर भागात 65 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे दि. 6 एप्रिल, 2020 तपासणीअंती आढळुन आले. या महिलेची प्रृकती गंभीर असुन महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 61 व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले असुन यापैकी 44 व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत व या व्यक्तींना  विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.  तसेच सामान्य रुग्णालयातील निकट संपर्कात आलेल्या 17 कर्मचाऱ्यांनाही अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली आहे.
 रांजणी ता. घनसावंगी या ठिकाणी कोरोनाबाधित महिलेची मुलगी शिक्षिका म्हणून कार्यरत असुन त्यांनी दि. 2 एप्रिल, 2020  रोजी शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्य वाटप केले होते.  या पार्श्वभूमीवर 7 एप्रिल, 2020 रोजी घनसावंगीचे तहसिलदार यांच्या आदेशानुसार धान्य वाटपाच्या दिवशी व तदनंतर या शिक्षिकेच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या 19 व्यक्ती व ज्या विद्यार्थ्यांना धान्य वाटप केले त्या 1 हजार 119 कुटूंबातील 6 हजार 465 व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.जालना जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 474 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 138 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 265 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 52 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 265 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 227, रिजेक्टेड नमुने-03, एकुण प्रलंबित नमुने-34 तर एकुण 127 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 06,14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 49 एवढी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...