गुरुवार, ९ एप्रिल, २०२०


             जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी
                 पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन
                16 कोटी 30 लक्ष रुपयांच्या निधीस मंजुरी
जालना, प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातील 
जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन आरोग्य सेवेसाठी जवळपास 16 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.अंबड येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे नुतणीकरण व निवासस्थानांच्या कामांसाठी 4 कोटी 59 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  तसेच जालना येथील जिल्हा रुग्णाललयाच्या टाईप-1 व टाईप-2 निवासस्थांनाची दुरुस्ती, ईमारतीची व परिसरातील ड्रेनेज व अंतर्गत रस्ते दुरुस्ती आदी कामांसाठी 8 कोटी 72 लक्ष रुपये तर घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालयातील कक्षाचे बांधकाम, परिसर सुधारणा, मुख्य ईमारत व निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी 2 कोटी 99 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...