गुरुवार, २३ एप्रिल, २०२०


कोविड -19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना
            शासनाकडून दोन हजार रुपये अर्थसहाय्य

  जालना, प्रतिनिधी :- महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोविड -१९ विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून दोन हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.लॉक डाऊन परिस्थितीमुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद पडले आहेत. बांधकाम कामगारावर बेकारीचे संकट ओढवले असल्यामुळे या संकट काळात त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात डी.बी. टी.पद्धतीने मंडळाकडील नोंदीत व सक्रीय (जिवीत) असलेल्या बांधकाम कामगारांच्या खात्यात दोन हजार रुपये अर्थसहाय्य जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कामगारांनी कुठलाही अर्ज भरण्याची किंवा चौकशीसाठी कार्यालयात गर्दी करू नये तसेच कुठल्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये. अशा व्यक्तीची तक्रार संबंधित पोलिस स्टेशनला करावी. असे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी.ई. कराड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...